राज्यात कोरोनाचे 1216 नवीन रुग्ण, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 17974
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
लाईव्ह कव्हरेज
'त्या' व्हीडिओची चौकशी करण्यासाठी समिती गठीत
मुंबईतल्या
सायन रुग्णालयात कोरोना वार्डमध्ये जिवंत रुग्णांसोबत
मृतदेह ठेवले जात असल्याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
या व्हीडिओविषयी
मुंबई महापालिकेनं स्पष्टीकरण देताना म्हटलंय की, या व्हायरल व्हीडिओची चौकशी
करण्यासाठी आम्ही एक समिती गठीत केली आहे आणि पुढच्या 24 तासांत
समिती अहवाल सादर करेल.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
'ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला आतापर्यंत सगळ्यात मोठा फटका बसू शकतो'
कोरोना व्हायरसमुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर
आतापर्यंतचं सगळ्यात मोठं संकट ओढावेल, अशा इशारा बँक ऑफ इंग्लंडनं दिला आहे.
जूनमध्ये लॉकडाऊन पूर्णपणे समाप्त
केल्यास अर्थव्यवस्था यंदा 14 टक्क्यांनी खालावेल, असं बँकेनं म्हटलं आहे.
बँकेचं हे विश्लेषण जून ते सप्टेंबर दरम्यान लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं
शिथिल करण्यावर आधारित आहे, असं बँक ऑफ इग्लंडनं म्हटलं आहे.
फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, बँक ऑफ इंग्लंड
पंढरपूरची आषाढी वारी यंदा होणार का?
आषाढातली पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातल्या सर्वांत मोठ्या
सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानली जाते. पण यंदा कोरोना विषाणूची साथ
आणि लॉकडाऊनमुळे वारीवर अनिश्चिततेचं सावट आहे.
याविषयी वारकऱ्यांचे प्रतिनिधी आणि सरकारमध्ये चर्चा सुरू
असून येत्या काही दिवसांत निर्णय अपेक्षित आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.
YouTube पोस्ट समाप्त
भारतीय रेल्वेकडून 5,231 कोव्हिड केअर सेंटरची निर्मिती
भारतीय रेल्वेनं कोरोनाचा सामना करण्यासाठी देशभरातल्या 215 रेल्वे
स्थानकांवर 5,231 कोव्हिड केअर
सेंटर तयार केले आहेत.
तसंच भारतीय रेल्वेनं 2,500 डॉक्टर आणि 35,500 पॅरामेडिक स्टाफ तैनात केले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
ब्रेकिंग, सरकारचा लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय? राज ठाकरेंचा सवाल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वेगवेगळ्या राजकीय
पक्षांच्या नेत्यांची आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली.
या बैठकीला अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, विनय कोरे, महादेव जानकर, जयंत
पाटील, राज ठाकरे, इम्तियाज जलील, अशोक ढवळे, कपिल पाटील, राजेंद्र गवई आदी नेते उपस्थित होते.
या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे
-
1.मुंबईची अशी परिस्थिती यापूर्वी पाहिली
नव्हती, जुन्या सिनेमात पाहिलं होतं.
2.कन्टेंन्मेंट झोनमध्ये पोलीस फोर्स
वाढवा.
3.परप्रांतीय जेव्हा महाराष्ट्रात परत
येतील तेव्हा त्यांची तपासणी करा.
4.सरकारचा लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय आहे?
5.कोरोनामुळे जी परिस्थिती उद्भवली आहे, त्याचं उत्तर ना तुमच्याकडे, माझ्याकडे, राज्य किंवा केंद्र सरकारकडे, कोणाकडेच
नाही,जग चाचपडतंय,आता टीका करुन मोरल डाऊन करु नये.
6.मी जुन्या भाषणांत सांगितलं होतं,अडचण आली की हे परप्रांतीय सर्वांत आधी
जातील, आता तेच घडतंय.
7.पोलिसांच्या जागी SRPFलावणं याचा अर्थ पोलीस कमी पडले असं
नाही,दीड महिना काम करुन त्यांच्यावर ताण
आहे, तो कमी होईल.
8.परप्रांतियांची एण्ट्री आणि एक्झिटवर
बंधनं हवीत, प्रत्येक ठिकाणी माणुसकी चालत नाही.
9.सरकारी कर्मचारी, पोलीस ते सफाई कामगार, सर्वांच्या सुरक्षेबाबत सूचना, लॉकडाऊनचा एक्झिट प्लान काय? विषयी प्रश्न विचारला.
10.गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी, छोटे दवाखाने सुरु करावेत, परप्रांतीय
मजूर जे बाहेर गेले आहेत,
त्यांची तपासणी करुन, नोंदणी करुन महाराष्ट्रात घ्यावं, MPSC विद्यार्थ्यांना घरी पोहोचवावं, या
सूचना केल्या.
फोटो स्रोत, SHARAD BADHE/BBC
फोटो कॅप्शन, राज ठाकरे
ब्रेकिंग, सौदी अरेबियातल्या भारतीयांसाठी पहिलं विमान घेणार उड्डाण
सौदी अरेबियात अडकलेल्या भारतीयांना
देशात आणण्यासाठी 5 विशेष
विमानांची सोय करण्यात येईल. या माध्यमातून 1 हजार भारतीयांना मायदेशी आणलं जाईल. सौदी
अरेबियाच्या दूतावासानं ही माहिती बीबीसी प्रतिनिधी दिलनवाझ पाशा यांना ही माहिती दिली
आहे.
विदेशात अडकलेल्या भारतीयांना परत
आणण्यासाठी केंद्र सरकारनं 'वंदे भारत' नावाची योजना आणली आहे.
8 मेला पहिलं विमान सौदी अरेबियातल्या रियादहून कोझीकोडला येईल.
जवळपास 60 हजार लोकांनी भारतात परत येण्यासाठी अर्ज केले
आहेत, असं दूतावासानं सांगितलं आहे.
विमानांच्या तारखा :
8 मे : रियाद –
कोझिकोड
10 मे : रियाद – दिल्ली
12 मे : दम्माम – कोची
13 मे : जेद्दा –
दिल्ली
14 मे : जेद्दा - कोची
फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
मंत्रालयातील अधिकाऱ्याला कोरोनाची लागण
मंत्रालयातल्या एका विभागाच्या प्रधान सचिवांना कोरोनाची
लागण झाली आहे.
संबंधित अधिकाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्हआल्यानंतर त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या इतर सचिवांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
मंत्रालयात या आधी पाच जण कोरोना बाधित झाले
होते, आता मंत्रालयातील बाधितांचा आकडा सहावर
पोहोचला आहे.
आतापर्यंत काय घडलं?
नमस्कार मंडळी,
सकाळपासून कोरोना व्हायरस संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स बीबीसी
मराठीच्या या लाईव्ह पेजच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत. आता दुपारचे दोन
वाजलेत.
इथून पुढचे अपडेट्सही आपण पाहणार आहोत, पण त्यापूर्वी नजर टाकूया
आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर.
1.देशातील कोरोना व्हायरसची
लागण झालेल्या व्यक्तींची संख्या 52,952 वर पोहोचली आहे. तर
आतापर्यंत 1783 जणांचा मृत्यू झाला आहे.
2."गौतम बुद्धांनी त्याग आणि तपस्या ही
शिकवण दिली.गौतम
बुद्धांचा उपदेश कोरोना संकटकाळात उपयोगी येत आहे."-नरेंद्र
मोदी
3.स्थलांतरित मजुरांना घेऊन
एक विशेष रेल्वे भिवंडीहून बिहारला रवाना झाली आहे. यामध्ये सुमारे 1200 प्रवासी होते.
4.स्थलांतरित
मजुरांची पायपीट अजूनही सुरुच आहे. आज मुंबई-नाशिक हायवेवर पुन्हा मजूर चालत
जाताना आढळून आले.
5.मुंबईत तब्बल 250 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली
आहे. पण यामध्ये बहुतांश पोलिसांमध्ये कोव्हिड-19 ची लक्षणं दिसलेली नाहीत.
फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
इराणमधली खासगी विमान कंपनी अशी ठरली कोरोना उद्रेकाला कारणीभूत
मनमाडमधील 130 भाविक पंजाबला रवाना
लॉकडाऊनमुळे मनमाडमधील गुरुद्वारेत अडलेल्या भाविकांची रवानगी त्यांच्या स्वगृही करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने बसची सोय करून या भाविकांना पंजाबला पाठवलं आहे. सर्व भाविकांची तपासणी केली आहे. तरी घरी परतल्यानंतर त्यांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येईल.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
मुंबईत 250 पोलिसांना कोरोनाची लागण
मुंबईत तब्बल 250 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. पण यामध्ये बहुतांश पोलिसांमध्ये कोव्हिड-19 ची लक्षणं दिसलेली नाहीत. तसंच लागण झालेल्या पोलिसांपैकी कुणीही गंभीर नाही, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
राजस्थानातील कोरोनाबाधितांचा आकडा 3355 वर
राजस्थानातील कोरोनाबाधितांचा
आकडा 3355 वर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 95 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
राजस्थान आरोग्य विभागाने दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
मुंबईत कोरोनासाठी युद्धपातळीवर असं उभं राहतंय 1000 खाटांचं स्पेशल हॉस्पिटल
स्थलांतरित मजुरांची पायपीट सुरुच
स्थलांतरित मजुरांची
पायपीट अजूनही सुरुच आहे. आज मुंबई-नाशिक हायवेवर पुन्हा मजूर चालत जाताना आढळून
आले. जेवण्यासाठी पैसे नसल्यामुळे चालत जाण्याशिवाय कोणताच पर्याय उपलब्ध नसल्याचं
जौनपूरला जात असलेल्या प्रीती कुमारी यांनी सांगितलं. असेच अनेक स्थलांतरित विविध
राज्यांच्या दिशेने चालत जात आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
रोजगार हमी योजनेतून राज्यातील 3 लाख 81 हजार 930 लोकांना रोजगार
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून राज्यातील 3 लाख 81 हजार 930 लोकांना रोजगार देण्यात येणार आहे. यामुळे मागेल त्याला काम उपलब्ध होईल. नागरिकांना कामासाठी बाहेर कोठेही जाण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती मनरेगा आयुक्त ए.एस.आर. नायक यांनी दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
अमेरिका चीनवर लॅबमध्ये कोरोना व्हायरस बनवल्याचे आरोप का करते? सोपीगोष्ट
अमेरिकेत अडकलेल्यांना एअर इंडियाची विमानांचा आधार
एअर इंडिया अमेरिकेत
अडकलेल्या भारतीय प्रवाशांसाठी विशेष विमानांची सोय करणार आहे. 9 ते 15 मेदरम्यान
ही विमानं अमेरिकेतून भारतात येतील. या प्रवासाचं तिकीट प्रवाशांकडूनच घेण्यात
येणार आहे, असं अमेरिकेतील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने कळवलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
स्थलांतरित मजुरांना घेऊन विशेष रेल्वे बिहारला रवाना
स्थलांतरित मजुरांना घेऊन एक विशेष रेल्वे भिवंडीहून बिहारला रवाना झाली आहे. यामध्ये सुमारे 1200 प्रवासी होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
गौतम बुद्धांचा उपदेश कोरोना संकटकाळात उपयोगी – नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी यांच्या
भाषणातील प्रमुख मुद्दे -
गौतम बुद्धांनी त्याग आणि
तपस्या ही शिकवण दिली.
सिद्धार्थ ते गौतम बनण्याचा
प्रवास प्रेरणादायी.
जग वाईट काळातून जात आहे.
अशा स्थितीतही आरोग्य
कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत.
मानवतेच्या सेवेसाठी भारत
तयार आहे.
अडचणीत असलेल्या प्रत्येक
देशाची मदत करण्यास भारत तयार.