You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दारू विक्री, स्थलांतरितांसाठीच्या रेल्वेवरून राजकारणाने गाजला दिवस
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
लाईव्ह कव्हरेज
आयटी कर्मचाऱ्यांची तपासणी करुन ऑफिसमध्ये प्रवेश
राज्याच्या काही भागांमध्ये विशिष्ट नियमांसह कार्यालयं सुरू करण्यात आली आहेत.
नाशिकमध्ये आयटी कंपनीमधील कर्मचाऱ्यांची अशाप्रकारे तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना कार्यालय परिसरात प्रवेश देण्यात येत आहे.
गोव्यामध्ये सलून सुरू
गोव्यामध्ये केशकर्तनालयं सुरू करण्यात आली आहेत.
दारू विक्री, सलून, बांधकाम - कोणत्या झोनमध्ये काय सुरू राहणार?
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या दृष्टीने राज्यात नेमक्या कोणत्या गोष्टी कुठे सुरू राहतील यासंदर्भात सरकारने नियम जाहीर केले आहेत.
नागरिकांना रोजच्या जगण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी भाजीपाला, दूध, किराणा यांचा पुरवठा ग्रीन, ऑरेंज, रेड, कंटेनमेंट तसंच महापालिका क्षेत्रात सुरू राहील. सर्व झोनमध्ये औषधांची दुकानं, दवाखाने नागरिकांसाठी सुरू राहतील.
ग्रीन झोनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने तिथे बऱ्याच आस्थापनांना कामकाज सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या संदर्भात विस्तृत माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा- कोरोना लॉकडाऊन महाराष्ट्र नियम
आजारपणापासून चार हात दूर राहाण्यासाठी हात कसे धुवावेत?
ब्रेकिंग, भारतातील कोव्हिड-19 रुग्णांची संख्या 42,533 वर
कोरोनाची लागण झालेल्या भारतातील रुग्णांची संख्या 42,533 वर गेली असून आतापर्यंत कोव्हिडमुळे 1373 लोकांचे प्राण गेले आहेत.
कोव्हिड-19 रुग्णांना युकेमध्ये कोणती औषधं दिली जातायत?
कोरोनावर मात केलेल्या 'वॉरिअर' मधुकर कड यांची गोष्ट
कामगारांना घरी परतण्यासाठी काँग्रेस मदत करणार
ज्या गरजू कामगारांना घरी परतण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे, त्यांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस करेल असं पत्रक काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केलं आहे.
कोरोनाविरोधातल्या युद्धात 'ही' गोळी निर्णायक ठरू शकते का?
...तर लॉकडाऊनचे नियम तोडू- इम्तियाज जलील
सरकारनं रेडझोनमध्येही दारुची दुकानं सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
जर औरंगाबादमध्ये दारुची दुकानं उघडली तर लॉकडाऊनचे नियम तोडून आम्ही ती सक्तीनं बंद करु.
महिलांना रस्त्यावर यायला लावू. ही वेळ दारुविक्री करुन माता-भगिनींचे प्रश्न वाढवण्याची नाही असं विधान औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे.
1200 स्थलांतरित मजुरांसह विशेष रेल्वे कानपूरमध्ये
गुजरातमधून 1200 स्थलांतरित मजुरांना घेऊन काल एक विशेष रेल्वे काल कानपूरला पोहोचली आहे.
अमेरिकेत 24 तासांमध्ये 1450 कोव्हिड-19 रुग्णांचा मृत्यू
अमेरिकेत गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाची लागण झालेल्या 1450 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटना खरंच चीनधार्जिणी आहे का?
ब्रेकिंग, कोरोना व्हायरसवर या वर्षअखेरीपर्यंत लस
या वर्षअखेरीपर्यंत कोरोना व्हायरसवर लस उपलब्ध होईल असा विश्वास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांनी व्यक्त केला आहे.
रेमडेसिवियरः कोव्हिड-19 वर हे औषध उपयोगी पडेल?
कोरोना व्हायरसची लागण झाली असेल तर या औषधानं तुम्ही बरे होऊ शकाल असा ठोस पुरावा असल्याचं मत अमेरिकन अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.
रेमडेसिवियर या औषधाची चाचणी घेतल्यानंतर या औषधामुळे कोरोनाची लक्षणं दिसण्याचा काळ 15 दिवसांच्या ऐवजी 11 दिवसांवर आल्याचं दिसून आलं आहे.
अजूनही याची सर्व माहिती प्रसिद्ध झाली नसली तरी या औषधं कमालीच उपयोगी असल्याचं दिसून आलं आहे असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. मात्र हे काही जादूचं औषध किंवा रामबाण उपाय असल्याचं मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
याबदद्ल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. रेमडेसिवियर.
महाराष्ट्रात रविवारी कोरोनाच्या नवीन 678 रुग्णांची नोंद
नमस्कार,
गेले काही दिवस आपण या Live Page च्या माध्यमातून कोरोनाविषयक जगभरातील अपडेट्स जाणून घेत आहोत.
आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी पुढीलप्रमाणे
1.महाराष्ट्रात रविवारी कोरोनाच्या नवीन 678 रुग्णांची नोंद झाली, तर 27 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळेराज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 12 हजार 974 वर पोहोचली. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे 548 जणांचा मृत्यू झाला.
2.भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 40 हजार 263 वर पोहोचली, तर आतापर्यंत देशात 1 हजार 306 जणांचा मृत्यू झाला आहे.रविवारी देशात कोरोनाचे 2 हजार 487 नवीन रुग्ण आढळले.
3."लोकांची फुफ्फुसं तंदुरुस्त होत आहेत. पण, काही मृत पेशी अजूनही अस्तित्वात असल्याचं समोर आलं आहे. यामुळे कोरोनातून बरे झालेल्या लोकांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचं दिसून येत आहे." - मारिया केरखोव, जागतिक आरोग्य संघटना
4.महाराष्ट्र सरकारनं रेड झोनमधल्या कंटेनमेंट झोनव्यतिरिक्त इतर परिसरातली दारूची दुकानं उघडण्याची परवानगी दिली.
5.भारतीय लष्कर, वायूदल आणि नौदलाकडून मुंबई, दिल्ली आणि देशातल्या इतर भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांना सलामी देण्यात आली.
6.रशियात एका दिवसात कोरोनाचे 10 हजार नवीन रुग्ण आढळले. कोरोना व्हायरसच्या प्रसाराला सुरुवात झाल्यापासून पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण आढळले आहेत.
7.कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरातल्या 185 देशांमध्ये झाला. आतापर्यंत जगभरात कोरोनाचे 34 लाख रुग्ण आढळले असून 2 लाख 44 हजार जणांचा मृत्यू झाला.
काल रात्रीपर्यंतच्या घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. महाराष्ट्रात कोरोनाची एकूण 12974 रुग्णांना लागण