कोरोनाचा मृत्युदर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक
भारतात पश्चिम बंगाल या राज्यात कोरोनाचा मृत्युदर सर्वाधिक म्हणजेच 12.8 टक्के असल्याचं केंद्राच्या टीमनं मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
भारतात पश्चिम बंगाल या राज्यात कोरोनाचा मृत्युदर सर्वाधिक म्हणजेच 12.8 टक्के असल्याचं केंद्राच्या टीमनं मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन होत असल्यामुळे पूर्व दिल्लीतील दारुची दुकानं बंद करण्यात आली आहे. पूर्व दिल्लीचे पोलीस आयुक्त अलोक कुमार यांनी ही माहिती दिली आहे.
नमस्कार मंडळी,
दुपारचे दोन वाजून गेलेत. सकाळपासून आपण कोरोना व्हायरसविषयीचे अपडेट्स जाणून घेत आहोत. बीबीसी मराठी इथून पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पण, त्यापूर्वी दिवसभरात आतापर्यंत काय घडलं, ते पाहूया.
1. दारू खरेदीसाठी दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील दारुच्या दुकानांबाहेर लांबच लांब रांगा. सोशल डिन्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवल्यामुळे पोलिसांचा लाठीमार.
2. "नांदेडमधल्या हुजूरसाहिबमधून पंजाबला परतणाऱ्या लोकांची तपासणी महाराष्ट्र सरकारनं केली नाही.त्यामुळे आम्हाला अडचणींचा सामना करावा लागतोय." - बलबीर एस. सिंधू, पंजाबचे आरोग्यमंत्री
3. स्थलांतरित कामगारांच्या प्रवास तिकिटातील 85 टक्के खर्च रेल्वे उचलणार आहे आणि त्यातील 15 टक्के रक्कम राज्य सरकार भरणार आहे.
4. वरळीतील रुग्णांची संख्या 1000च्या दिशेनं असताना सरकार मात्र वरळी पॅटर्नचा गाजावाजा करत असल्याची टीका भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केली आहे.
5. लॉकडाऊनच्या काळात 2 मार्च ते 3 मे या कालावधीत महाराष्ट्रात 92,161 गुन्हे दाखल झाले असून 18,216 व्यक्तींना अटक करण्यात आली.
आता पुढचे अपडेट्स पाहूयात....
स्थलांतरित कामगारांच्या प्रवास तिकिटातील 85 टक्के खर्च रेल्वे उचलणार आहे आणि त्यातील 15 टक्के रक्कम राज्य सरकार भरणार आहे.
ज्या लोकांचीप्रतिकारक्षमताचांगली असते, त्यांच्यावर कोव्हिड-19चा प्रघात जास्त मोठा होत नाही, इतकंच कायतेआतापर्यंत लक्षात आलं आहे.
याचंच भांडवल आता आपलीबाजारपेठसुद्धाकरू पाहात आहे.
प्रतिकारक्षमता वाढवण्याचे उपाय वेगवेगळ्या माध्यमांमधून आणि सोशल मीडियावरून सुचवले जात आहेत.
अर्थात हे काही पहिल्यांदाच घडत नाहीये. जेव्हा अशा साथी किंवा आरोग्य संकटं येतात, तेव्हा अशा गोष्टीही दिसून येतात.
1918 साली जेव्हा स्पॅनिश फ्लू आला होता तेव्हासुद्धा अशाचप्रकारच्या घटना, चर्चा होत होत्या. आणि आता 2020मध्येही तेच दिसून येत आहे.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा- अफवा आणि रोगप्रतिकारक्षमता
कोरोना व्हायरसचा धोका नेमका किती मोठा आहे, हे समजून घेण्यासाठी एक आकडा अतिशय महत्त्वाचा आहे.
जगभरातली सरकारं या आकड्याच्या आधारे लोकांचे जीव वाचवण्यासाठीची पावलं उचलतायत.
शिवाय लॉकडाऊन नेमका कधी उठवता येईल, यासाठीचे संकेतही या आकड्यावरून मिळताहेत.
हा आकडा आहे - बेसिक रिप्रॉडक्शन नंबर. म्हणजेच पुनरुत्पादन वा पुनर्निर्मितीचा मूलभूत आकडा. याला म्हटलं जातंय R0 (उच्चार - आर नॉट (0 अर्थात शून्य याला नॉट असंही म्हटलं जातं.)
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा- R0 म्हणजे काय?
वरळीतील रुग्णांची संख्या 1000च्या दिशेने जात असल्याचे सांगत भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी वरळी पॅटर्नवर टीका केली आहे.
नांदेडमधल्या हुजूरसाहिबमधून पंजाबला परतणाऱ्या लोकांची तपासणी महाराष्ट्र सरकारने केली नाही.
तसेच तपासणी न केल्याची माहितीही आम्हाला दिली नाही.
त्यामुळे आम्हाला अडचणींचा सामना करावा लागत आहे असे मत पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीर एस. सिंधू यांनी व्यक्त केले आहे.
दिल्लीतील काश्मीरी गेट परिसरात दारुच्या दुकानाजवळ सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडणाऱ्या लोकांवर पोलिसांनी लाठीमार केला
लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वांच्याच जीवनशैलीत बदल झाले आहेत. रिकामा वेळ असल्याने सहाजिकच जास्त खाल्लं जातं. ताण आणि कंटाळा घालवण्यासाठीही आपण बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त खातो आणि ते आपल्या लक्षातही येत नाही.
लॉकडाऊनमुळे सध्या भरपूर वेळ आहे. भाजीपाला आणि किराणा मालाची दुकानं खुली आहेत आणि हातात यूट्यूब आहे. त्यामुळे रेस्टॉरंट, बेकरी, खाऊगल्ली आणि चौपाटीवर मिळणारे चमचमीत पदार्थ घरी बनवणं सहज शक्य झालं आहे. घरोघरी असे पदार्थ बनवले जात आहेत. व्हॉट्सअॅपवर रोज घरी बनवलेल्या नवनवीन पदार्थांच्या फोटोंवरूनच तुम्हाला याची कल्पना आली असेलच.
तुम्हीसुद्धा सध्या तेलकट, चमचमीत पदार्थ खात असाल तर ही बातमी नक्की वाचा. पूर्ण बातमीसाठी क्लिक करा- लॉकडाऊनमध्ये तुम्ही भरपूर खाताय का?
लॉकडाऊनच्या काळात 2 मार्च ते 3 मे या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 92,161 गुन्हे दाखल झाले असून 18,216 व्यक्तींना अटक करण्यात आली.
आतापर्यंत राज्यात सर्वाधिक गुन्ह्याची नोंद पुणे शहरात (14,752) झाली असून सर्वाधिक कमी सर्वात कमी गुन्ह्यांची नोंद अकोला (7) , रत्नागिरी (75) जिल्ह्यात आहे.
या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी 3 कोटी 32 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.
सकाळी 7 ते रात्री 9 अशी परवानगी दारुच्या दुकानांना मिळाल्यानंतर कर्नाटकमध्ये लोकांनी दारुच्या दुकानाबाहेर रांगा लावल्या आहेत.