JEE, NEET परीक्षांच्या तारखेची घोषणा 5 मेला
JEE, NEETच्या परीक्षांची तारीख येत्या 5 मे रोजी मनुष्यबळ विकास मंत्रालय जाहीर करणार आहे.
You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
JEE, NEETच्या परीक्षांची तारीख येत्या 5 मे रोजी मनुष्यबळ विकास मंत्रालय जाहीर करणार आहे.
काही देशांमध्ये कोरोनापासून बचाव झाल्यानंतरही लोकांना कोरोनाची लागण होत असल्याचं दिसून आलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक प्रमुख मारिया केरखोव यांना याविषयी विचाण्यात आल्यावर त्यांनी सांगितलं, "लोकांची फुफ्फुसं तंदुरुस्त होत आहेत, पण, काही मृत पेशी अजूनही अस्तित्वात असल्याचं समोर आलं आहे. यामुळे पुन्हा लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसून येत आहे."
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर लोकांची रोग प्रतिकारक क्षमता कुठपर्यंत मजबूत राहते, हे समजून घेण्याचा तत्ज्ञ विचार करत आहेत, असंही त्यांनी म्हटलं.
कोरोनाव्हायरसच्या सुरुवातीविषयी त्यांनी सांगितलं, "कोरोनाचा उगम पासून वटवाघुळांपासूनझाला. पण, तो माणसांमध्ये कसा आला, याविषयी नेमकी माहिती मिळालेली नाही."
महाराष्ट्र सरकारनं रेड झोनमधील कंटेनमेंट झोन वगळून इतर परिसरातली दारूची दुकानं उघडण्याची परवनागी दिली आहे. अत्यावश्यक सेवेत न येणारी एका रस्त्यावरची 5 दुकानं सुरू ठेवता येणार आहे.
इराणमधल्या काही मशिदी सोमवारपासून उघडल्या जाणार आहेत. 15 मार्चपासून या मशिदी बंद होत्या.
इराणचे राष्ट्रपती हसन रूहानी यांनी म्हटलं की, देशातील ज्या भागात कोरोनाचा धोका कमी आहे, तिथल्या मशिदी सोमवारपासून उघडण्याची परवानगी दिली आहे
"इथं शुक्रवारची प्रार्थना पूर्वीप्रमाणे पार पाडली जाईल, पण त्यासोबतच कोरोनाविषयक नियमांचं पालनही करावं लागेल," असंही त्यांनी म्हटलं.
16 मे पासून शाळांसाठीही अशीच योजना लागू होईल, असंही ते म्हणाले.
इराणमध्ये कोरोनाचे 96,448 रुग्ण आढळले असून 6,156 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोव्हिड -19 ज्या मुळे होतो तो कोरोना व्हायरस इतका नवा आहे की त्याबाबतीत अनेक गोष्टी आपल्याला अजून कळलेल्या नाहीत. वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस समोर आल्या आहेत.
कुठे आईला कोरोनाचा संसर्ग झालाय पण बाळाला नाही, तर कुठे बाळाला जन्मानंतर कोव्हिड 19 चा संसर्ग झाला खरा पण आईला कोरोनाची बाधा झालेली नव्हती.
काही केसेसमध्ये तर आई कोरोनाबाधित आहे आणि बाळालाही जन्मानंतर काही तासातच कोरोनाची लागण झाली.
पाहा व्हीडिओ –
मुंबईत भारतीय नौदलाच्या चेतक हेलिकाॅप्टर्सनी INHS अश्विनीच्या कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी केली. INHS अश्विनी हे कुलाबा इथलं भारतीय नौदलाचं रुग्णालय कोव्हिडच्या रुग्णांवर उपचार करत आहे.
भारतातल्या अनेक कलाकारांनी एकत्र येत कोरोनाच्या लढ्यात योगदान द्यायचं ठरवलं आहे. त्यासाठी त्यांनी #IforIndia नावाचा एक मोठा अॅट-होम कॉन्सर्ट करायचं ठरवलं आहे, रविवारी संध्याकाळी 7.30 वाजता हा कॉन्सर्ट होणार आहे.
अभिनेता अक्षय कुमारनं ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
नांदेडच्या हजूर साहिबहून पंजाबला परतलेल्या 130 जणांपैकी आतापर्यंत 63 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नवानशहरचे उपायुक्त विनय बुलानी यांनी ही माहिती दिली आहे.
आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या 14 जणांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहे. तर एका व्यक्तीचा रिपोर्ट 14 दिवसाच्या कालावधीनंतर पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत कोणतीही वाढ झाली नसून अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 80 आहे.
गेल्या 2-3 दिवसांपासून रुग्ण वाढीचा वेग मंदावला असला तरी जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
CRPF च्या काही जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे कळल्यानंतर दिल्लीस्थित मुख्यालय पूर्ण सील करण्यात आलय.
(स्रोत : आकडेवारी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय)
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करणारे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, कर्मचारी, तसंच अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी यांना भारतीय वायूदलानं सलामी दिली. जम्मू-काश्मीरमधील दाल लेकवरील हे दृश्य त्याच सलामीचा एक भाग आहे.
गेले काही दिवस आपण पेपरमध्ये आणि टीव्ही चॅनलवर रेड, ऑरेंज, ग्रीन आणि कंटेनमेंट झोन हे शब्द ऐकतो आहे. वारंवार, आरोग्यमंत्री आणि सरकारी अधिकारी या शब्दांचा वापर करत आहेत.
लॉकडाऊन उठवण्यासाठी रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन ठरवण्याचे निकष काय? ते कसे ठरवले गेले? वाचा सविस्तर बातमी इथे.
“कोरोना व्हायरसमुळं अर्थव्यवस्थेला फटका बसलाय. आर्थिक संकटाशी लढण्यासाठी कठोर आणि काहीसे त्रासदायक निर्णय घेतले जातील,” असं सौदी अरेबियाचे अर्थमंत्री मोहम्मद अल-जदान यांनी म्हटलंय.
आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचं त्यांनी म्हटलं.
अल-अरबिया टीव्हीला मोहम्मद अल-जदान यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, अर्थसंकल्पात खर्चात मोठी कपात करेल.
जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश म्हणून सौदी अरेबियाची ओळख आहे. मात्र, कोरोनामुळं घोंघावणाऱ्या संकटात तेलाच्या किंमतींशीही हा देश लढतोय.
तेलाच्या किंमती घटल्यानं चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सौदी अरेबियाला 9 अब्ज डॉलरचा नुकसान सोसावा लागला.
स्पेननं कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी नियम आणखी कडक केलेत. सार्वजनिक वाहनातून प्रवासादरम्यान स्पेनमध्ये मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलंय.
उद्यापासून म्हणजे 4 मेपासून स्पेनमध्ये लॉकडाऊन काहीसं शिथिल करण्यात येणार आहे. मात्र, यामुळं कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी काही नियमही जाहीर करण्यात आलेत.
m
नाशिकहून रेल्वेनं निघालेले 800 हून अधिक स्थलांतरित मजूर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ इथं पोहोचले.
नमस्कार मंडळी,
गेले काही दिवस आपण लाईव्ह पेजच्या माध्यमातून कोरोनासंदर्भातील राज्य, देश आणि जगभरातील अपडेट्स पाहात आहोत. आजच्या घडामोडींकडेही आपलं लक्ष असेल आणि महत्त्वाचे अपडेट तुम्हाला इथं वाचता येतील.
तत्पूर्वी, काल घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात जाणून घेऊया :
कालपर्यंत घडलेल्या घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
�