कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीच
- राज्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे 36 जणांचा मृत्यू झाला. 790 नवे रुग्ण आढळले. 121 रुग्ण बरे होऊन घरी परतले. देशात 2,411 रुग्ण सापडले तर 71 जणांचा मृत्यू झाला.
- कोरोनासंदर्भात माहिती देणारं तसंच सतर्क करणाऱ्या आरोग्यसेतू अॅपवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. नागरिकांचे दैनंदिन तपशील त्यांच्या परवानगीविना घेतले जाणं तसंच डेटा प्रायव्हसी या मुद्यांवरून राहुल यांनी अॅपच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले.
- रेड झोन असलेल्या मुंबई-पुण्यातून जाण्या-येण्यास मनाई आहे. ऑरेंज झोनमध्ये काही अटींसह टॅक्सी-कॅबना वाहतूक करण्याची मुभा आहे, मात्र बस प्रवासाला मान्यता नाही.
- मुंबईहून लखनौला जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांनी काँक्रिट मिक्सरमधून प्रवास केला. इंदूरमध्ये पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ट्रक थांबवून या कामगारांना बाहेर आणलं. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- नाशिक इथून स्थलांतरित कामगारांसाठी भोपाळ आणि लखनौ या दोन ठिकाणांसाठी ट्रेन रवाना करण्यात आल्या. देशभरात साबरमतीहून आग्र्याला तर सुरतहून ओदिशातील बहरामपूरला ट्रेन रवाना झाली.
- दिल्लीत अडकलेल्या UPSC परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या परतीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.
आज इथंच थांबूया. कोरोनासंदर्भातील राज्य,देश तसंच आंतरराष्ट्रीय अपडेट्ससाठी बीबीसी मराठीच्या वेबसाईटवरील लाईव्ह पेजला फॉलो करा.
या पुढील अपडेट वाचण्यासाठी इथे क्लिक करा.