You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

महाराष्ट्रात आज कोरोनाचे 678 नवीन रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या 12,974

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,159 नवे कोरोना रुग्ण, 165 जणांचा मृत्यू

  2. दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0मध्ये कुठे काय सुरू?

  3. आज दिवसभरात काय घडलं?

    नमस्कार मंडळी,

    कोरोना व्हायरसविषयीच्या महाराष्ट, भारत तसंच जगभरातल्या ताज्या घडामोडी बीबीसी मराठी दररोज लाईव्ह पेजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आजचेही महत्त्वाचे अपडेट्स आपण इथं बघितले. आता आपली भेट उद्या होईल.

    पण, टाटा, बाय-बाय करण्यापूर्वी आज दिवसभरात काय काय घडलं त्यावर एकदा नजर टाकूयात.

    1.महाराष्ट्रात रविवारी कोरोनाच्या नवीन 678 रुग्णांची नोंद झाली, तर 27 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळेराज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 12 हजार 974 वर पोहोचली. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे 548 जणांचा मृत्यू झाला.

    2.भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 40 हजार 263 वर पोहोचली, तर आतापर्यंत देशात 1 हजार 306 जणांचा मृत्यू झाला आहे.रविवारी देशात कोरोनाचे 2 हजार 487 नवीन रुग्ण आढळले.

    3."लोकांची फुफ्फुसं तंदुरुस्त होत आहेत. पण, काही मृत पेशी अजूनही अस्तित्वात असल्याचं समोर आलं आहे. यामुळे कोरोनातून बरे झालेल्या लोकांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचं दिसून येत आहे." - मारिया केरखोव, जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक प्रमुख

    4.महाराष्ट्र सरकारनं रेड झोनमधल्या कंटेनमेंट झोनव्यतिरिक्त इतर परिसरातली दारूची दुकानं उघडण्याची परवानगी दिली.

    5.भारतीय लष्कर, वायूदल आणि नौदलाकडून मुंबई, दिल्ली आणि देशातल्या इतर भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांना सलामी देण्यात आली.

    6.रशियात एका दिवसात कोरोनाचे 10 हजार नवीन रुग्ण आढळले. कोरोना व्हायरसच्या प्रसाराला सुरुवात झाल्यापासून पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण आढळले आहेत.

    7.कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरातल्या 185 देशांमध्ये झाला. आतापर्यंत जगभरात कोरोनाचे 34 लाख रुग्ण आढळले असून 2 लाख 44 हजार जणांचा मृत्यू झाला.

    4 मे रोजीच्या घडामोडी वाचण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

    शुभ रात्री. उद्या भेटूयात.

  4. महाराष्ट्रात कोरोनाचे 678 नवीन रुग्ण

    रविवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या नवीन 678 रुग्णांची नोंद झाली, तर 27 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

    राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 12 हजार 974 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे 548 जणांचा मृत्यू झाला आहे.

  5. ब्रेकिंग, पोर्तुगालमधील आणीबाणी संपुष्टात

    पोर्तुगालमधील आणीबाणी मागे घेण्यात आली आहे, तसंच लॉकडाऊनही शिथिल करण्यात येत आहे.

    18 मार्चला पोर्तुगालमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती.

    आता इथली लहान दुकानं सोमवारपासून सुरू होतील, तर मोठ्या दुकानांना जूनपर्यंत वाट पाहावी लागेल.

    1 कोटी लोकसंख्येच्या पोर्तुगालमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 1 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

    आणीबाणी जाहीर करण्यापूर्वीच पोर्तुगालमध्ये शाळा, नाईट क्लब बंद करण्यात आले होते. तसंच जमावबंदी केली होती. इटली आणि स्पेनमधील पर्यटनाला बंदी घातली होती.

  6. या ठिकाणी लॉकडाऊन म्हणजे उपासमार आहे - व्हीडिओ

  7. नागपूरहून 'श्रमिक स्पेशल ट्रेन' लखनऊसाठी रवाना

    नागपूरहून 977 मजूरांना घेऊन 'श्रमिक स्पेशल ट्रेन' लखनऊसाठी निघाली आहे.

  8. हे 98 वर्षांचे डॉक्टर आजोबा कोरोनाग्रस्तांची काळजी घेतायत

  9. मुंबईत कोरोनाचे 441 नवीन रुग्ण

    रविवारी मुंबईत कोरोनाचे 441 नवीन रुग्ण आढळले असून 21 जणांचा मृत्यू झाला आहे.

    मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 8,613 वर पोहोचली असून आतापर्यंत 343 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  10. कोरोना व्हायरसमुळे बांगलादेशमध्ये कपड्यांच्या व्यवसायातले कामगार बेरोजगार

  11. धारावीत कोरोनाचे 94 नवीन रुग्ण

    मुंबईतल्या धारावीत रविवारी कोरोनाचे 94 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

    आतापर्यंत धारावीत कोरोनाचे 590 रुग्ण आढळले असून 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

  12. कोरोनाच्या काळात कोकणातून हापूस आंबा घराघरात कसा जातोय?

    कोरोनानं यंदाच्या हापूसची मोठी कसोटी पाहिली. आंबा पोहोचवण्याचे रस्तेच त्यानं अडवून ठेवले, लॉकडाऊननं राज्यातले बाजार बंद केले.

    काहींना त्याचा तोटा झाला, तर काहींना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा नवा मार्ग सापडला.

    पाहा व्हीडिओ -

  13. कोरोनासाठी R0 म्हणजे काय? R0 हा नंबर जगासाठी महत्त्वाचा का आहे?

  14. भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2 हजार 487 रुग्ण, 83 जणांचा मृत्यू

    भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 40 हजार 263 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशात 1 हजार 306 जणांचा मृत्यू झाला आहे.

    गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2 हजार 487 नवीन रुग्ण आढळले असून 83 जणांचा मृत्यू झाला आहे.

  15. 'रेड झोन' नागपुरात शिथिलता नाही - तुकाराम मुंढे

    नागपूर शहर हे ‘रेड झोन’ मध्ये असल्याकारणाने येथे कुठलीही शिथिलता राहणार नाही. दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये ज्या सवलती होत्या, त्याच कायम राहतील, असे आदेश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले आहेत.

    मुख्यमंत्री कार्यालयानुसार ग्रीन, ऑरेंज झोन्समध्ये सरकारी तसंच खासगी कार्यालयं सुरू केली जाऊ शकतात, तसंच रेड झोनमध्येसुद्धा 30 टक्के कर्मचारी संख्या ठेवून कार्यालयं सुरू केली जाऊ शकतात.

    मात्र मुंढे यांनी जारी केलेल्या आदेशांनुसार, सरकारी आस्थापना अथवा खासगी कार्यालयांना ३० टक्के कर्मचारी संख्या ठेवून कार्य सुरू करण्यास नागपुरात पुढील आदेशापर्यंत बंदी कायम राहील.

    तसंच मद्यविक्रीस देण्यात आलेली मुभासुद्धा नागपुरात दिली जाणार नाही.

    बांधकामाच्या साईट्स, जिथे कामगार राहणार असतील, तिथे परवानगीने कामं सुरू केली जाऊ शकतात, असंही सांगण्यात आलं आहे.

  16. महाराष्ट्रात काय सुरू? काय नाही?

  17. दिल्लीत अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ट्रेनची व्यवस्था करा, महाराष्ट्र सरकारची दिल्ली सरकारकडे मागणी

    महाराष्ट्रातले जे विद्यार्थी दिल्लीत अडकले आहेत, त्यांच्यासाठी स्पेशल ट्रेनची व्यवस्था करावी, जेणेकरून हे विद्यार्थी आपापल्या मूळ गावी परत येतील, अशी विनंती महाराष्ट्र सरकारनं दिल्ली सरकारकडे केली आहे.

    महाराष्ट्र सरकारकडून या विद्यार्थ्यांना राज्यात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    महाराष्ट्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांनी अशा विनंतीचं पत्र दिल्ली सरकारला लिहिलं आहे.

  18. ब्रेकिंग, रशियात एका दिवसात कोरोनाचे 10 हजार रुग्ण

    रशियात एका दिवसात कोरोनाचे 10 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रसाराला सुरुवात झाल्यापासून पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण आढळले आहेत.

    यांतील सर्वाधिक रुग्ण मॉस्को शहरात आढळले आहेत. रशियात आतापर्यंत कोरोनामुळे 1,280 जणांचा मृत्यू झालाय,

    रशियाचे पंतप्रधान मिखाई मिशुस्तिन यांनी म्हटंल की, "मलासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. सध्या माझ्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत आणि तिथूनच मी काम करत आहे."

    रशियात आतापर्यंत कोरोनाचे 1 लाख 34 हजार 687 रुग्ण आढळले आहेत.

  19. कोरोना वॉरियर्सवर देशभरात अशी झाली पुष्पवृष्टी

  20. लॉकडाऊनमुळे समाजाच्या कुठल्या घटकांचं झालं सर्वाधिक नुकसान?

    केंद्र सरकारनं लॉकडाऊनची मुदत आणखी चौदा दिवसांनी वाढवली आहे. मागच्या 25 मार्चपासून देश लॉकडाऊनमध्ये आहे. कोरोना विरोधातली लढाई तर अजून संपलेली नाही.

    अशावेळी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांवर कोरोनाचा उद्रेक आणि लॉकडाऊन यांचा काय आणि कसा परिणाम होतोय याचं विश्लेषण करणारा बीबीसी प्रतिनिधी योगिता लिमये यांचा हा रिपोर्ट पाहा,