You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

लोकांवर नजर ठेवण्यासाठी आरोग्य सेतू अॅपचा आग्रह - राहुल गांधी

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 35 हजार 365 वर पोहोचली आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. अमेरिकेत गेल्या 24 तासांत 1883 रुग्णांचा मृत्यू

    अमेरिकेत कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांसह रुग्णांच्या मृत्यूंची संख्या वाढतच आहे. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत गेल्या 24 तासांत 1883 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

  2. नाशिकहून निघालेल्या श्रमिक स्पेशल ट्रेनचं भोपाळमध्ये आगमन

    लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना घेऊन काल नाशिकहून मध्य प्रदेशकडे रवाना झालेली श्रमिक स्पेशल ट्रेन आज सकाळी भोपाळमध्ये दाखल झाले.

    भोपाळजवळच्या मिसरोड स्थानकावर सर्व प्रवाशांना उतरवण्यात आलं आहे. इथं आरोग्य कर्मचाऱ्यांकडून त्यांची तपासणी करण्यात येईल. त्यानंतर त्यांना त्यांच्या गावी पाठवण्यात येईल, असं प्रशासनानं कळवलं आहे.

  3. कोरोनाविरोधातील लढ्यात गणेश मंडळ कार्यकर्तेही देणार साथ

    गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सध्याची नेमकी गरज, कामाचे स्वरूप आणि सुरक्षिततेच्या उपायाबाबत सविस्तर चर्चा झाली, सामाजिक भान जपत शहरातील 200 मंडळांचे कार्यकर्ते महापालिका, पोलीस यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.असं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.

  4. चीनवर निर्बंध लादण्याचा विचार करत आहोत – ट्रंप

    चीनवर निर्बंध लादण्याचा विचार करत आहोत, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलंय.

    “कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यात चीनला आलेलं अपयश पाहता, चीनवर निर्बंध लादण्याबाबतच्या शक्यता नाकारता येत नाहीत,” असं ट्रंप म्हणाले.

    कँप डेव्हिव या अमेरिकन अध्यक्षांच्या फार्म हाऊसवर जाताना ट्रंप पत्रकारांशी बोलले. 28 मार्चपासून ट्रंप व्हाईट हाऊसच्या बाहेर निघाले नव्हते. आता शनिवार-रविवार ट्रंप फार्म हाऊसवरूनच काम करणार आहेत.

  5. काल दिवसभरात काय घडलं?

    नमस्कार मंडळी,

    गेले काही दिवस आपण लाईव्ह पेजच्या माध्यमातून कोरोनासंदर्भातील राज्य, देश आणि जगभरातील अपडेट्स पाहात आहोत. आजच्या घडामोडींकडेही आपलं लक्ष असेल आणि महत्त्वाचे अपडेट तुम्हाला इथं वाचता येतील.

    तत्पूर्वी, काल घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात जाणून घेऊया :

    1. काल म्हणजे 1 मे रोजी महाराष्ट्रात कोरोनाचे नवीन 1,008 रुग्ण आढळले. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 11,506 झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत राज्यातील 485 जणांचा मृत्यू झाला आहे.

    2. भारतातील कोरोना रुग्णांची कालपर्यंत (1 मे) संख्या 35 हजार 365 वर पोहोचली. कोरोनामुळे आतापर्यंत देशातील 1 हजार 152 जणांचा मृत्यू झाला आहे.

    3. लॉकडाऊनच्या काळात दारू, पान, तंबाखू विक्रीला सरकारनं परवानगी दिली. पण,त्यासाठी काही निर्बंध आहेत.

    4. भारतातील लॉकडाऊन आणखी 2 आठवड्यांसाठी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. आता 17 मेपर्यंत लॉकडाऊन राहील.

    5. परराज्यात अडकलेले मजूर, विद्यार्थी आणि इतरांची रेल्वेनं ने-आण करण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे.

    6. जगभरात कोरोना व्हायरसची लागण होऊन मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत 2 लाख 32 हजार 817 इतकी झाली आहे.

    कालपर्यंत घडलेल्या घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिककरा.