You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लॉकडाऊनच्या काळात आता दारू विक्रीला सशर्त परवानगी
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
लाईव्ह कव्हरेज
आज दिवसभरात काय घडलं?
नमस्कार,
कोरोना व्हायरसविषयीचे अपडेट्स बीबीसी मराठी दररोज लाईव्ह पेजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत.
आजही आपण महत्त्वाचे अपडेट्स पाहिले. उद्या आपली परत भेट होईलच.
पण टाटा, बाय-बाय करण्यापूर्वी आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एकदा नजर टाकूया.
1.शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोनाचे नवीन 1,008 रुग्णआढळले असून राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 11,506 झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत राज्यातील 485 जणांचा मृत्यू झाला आहे.
2.भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 35 हजार 365 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशातील 1 हजार 152 जणांचा मृत्यू झाला आहे.
3.लॉकडाऊनच्या काळात दारू, पान, तंबाखू विक्रीला सरकारनं परवानगी दिली. पण,त्यासाठी काही निर्बंध आहेत.
4.भारतातील लॉकडाऊन आणखी 2 आठवड्यांसाठी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. आता 17 मेपर्यंत लॉकडाऊन राहील.
5. परराज्यात अडकलेले मजूर, विद्यार्थी आणि इतरांची रेल्वेनं ने-आण करण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे.
6. जगभरात कोरोना व्हायरसची लागण होऊन मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत 2 लाख 32 हजार 817 इतकी झाली आहे.
2 मे रोजीच्या ताज्या घडामोडी तुम्ही या ठिकाणी वाचू शकता.
गुड नाईट, उद्या भेटूयात.
नांदेडहून पंजाबला आलेल्या 137 जणांना कोरोनाची लागण
नांदेडहून पंजाबला परतलेल्या137 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. पंजाबचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ओ. पी. सोनी यांनी ही माहिती दिली आहे.
केरळमध्ये कोरोनाचा एकही नवीन रुग्ण नाही
केरळमध्ये शुक्रवारी कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नसल्याची माहिती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे. केरळमध्ये आज कोरोनाचे 9 रुग्ण बरे झाले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी 3 मेनंतर काय होणार याबद्दल काय घोषणा केली?
महाराष्ट्रात कोरोनाचे नवीन 1,008 रुग्ण, एकूण रुग्ण संख्या 11,506
महाराष्ट्रात कोरोनाचे नवीन1,008 रुग्णआढळले असून राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 11,506 झाली आहे.
शुक्रवारी राज्यात 26 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत राज्यातील 485 जणांचा मृत्यू झाला आहे.
स्थलांतरित मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रातून धावणार दोन विशेष ट्रेन
#CoronaPodcast: महाराष्ट्र, देशात आणि जगात आज काय घडलं?
#CoronaPodcast: देशात 17 मेपर्यंत लाॅकडाऊन वाढला पण झोननुसार अनेक गोष्टींना परवानगी. दारुची दुकानही सुरु करण्याचा निर्णय. स्थलांतरितांना रेल्वेनं गावी पाठवण्यास केंद्राती परवानगी. उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग अखेर मोकळा.
पाहा हा लाईव्ह कार्यक्रम -
लॉकडाऊनच्या काळात दारूविक्रीला सशर्त परवानगी
लॉकडाऊनच्या काळात दारू, पान, तंबाखू विक्रीला सरकारनं परवानगी दिली आहे. दारुविक्रीची परवानगी ही सरसकट नसेल, त्यासाठी काही निर्बंध आहेत.
मद्याच्या दुकानात पाचपेक्षा अधिक लोकांनी गर्दी करू नये, असं सरकारनं म्हटलं आहे.
तसंच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यावरही बंधन आहेत.
देशात लॉकडाऊन 2 आठवड्यांनी वाढवला; काय सुरू, काय बंद राहणार?
नाशिक ते भोपाळ ट्रेन धावणार
आज रात्री नाशिकहून भोपाळसाठी रेल्वे सुटणार आहे.
नाशिक रोडहून 343 स्थलांतरित या रेल्वेनं प्रवास करतील. या लोकांची पाण्याची आणि जेवणाची सोय केली गेली आहे.
नाशिक ग्रामीणमधूनही अनेक स्थलांतरित येतील. असे 1000 ते 1200 जण या ट्रेनमधून प्रवास करतील.
ही ट्रेन पहिली 12 डब्यांची होती पण त्यात 6 डबे अधिक जोडले गेलेत. आता 18 डब्यांची ट्रेन धावेल.
कोरोना वॉरियर्सचा तिन्ही सैन्य दल 3 मे रोजी सन्मान करेल– बिपीन रावत
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत आणि तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
त्यांनी मांडलेले मुद्दे -
1.कोरोना लढ्यात सगळ्यात पुढे काम करणारे डॉक्टर, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी या सगळ्या कोरोना वॉरियर्सचे आम्ही आभार मानतो.
2.तिन्ही सैन्य दल 3 मेपासून देशात काही विशेष कार्यक्रम हाती घेतील.
3.श्रीनगरपासून त्रिवेंद्रमपर्यंत वायूदल प्लायपास करेल. यात 6 विंग एयरक्राफ्ट आणि फ़ायटर एयरक्राफ़्ट सहभागी होतील. दुसरा फ्लायपास आसामच्या डिब्रूगढपासून गुजरातच्या कच्छपर्यंत असेल.
4.नौदलाचं जवान 3 मेच्यासंध्याकाळी समुद्री किनाऱ्यावर तैनात राहतील. नौदलातील युद्धनौकांची रोषणाई करण्यात येईल आणि चॉपर्सच्या माध्यमातून दवाखान्यांवर पुष्पवृष्टी करण्यात येईल.
5.लष्कराचे जवान प्रत्येक जिल्ह्यातील काही दवाखान्यांमध्ये माऊंटन बँड डिस्प्ले करतील.
माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
लॉकडाऊन 2 आठवड्यांनी वाढवला
भारतातील लॉकडाऊन आणखी 2 आठवड्यांसाठी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.
आता 17 मेपर्यंत लॉकडाऊन राहील.
स्थलांतरित मजूरांबाबत राज्य सरकारचा आदेश
1.गावी जाण्यासाठी इच्छुक मजूरांची स्थानिक पोलीस स्टेशशनने माहिती गोळा करावी.
2. प्रवास करणाऱ्याांना फ्ल्यूची लक्षणं नाहीत याबाबत डाॅक्टरांनी सर्टिफिकीट द्यावं.
3.आधार, फोन नंबर, पत्ता सर्व माहित घ्यावी.
4.पोलीस उपायुक्त हे यासाठी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील.
भारतात कोरोनामुळे एका दिवसात 77 जणांचा मृत्यू
भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 35 हजार 365 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशातील 1 हजार 152 जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1755 नवीन रुग्ण आढळले असून 77 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कामगार दिनानिमित्त आजचं कार्टून...
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांची पत्रकार परिषद
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत आणि तिन्ही सेनादलांचे प्रमुखे आज संध्याकाळी एक संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करतील.
कोटाहून रांचीला आज दोन विशेष रेल्वे गाड्या
राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना वापस आणण्यासाठी शुक्रवारी दोन विशेष रेल्वे गाड्या कोटा येथून रांचीला धावणार आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ही माहिती दिली आहे.
आंतरराज्यीय वाहतूक करण्याबाबत सरकारचे निर्देश जारी
1.कंटनमेंट झोनमध्ये आत किंवा बाहेर कोणतीही वाहतूक करता येणार नाही.
2.मुंबई, पुणे आणि पिंपरी भागातून बाहेर होणारी वाहतूक काळजीपूर्वक होईल.पालिकेनं कंटेनमेटची सीमा निश्चित केल्याशिवाय होणार नाही.
3.मालेगाव, सोलापूर, अमरावती, यवतमाळ या भागातून वाहतूक करताना काळजी घेणं गरजेचं
4.प्रवास करणाऱ्या व्यक्तींना फ्लू-ची लक्षणं नाहीत हे डॉक्टरांनी प्रमाणित करावं.
5.पाठवणाऱ्या विभागातील अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे, त्या भागातील अधिकाऱ्य़ांशी चर्चा करावी.