लॉकडाऊनच्या काळात आता दारू विक्रीला सशर्त परवानगी

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून राज्याला 1 कोटींची मदत

    राज्य उत्पादन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून राज्याला 1 कोटींची मदत देण्यात आली आहे. मदतीचा धनादेश राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  2. हैदराबादवरून धावली मजूरांसाठीची विशेष रेल्वे

    तेलंगणाची राजधानी हैदराबादहून झारखंडच्या हटियाला एक विशेष रेल्वे आज सकाळी सोडण्यात आली.

    या रेल्वेसाठी तेलंगण सरकारने मागणी केली होती. त्यानुसार केद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या सूचनांचं पालन करून ही रेल्वे झारखंडकडे रवाना झाली.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  3. दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद

    uddhav

    फोटो स्रोत, Getty Images

  4. जे आहेत त्याच्या नोकऱ्या टिकतील किंवा त्यांना पगार मिळतील याचीही शाश्वती नाहीये

  5. अडकलेल्या मजूरांना त्या राज्यातच रेशन कार्डचा उपयोग करता येईल – योगी आदित्यनाथ

    लॉकडाऊनमुळे इतर राज्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशच्या मजूरांना त्या राज्यातच रेशन कार्डचा वापर करता येईल, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं आहे.

    आपल्या रेशन कार्डचा नंबर वापरून त्याचा लाभ मजूरांना घेता येईल. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीमधून धान्य पाकिट पुरवण्यात येतील, असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  6. कोरोनाच्या आडून विरोधकांची गळचेपी करण्याचे सरकारचे प्रयत्न?

  7. महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक घेण्यास परवानगी

    कोरोना व्हायरसचा प्रसार आणि लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील विधान परिषदेची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. पण राज्यपालांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याची शिफारस केल्यानंतर ही निवडणूक घेण्यास आयोगाने परवानगी दिली आहे. पण निवडणुकीदरम्यान कोव्हिड-19 महामारीचा प्रसार टाळण्यासाठी आवश्यक नियम पाळण्याची सूचना करण्यात आली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  8. लाॅकडाऊनमध्ये अनेकांची घराकडे चालायला सुरूवात

  9. महाराष्ट्रात 6 ग्रीन झोन, रेड झोनची संख्या 14 तर ऑरेंज झोन 16

    कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येनुसार देशातील जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव प्रीती सूदन यांनी दिली आहे.

    सूदन यांनी देशातील प्रत्येक राज्यांच्या मुख्य सचिवांना एक पत्र लिहून झोनबाबत माहिती दिली आहे.

    या पत्रात महाराष्ट्रात एकूण 14 जिल्हे रेड झोनमध्ये असून 16 जिल्हे ऑरेंज झोन आहेत. तर राज्यातील ग्रीन झोनमधील जिल्ह्यांची संख्या 6 आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  10. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने ओलांडला 35 हजारांचा टप्पा

    देशातील कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज 35 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत देशात एकूण 35 हजार 43 जणांना कोव्हिड-19 ची बाधा झालेली आहे. त्यापैकी 1147 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

    ताज्या आकडेवारीनसुार, गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झालेले 1993 रुग्ण आढळून आले. तर एकूण 73 रुग्णांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला.

    देशात कोव्हिड-19 मधून बरे होणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. आतापर्यंत देशातील 8889 कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी परतले आहेत, असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  11. पोर्तुगालमधल्या फुटबॉल स्पर्धा 30 मेपासून सुरू

    पोर्तुगालमधील फुटबॉल स्पर्धा 30 मेपासून सुरू होतील, अशी घोषणा पंतप्रधान अँटोनिओ कोस्टा यांनी केली आहे.

    खेळ बंद दरवाजांच्या मागे खेळला जाऊ शकतो. प्रेक्षक कोणताही सामना पाहण्यासाठी येऊ शकणार नाहीत. साखळी सामने असो किंवा अंतिम सामना, खेळ प्रेक्षकांशिवायच होईल, असं कोस्टा म्हणाले.

    पोर्तुगालने गेल्या दीड महिन्यापासून हळूहळू लॉकडाऊन शिथील करण्याचं धोरण स्वीकारलं आहे.

  12. जर्मनीत लॉकडाऊन शिथील

    जर्मनीत लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात आलं आहे. देशातील वस्तू संग्रहालय, कलादालनं, प्राणी संग्रहालय आणि खेळाची मैदानं उघडण्यात येतील. जर्मनीच्या चॅन्सलर एंजेला मर्केल यांनी हा निर्णय घेतला आहे.

    पण यामध्ये काही अटीही असतील. अनेक राज्यांनी काही गोष्टींसाठी पूर्वीपासूनच परवानगी दिली होती. पण लोकांना फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्याची सूचना देण्यात आली आहे. ऑगस्टच्या अखेरपर्यंत लोकांच्या एकत्र येण्यावरची बंदी कायम असेल.

    एंजेला मर्केल

    फोटो स्रोत, Getty Images

  13. प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग करण्यात आलेल्या रुग्णाचा मृत्यू

  14. 10 लाख रुग्ण कोव्हिड-19 मधून बरे

    जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार जगभरात आतापर्यंत 10 लाख रुग्ण कोव्हिड-19 मधून बरे झाले आहेत. एकूण संसर्गाचा विचार केल्यास जगभरात आतापर्यंत 32 लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

  15. जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 2 लाख 32 हजारांवर

    जगभरात कोरोना व्हायरसची लागण होऊन मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत 2 लाख 32 हजार 817 इतकी झाली आहे.

    कोव्हिड-19 मुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. इथं 63 हजार 763 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर इटली आहे. इथं 27 हजार 967 लोकांचे प्राण गेले आहेत.

    कोरोना

    फोटो स्रोत, PA Media

  16. रशियाचे पंतप्रधान मिशुस्तिन यांना कोरोना व्हायरसची लागण

    रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्तिन यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांना सरकारने सेल्फ आयसोलेशनमध्ये पाठवल्याची माहिती स्वतः मिशुस्तिन यांनी दिली.

    रशियाच्या पंतप्रधानांनाच कोव्हिड-19 झाल्यामुळे देशातील नागरिकांना धक्का बसला आहे. पण मिशुस्तिन यांच्या प्रकृतीबाबत जास्त माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यांच्या शरिराचं तापमान 39 डिग्रींपेक्षा जास्त असल्याचं वृत्त एका न्यूज एजन्सीने दिलं होतं.

    मिखाईल मिशुस्तिन

    फोटो स्रोत, Reuters

    फोटो कॅप्शन, मिशुस्तिन यांनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपल्या प्रकृतीची माहिती दिली.
  17. 'एकतर आम्हाला पाणी द्या, नाहीतर आमच्या विहिरीत एखादा विषाणू टाकून द्या'

  18. पाकिस्तानच्या संसदेच्या सभापतींना कोरोनाची लागण

    असद कैसर

    फोटो स्रोत, Getty Images

    पाकिस्तानच्या संसदेचे सभापती आणि पाकिस्तान तहरिक-ए-इंसाफ (PTI) चे वरिष्ठ नेते असद कैसर यांना कोरोनाची लागण झालीय.

    ट्विटर हँडलवरून कैसर यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केलंय.

    24 एप्रिल रोजी असद कैसर हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनाही भेटले होते.

  19. नमस्कार

    गेले काही दिवस आपण लाइव्ह पेजच्या माध्यमातून कोरोनासंदर्भात अपडेट्स पाहात आहोत.

    तत्पुर्वी काल घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी येथे जाणून घेऊ

    1.महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाचे 583 नवीन रुग्ण आढळले असून 27 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाच्या रुग्णांची संख्या 10 हजार 498 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत राज्यातील 459 जणांचा मृत्यू झाला आहे.

    2.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 33 हजार 610 वर पोहोचली आहे, तर कोरोनामुळे आतापर्यंत 1 हजार 75 जणांचा मृत्यू झाला आहे.

    3.जगभरात कोरोनाचे 32 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत आणि 2 लाख 28 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

    4.महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी लवकर निवडणूक घ्या, अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. कोरोना व्हायरसमुळे ही निवडणूक काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती.

    5.कोरोनामुळे मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत अमेरिकेतल्या 3 कोटी नागरिकांच्या नोकरीवर गदा आली आहे.

    6.कोरोना संकटातून सावरण्यासाठी गरिबांना 65 हजार कोटी रुपयांच्या मदतीची गरज असल्याचं रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलं आहे.

    कालपर्यंत घडलेल्या घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.