लॉकडाऊनच्या काळात आता दारू विक्रीला सशर्त परवानगी

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. भारतात 24 तासांत कोरोनाचे 1,993 नवीन रुग्ण,एकूण रुग्णांची संख्या 35 हजार 43

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत कोरोना व्हायरस संदर्भात माहिती दिली.

    त्यांनी मांडलेले मुद्दे –

    1.परराज्यात अडकलेले मजूर, विद्यार्थी आणि इतरांची रेल्वेनं ने-आण करण्याची परवानगी गृह मंत्रालयानं दिली आहे. यासाठी संबंधित राज्यांना एकमेकांशी समन्वय साधावा लागेल.

    2.गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1,993 नवीन रुग्ण आढळले असून देशातील एकूण रुग्णांची संख्या 35,043 झाली आहे.

    3.देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 25.37 टक्के इतका आहे.

    4.देशात 75 हजार व्हेंटिलेटर्सची मागणी होत आहे. त्यापैकी 19 हजार 398 व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत, तर 60 हजार 884 व्हेंटिलेटर्सची ऑर्डर देण्यात आली आहे.

    5.आतापर्यंत 21 लाख पीपीई किट्स राज्यांना पुरवण्यात आले आहेत. देशात दररोज 1 लाख 86 हजार 472 पीपीई किट्स तयार केले जात आहे.

    6.2.71 कोटी N-99 मास्कचीमागणी करण्यात आली आहे, त्यापैकी 2.49 कोटी मास्कची ऑर्डर देण्यात आली आहे. 2 लाख 30 हजार मास्क दररोज तयार होत आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  2. स्थलांतरितांसाठी विशेष रेल्वेनं प्रवासाची परवानगी

    परराज्यात अडकलेले मजूर, विद्यार्थी आणि इतरांची रेल्वेनं ने-आण करण्याची परवानगी गृह मंत्रालयानं दिली आहे. यासाठी संबंधित राज्यांना एकमेकांशी समन्वय साधावा लागेल, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.

    सरकारी पत्रक

    फोटो स्रोत, ANI

    फोटो कॅप्शन, सरकारी पत्रक
  3. कोरोनावर ही औषधं उपयोगी ठरतील का?

    युकेमध्ये प्रायोगिक स्वरुपात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वेगवेगळ्या परिस्थितीत रुग्णांवर 5 प्रकारच्या औषधांचा कसा उपयोग होतोय याचं निरिक्षण केलं जातंय.

    पाहा हा व्हीडिओ रिपोर्ट -

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  4. पुण्यात आज 4 रुग्णांचा मृत्यू

    पुण्यामध्ये शुक्रवारी कोरोनाच्या 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पुण्यातील मृतांचा आकडा 99 वर पोहोचला आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  5. औरंगाबादमधील कोरोनाच्या एका रुग्णाचा मृत्यू

    औरंगाबाद शहरातील गुरूदत्त नगर येथील 47 वर्षीय रुग्णाचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

    सध्या शहरातील घाटीच्या डेडिकेटेड कोव्हिड रुग्णालयात 11 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  6. उद्धव ठाकरेंवरचं संकट टळलं, 21 मे रोजी होणार परिषदेची निवडणूक

  7. पाकिस्तानात लॉकडाऊन अजून शिथिल करण्यात येईल – इम्रान खान

    पाकिस्तानमध्ये उद्योगधंदे सुरू करण्याची परवानगी दिली जाईल. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हे वक्तव्य केलं आहे.

    कोरोनाचे पाकिस्तानात 16 हजार 697 रुग्ण आढळले असून 285 जणांचा मृत्य़ू झाला आहे.

    “इजिप्त आणि इराणच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे,” असं इम्रान यांनी म्हटलंय.

    इम्रान खान

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, इम्रान खान
  8. जगभरात कोरोनाच्या 10 लाख रुग्णांवरील उपचार यशस्वी

    जगभरात कोरोना व्हायरसचे 10 लाख रुग्ण बरे झाले आहेत. ज्या देशांमध्ये कोरोनाचा रिकव्हरी रेट सगळ्यात जास्त आहे, त्या देशांची यादी खालीलप्रमाणे-

    1.अमेरिकेत आतापर्यंत 1,53,947 रुग्ण बरे झाले आहेत. एकूण रुग्णांची संख्या 10,70,026

    2.जर्मनीत आतापर्यंत 1,23,500 रुग्ण बरे झाले आहेत. एकूण रुग्णांची संख्या 1,63,009

    3.स्पेनमध्ये आतापर्यंत 1, 12,050 रुग्ण बरे झाले आहेत. एकूण रुग्णांची संख्या 2,13,435

    4.इटलीत आतापर्यंत 75,945 रुग्ण बरे झाले आहेत. एकूण रुग्णांची संख्या 2,05,463

    5.चीनमध्ये आतापर्यंत 78,523 रुग्ण बरे झाले आहेत. एकूण रुग्णांची संख्या 83,956

    प्रातिनिधिक फोटो

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
  9. पंतप्रधान गरीब कल्याण योजना अयशस्वी – काँग्रेसची टीका

    देशातील उपासमारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पंतप्रधान गरीब कल्याण योजना अयशस्वी झाली आहे. यापुढे भाजप सरकारकडे काही प्लॅन आहे का? अशी टीका काँग्रेस पक्षानं केली आहे.

    स्थलांतरित मजूरांच्या प्रश्नावर मोदी सरकार गप्प का आहे? असाही प्रश्न काँग्रेसनं विचारला आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  10. ‘लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न शून्यावर’

    कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे देशात लॉकडाऊन आहे. एक महिना याला झाला असून हे लॉकडाऊन उघडण्याची शक्यता कमीच आहे. याचा सर्वाधिक फटका भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसला आहे.

    या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार शेती असून या शेतांमध्ये पिकलेल्या मालाला कोणतीही मागणी आलेली नाही. याचं कारण लॉकडाऊन आहे. या सगळ्यामुळे शेतकरी आणि कामगारांची उपजिविका पूर्णतः थांबली आहे. देशातल्या या परिस्थितीबद्दलचा बीबीसीचे प्रतिनिधी निखिल इनामदार यांचा रिपोर्ट.

    पाहा व्हीडिओ –

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  11. तेलंगणाहून पायी चालत मजूर पोहोचले नागपूरला

    लॉकडाऊन असतानाही स्थलांतरित मजूर पायी चालत तेलंगणाहून नागपूरला पोहोचले आहेत.

    याविषयी विचारल्यावर त्यांनी सांगितलं, “आम्ही राज्य सरकारच्या हेल्पलाईनवर संपर्क साधला, पण आम्हाला कोणत्याच सरकारकडून मदत मिळाली नाही. काहींनी उत्तर दिली पण काहीच होणार नाही, असं सांगितलं. तिकडे आमच्याकडे अन्न नव्हतं आणि राहायला जागाही. आम्हाला आमच्या कुटुंबीयांना भेटायचं होतं.”

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  12. नागरिकांच्या सहकार्यामुळेच गोवा ग्रीन झोनमध्ये – डॉ. प्रमोद सावंत

    राज्यातील नागरिकांच्या सहकार्यामुळेच गोवा ग्रीन झोनमध्ये आलं आहे. त्यामुळे पोलिस, वैद्यकीय कर्मचारी आणि नागरिकांचे आभार मानतो, असं गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  13. पालघर झुंडबळीप्रकरणी आणखी पाचजण अटकेत

    लॉकडाऊनच्या काळात गैरसमजातून झालेल्या पालघर झुंडबळीप्रकरणी आणखी पाचजणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज कोर्टासमोर हजर करण्यात येईल.

    याप्रकरणी आतापर्यंत एकूण 115 जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी 9 जण अल्पवयीन असल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  14. '...तर पुन्हा निर्बंध टाकावे लागतील' - उद्धव ठाकरे

  15. 3 तारखेनंतर झोननुसार मोकळीक दिली जाईल - उद्धव ठाकरे

    उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे -

    • रेड झोन म्हणजे ज्वालामुखी, ऑरेंज झोन निद्रिस्त ज्वालामुखी इथं काळजी घेण्याची गरज आहे.
    • ग्रीन झोनमधल्या अटी काढत आहोत.
    • हळुहळू इतर राज्यांतल्या लोकांना पाठवणार
    • बाहेर अडकलेली मराठी माणसं आणणार
    • राज्यातल्या राज्यात अडकेली माणसं घरी जाऊ शकतील, यासाठी येणाऱ्या दिवसांत सोय करू.
    • शेतीला अडचण येऊ देणार नाही. माल वाहतुक सुरू आहे.
    • झुंबड झाली तर पुन्हा निर्बंध टाकावे लागतील.
    • मंत्रालयात काही पॉझिटिव्ह केसेस साडपल्या म्हणून मंत्रालय बंद करावं लागलं.
    • आयुर्वेदिक आणि होमिओपथी डॉक्टरांची फीवर क्लिनिकसाठी मदत घेत आहोत.
    • कुणी प्रेमाने वागलं तर महाराष्ट्र प्रेम करतो.
    • कुणी दगा दिला तर काय करायचं हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं आहे.
  16. राज्याची खरी संपत्ती जनता – उद्धव ठाकरे

    उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे -

    • राज्याची संपत्ती जातेय, पण राज्याची खरी संपत्ती तर जनता असते.
    • जनता वाचली तर रुतलेला आर्थिक गाडा पुढे ढकलता येईल.
    • रेड झोन म्हणजे ज्वालामुखी, ऑरेंज झोन निद्रिस्त ज्वालामुखी
  17. खासगी डॉक्टरांनी उपचारासाठी पुढे यावं – उद्धव ठाकरे

    उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे -

    • ज्यांची ऑक्सिजनची पातळी कमी आहे आणि ज्यांना इतर आजार आहेत, अशा लोकांना तपासणी करून वेगळं करण्याय येतंय. त्यांची कोव्हिडची चाचणी घेण्यात येतेय.
    • मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीच्या महापौर परिचारिका म्हणून काम सुरू करत आहेत.
    • अशा प्रकारे खासगी हॉस्पिटल आणि डॉक्टरांनी अजून दोन पावलं पुढे यायला हवं.
    • वेळेत हॉस्पिटलमध्ये आलात तर जीव वाचवायला सोपं जातं.
    • लक्षणं दिसली तर अंगावर काढू नका.
  18. बीकेसीच्या ग्राउंडवर रुग्णांसाठी तात्पुरतं हॉस्पिटल – उद्धव ठाकरे

    उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे -

    • महाराष्ट्र लढवय्यांचा आहे. त्यामुळे आपण कोरोनाविरुद्ध लढू आणि जिंकू
    • लॉकडाऊन हे गतिरोधक आहे. हे केलं नसतं तर विषाणूचा गुणाकार झाला असता
    • लॉकडाऊन असूनही आकडे वाढतात कारण आधी जे आजारी होते त्यांच्या संपर्कात आलेल्यांना आजार होत आहे.
  19. उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्हमधील प्रमुख मुद्दे –

    • महाराष्ट्राचा हिरक महोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचा विचार होता.
    • पण तसं करता आलं नाही. हा काळ नक्की निघून जाईल.
    • हुतात्म्यांचं स्मरण करून महाराष्ट्राला वंदन करतो
    • 27 वर्ष औरंगजेब महाराष्ट्राशी झुंजला पण यशस्वी होऊ शकला नाही.
    • लढाईची पर्वा नाही. तुमच्या मदतीमुळे मी आधीच जिंकलो आहे.
  20. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद