स्थलांतरित मजूरांची त्यांच्या राज्यातील रवानगी बसने करण्याची सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना केली आहे. पण केंद्राच्या या गाईडलाईन्समध्ये अनेक त्रुटी आहेत. बसने मजुरांचं स्थलांतर अशक्य असून त्यासाठी विशेष रेल्वेच हवी, असं वक्तव्य कौशल्य विकास व अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं आहे.
स्थलांतरित मजुरांना सोडण्याच्या केंद्राच्या घोषणेनंतर लोकांच्या मनात निर्माण झालेली चलबिचलसुद्धा आम्हाला अडचणीची ठरू शकते.
हा खर्चिक विषय आहे. केंद्रानं त्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याचा कार्यक्रम जाहीर करावा. विविध जिल्ह्यात अडकलेल्या कामगारांना घरी जाण्यासाठी 8 दिवसांमध्ये दिलासा नक्की मिळेल, असं मलिक म्हणाले.
राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार केलं नाही तर आम्ही पुन्हा त्यांना शपथ देऊ.
लॉकडाऊन असला तरी एका मेसेजमध्ये सर्व आमदार जमतील.
भाजपमध्ये गेलेले लोक आता परत येण्यासाठी आम्हाला विचारत आहेत, असा दावाही मलिक यांनी केला.