You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

नवीन शैक्षणिक सत्र 1 सप्टेंबरपासून - UGCने घेतले हे मोठे निर्णय

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. कोटा इथं अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांकरता धुळ्याहून बसेस रवाना

    लॉकडाऊनमुळे कोटा येथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी धुळे आगारातून 70 बसेस रवाना झाल्या.

    राज्यात शिक्षणाचा जसा ‘लातूर पॅटर्न’ तयार झाला होता. तसाच राजस्थानमधील कोटा पॅटर्न शैक्षणिक क्षेत्रात प्रसिध्द आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षांची तयारी तेथे करून घेतली जाते. या शिक्षणासाठी महाराष्ट्रातून दरवर्षी हजारो विद्यार्थी कोटा (राजस्थान) येथे जातात.

    कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दळण-वळणाची साधने बंद झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे दीड हजारांवर विद्यार्थी कोटामध्ये अडकले होते. या विद्यार्थ्यांना माघारी आणण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालकांनी शासनास विनंती केली होती.

    काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी यासंदर्भात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांना परत आणण्यासंदर्भात विनंती केली होती.

    लॉकडाऊनच्या काळात देशभरात संचारबंदी लागू असल्याने तसेच राज्यातही जिल्हाबंदी असल्याने कोणालाही पूर्वपरवानगीशिवाय परजिल्ह्यात जाता येत नाही. अशा परिस्थितीत परराज्यातून राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला.

    यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, परिवहन मंत्री ॲड अनिल परब यांनी केंद्र शासन व राजस्थान सरकारशी चर्चा करुन कोटा येथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी यशस्वी बोलणी करुन आज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातून 70 बसेस रवाना केल्यात.

    दोन दिवसांत या बस विद्यार्थ्यांना घेऊन माघारी येतील. कोटामधील (राजस्थान) विद्यार्थ्यांना लवकरात लवकर माघारी आणण्याची विद्यार्थ्याच्या पालकांची मागणी लक्षात राज्य शासनाने राज्याच्या उत्तर सीमेवरील व कोटाजवळचा जिल्हा म्हणून धुळे जिल्ह्यातून बसेस सोडण्याचे नियोजन केले. यासाठी राज्याचे महसुल राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी परिवहनमंत्री यांच्याशी चर्चा करुन धुळे जिल्ह्यातील 70 बसेस उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शविली.

    धुळे ते कोटा हे 630 किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे प्रत्येक बसवर दोन चालकांची नियुक्ती केली आहे. या चालकांना स्वसंरक्षणासाठी परिवहन महामंडळाने आवश्यक साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. त्यात मास्क, सॅनिटायझरचा समावेश आहे. तत्पूर्वी सर्व बस सॅनिटाईझ करण्यात आल्या. या बस मंदसौर, रतलाममार्गे कोटा (राजस्थान) येथे पोहोचतील. व त्यानंतर त्या राज्यातील विद्यार्थ्यांना धुळे येथे आणण्यात येईल.

    धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी संजय यादव, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे येथील विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी आवश्यक ती पावले उचलून तातडीने 70 बसेस सॅनिटायझ करून व बसेसमध्ये आवश्यक त्या सुविधा व वाहनचालकांसह रवाना केल्यात.

  2. पंजाबमध्ये लॉकडाऊन वाढवलं परंतु सकाळी 7-11 दुकानं उघडी राहणार

    कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंजाबमध्ये लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी स्पष्ट केलं.

    दरम्यान लॉकडाऊन लागू असला तरी नागरिकांच्या सोयीसाठी सकाळी 7 ते 11 वेळेत दुकानं उघडी राहतील. पुढच्या 20 तासांसाठी लॉकडाऊन लागू असेल.

  3. सरकारचं आरोग्य सेतू ॲप कोरोनाचा संसर्ग कमी करू शकतं का?

  4. ‘घर मालकानं हाकलल्यामुळे मी आता हॉस्पिटलच्या कोव्हिड-19 वॉर्डबाहेर झोपतो’

  5. प्यायला पाणी नाही, तर हाथ धुवायला कुठून आणू?

  6. कोरोनाची लस शोधण्याचा पुण्यात प्रयत्न - सोपी गोष्ट

  7. आंध्र प्रदेशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1332 वर

    आंध्र प्रदेशात गेल्या 24 तासांत 73 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. त्यामुळे इथल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 1332 वर पोहोचली आहे.

    राज्यात आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झाला असून 287 जण बरे झाले आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

  8. कोरोना व्हायरस : अस्तित्व टिकवण्यासाठी सर्कशींचा झगडा

  9. कोव्हिड-19 मुळे अमेरिकेत 58 हजार 355 जणांचा मृत्यू

    कोव्हिड-19 मुळे अमेरिकेत आतापर्यंत 58 हजार 355 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांतच इथं 2200 कोरोनाग्रस्त रुग्ण मृत्यूमुखी पडले, असं वृत्त एएफपी वृत्तसंस्थेने दिलं आहे. अमेरिकेत आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त व्यक्तींना कोरोना व्हायरसची लागण झालेली आहे. येत्या काळात इथली परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे लोकांनी दक्षता घ्यावी, असं प्रशासनाने सांगितलं आहे.

  10. ‘कोरोनामुळे आलेली प्रवासाची धास्ती दूर झाल्याशिवाय पर्यटन क्षेत्र रुळावर येणार नाही’

  11. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 30 हजारांच्या पार

    देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 30 हजारांच्या पार गेली आहे. तर कोव्हिड-19 मुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येनेही एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

    गेल्या 24 तासांत 73 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1897 नवे रुग्ण आढळून आले. ही एका दिवसातील आतापर्यंतची सर्वाधिक आकडेवारी आहे.

    देशात आतापर्यंत 31 हजार 332 जणांना कोव्हिड-19 झाला आहे. त्यापैकी 7 हजार 695 रुग्ण बरे झाले असून 1007जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

  12. लॉकडाऊननंतर देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकार काय प्रयत्न करणार?

  13. कालच्या घडामोडी, 28 एप्रिलच्या घडामोडी

    भारतीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे की भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा 29,974 इतका झाला आहे. त्यापैकी 7027 जण बरे झाले आहेत तर 937 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 8590 इतकी झाली आहे.

    त्यापैकी 1282 जण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोनामुळे 369 जणांचे बळी गेले आहेत. कालच्या घडामोडी तुम्ही या लाइव्ह पेजवर पाहू शकता.

  14. गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी,

    कसे आहात? घरीच आहात ना? कोरोनाला पळवून लावण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे. राज्य, देश तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोरोनाचे सगळे अपडेट्स तुम्हाला इथे मिळत राहतील. काळजी घ्या.

    भारतीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे की भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा 29,974 इतका झाला आहे. त्यापैकी 7027 जण बरे झाले आहेत तर 937 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 8590 इतकी झाली आहे.

    त्यापैकी 1282 जण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोनामुळे 369 जणांचे बळी गेले आहेत. जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या तीस लाखांहून अधिक झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत दोन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झालाय.

    कोरोनावर उपचारांसाठी सध्या प्लाझ्मा थेरपीची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. मात्र कोव्हिड-19 वर प्लाझ्मा थेरपी ही अजूनही प्रायोगिक पातळीवर असून कोरोनावरील उपचारांसाठी ज्या वेगवेगळ्या उपचारपद्धतींवर काम सुरू आहे त्यापैकी एक आहे, असं ICMR नं स्पष्ट केलं आहे.

    भारतानं चीनला दिलेली पाच लाख रॅपिड टेस्टिंग किटची ऑर्डर रद्द केली आहे. हे टेस्टिंग किट फारसे उपयुक्त ठरत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या ताज्या घडामोडी तुम्ही या लाइव्ह पेजवर पाहू शकता.