शेतकऱ्यांसाठी, व्यापारी वर्गासाठी ठाकरे सरकारचे मोठे निर्णय

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. आसामधील 391 विद्यार्थी कोटा येथून राज्यात परतले

    राजस्थानच्या कोटा येथे शिक्षणासाठी गेलेले आसाममधील 391 विद्यार्थी राज्यात परतले आहेत.

    यापैकी एका विद्यार्थ्यानं म्हटलं, मी माझ्या राज्यात परत आलो आहे, यामुळे मला आनंद झालाय. सरकारनं आमच्यासाठी खूप काही केलंय. मी त्यांचा आभारी आहे.

    दरम्यान, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी कोटा येथे लॉकडाऊनमुळे अडकले आहेत, त्यांना लवकरात लवकर राज्यात वापस आणण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

    प्रातिनिधिक फोटो

    फोटो स्रोत, ANI

    फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
  2. काय खाल्ल्यानं रोगप्रतिकारक क्षमता वाढू शकते?

    सोशल मीडियावरून सध्या कोव्हिड - 19 पासून संरक्षणासाठीचे अनेक उपाय सुचवले जातायत. मग यातलं काय खरं? काही पदार्थ खाऊन रोग प्रतिकारक शक्ती वाढवता येते का? पाहा हा व्हीडिओ–

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  3. अमेरिकेत काही राज्यांकडून लॉकडाऊन संपुष्टात

    अमेरिकेतील काही राज्ये लॉकडाऊन संपुष्टात आणत आहेत.

    कोलोराडो, मिसिसिपी, मिनासोटा आणि टेनेसी या राज्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करत लॉकडाऊन संपवण्याचं जाहीर केलं आहे.

  4. वुहानमधल्या सगळ्या रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

    कोरोनाचा संसर्ग झालेल्या वुहानमधल्या सगळ्या व्यक्तींना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

    "कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण आता हॉस्पिटलमध्ये नाही, सरकारनं सगळ्यांना डिस्चार्ज केलं आहे," असं चीनच्या हेल्थ कमिशनचे प्रवक्ते मी फेंग यांनी म्हटलं आहे.

    वुहान हे चीनमधील तेच शहर आहेत, जिथून कोरोनाच्या प्रसाराला सुरूवात झाली होती.

    दरम्यान, चीनमध्ये 26 एप्रिलला कोरोनाचे फक्त 3 नवीन रुग्ण आढळले असून कुणाचाही मृत्यू झालेला नाही. 25 एप्रिलला कोरोनाचे 11 रुग्ण आढळले होते.

    प्रातिनिधिक फोटो

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
  5. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार

    कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.

    दरम्यान, लॉकडाऊन संदर्भातला निर्णय प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती पाहून तसंच 27 एप्रिलला पंतप्रंधान नरेंद्र मोदींबरोबरच्या बैठकीत चर्चा केल्यानंतर घेण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी

    फोटो स्रोत, ANI

    फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी
  6. दिल्लीत मार्केटमध्ये लोकांची गर्दी

    लॉकडाऊन असतानाही भाजीपाला खरेदी करण्यासाठी लोकांनी दिल्लीतल्या ओखला मार्केटमध्ये गर्दी केल्याचं दिसून आलं.

    देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  7. इटलीमध्ये सलग तीन दिवस मृत्यूचं प्रमाण कमी

    14 मार्चनंतर इटलीमध्ये सर्वांत कमी मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. नागरिक सुरक्षा सस्थेनं, एका दिवसात 260 जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.

    अमेरिकेनंतर कोरोनानं इटलीत सर्वाधिक बळी घेतले आहेत. इटलीत आतापर्यंत 26 हजार 644 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    इटलीत सलग तिसऱ्या दिवशी मृत्यूंच्या संख्येत घट झाली आहे. काल इटलीत 415 जणांचा मृत्यू झाला होता.

    प्रातिनिधिक फोटो

    फोटो स्रोत, EPA

    फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
  8. रविवारी काय घडलं?, 26 एप्रिलला जगभरात तसेच भारतात आणि राज्यात काय घडलं?

    कोरोना व्हायरससंबंधी सुरू असलेल्या बातम्यांचे ताजे अपडेट आम्ही तुम्हाला सातत्याने देत आहोत. तत्पूर्वी काल जगात, देशात आणि महाराष्ट्र राज्यात काय घडलं हे पाहण्यासाठी तुम्ही ही बातमी पाहू शकता.

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

  9. महाराष्ट्रात काय परिस्थिती?

    महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे 8 हजार 68 रुग्ण आढळले असून 342 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात राज्यात कोरोनाचे नवीन 440 रुग्ण आढळले आहेत.

    राज्यात प्लाझ्मा थेरपीची परवानगी मिळाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

    लॉकडाऊन संदर्भातला निर्णय प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती पाहून तसंच 27 एप्रिलला पंतप्रंधान नरेंद्र मोदींबरोबरच्या बैठकीत चर्चा केल्यानंतर घेण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

    मुंबई पोलीस दलातल्या 2 कॉन्स्टेबलचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

    राज्य आणि केंद्राला आर्थिक परिस्थितीतून सावरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्राद्वारे काही सूचना केल्या आहेत.

    प्रातिनिधिक फोटो

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
  10. गुड मॉर्निंग

    गुड मॉर्निंग मंडळी,

    कसे आहात? घरीच आहात ना? कोरोनाला पळवून लावण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे. राज्य, देश तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोरोनाचे सगळे अपडेट्स तुम्हाला इथे मिळत राहतील. काळजी घ्या.

    जगभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 28 लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत 185 देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे.

    अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक 9 लाख 54 हजार 182 रुग्ण आढळले असून 54 हजार 388 जणांचा मृत्यू झाला आहे.

    तसंच अमेरिकेच्या अन्न आणि औषध विभागाने कोरोना रुग्णांसाठी हाइड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध देण्यासंदर्भात इशारा दिला आहे.

    रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार, चीनने आपलं वैद्यकीय पथक उत्तर कोरियाला पाठवलं आहे. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची प्रकृती ठीक नसल्याच्या बातम्या येत आहेत.

    भारताच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 826 एवढी झाली आहे. 26 हजार 917 जणांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे.

    याव्यतिरिक्त, कोव्हिडमधून बरे झाल्यावर पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.