'वाधवान कुटुंबाला पत्र अमिताभ गुप्तांनी स्वतः दिलं होतं'- गृहमंत्री

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,159 नवे कोरोना रुग्ण, 165 जणांचा मृत्यू

  2. एक नजर आजच्या मुख्य घडामोडींवर

    आजचं लाईव्ह कव्हरेज थांबवत आहोत.

    जाता जाता एक नजर आजच्या मुख्य घडामोडींवर

    1.देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 26 हजार 917वर

    2.राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 8 हजारांच्या पार

    3.लॉकडाऊनमुळे कोरोनाचा वेग संथ ठेवण्यात आपण यशस्वी – उद्धव ठाकरे

    4.मृत पोलिसांच्या नातेवाईकांना 50 लाखांची आर्थिक मदत, कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी – गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

    5.ई-कॉमर्स, होम डिलिव्हरीशी निगडीत उद्योगांना सरकारने प्रोत्साहन दिल्यास बेरोजगारी कमी होईल – शरद पवार

    6.कपिल आणि धीरज वाधवान सीबीआयच्या ताब्यात

    कोरोना

    फोटो स्रोत, maharashtra dgipr

  3. मुंबईत आतापर्यंत 762 जण कोरोनामुक्त

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मुंबईतील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या सर्व पातळीवरच्या उपाययोजना परिणामकारक ठरत आहेत.

    महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या प्रभावी उपचार पद्धतीमुळे रुग्ण बरे होण्याचा वेगही वाढतो आहे.

    आतापर्यंत आढळलेल्या 4 हजार 870 रुग्णांपैकी 762 जण बरे होवून घरी परतले आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

  4. ओडिशातील नागरिकांना सुरक्षितपणे परत पाठवा, पटनायक यांची ठाकरे यांच्याकडे मागणी

    महाराष्ट्रातील विविध भागात काम करत असलेल्या आणि लॉकडाऊनमुळे अडकलेल्या ओडिशाच्या नागरिकांना सुरक्षितपणे परत पाठवून देण्याची मागणी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पटनायक आणि ठाकरे यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. या चर्चेत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हेसुद्धा सहभागी झाले होते.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  5. गुजरातमधील कोरोनाग्रस्तांची संख्या 3301 वर

    गुजरातमध्ये गेल्या 24 तासांत 230 कोरोनाग्रस्त रुग्ण वाढले. त्यामुळे इथल्या रुग्णांची संख्या 3301 वर पोहोचली आहे. इथं आतापर्यंत एकूण 155 मृत्यू झाले आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  6. रमा, अवंतिका, सोनपरी की माँसाहेब जिजाऊ, कोणती भूमिका मृणाल कुलकर्णीना सर्वात जास्त आवडते?

  7. ब्रेकिंग, युकेचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन सोमवारी कामावर परतणार

    युकेचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन सोमवारी कामावर परतणार असल्याची माहिती मिळाली आहे.

    जॉन्सन हे तीन आठवड्यांपासून कामापासून दूर होते. त्यांच्या अनुपस्थितीत परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांनी कार्यभार सांभाळला होता. जॉन्सन कामावर परतण्यास उत्सुक आहेत, असं राब यांनी म्हटलं आहे.

    पंतप्रधान जॉ न्सन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना 5 एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात ते एक आठवडाभर राहिले. यात पाच दिवस त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. पण नंतर त्यांची तब्येत सुधारली.

    जॉन्सन

    फोटो स्रोत, Getty Images

  8. अनेक नोकऱ्या जातील असं भाकित पवारांनी का व्यक्त केलं?

  9. 'लॉकडाऊनमुळे युकेमध्ये लोकांचं मानसिक आरोग्य बिघडलंय'

  10. दारुमधून महाराष्ट्राला किती पैसा मिळतो?

    व्हीडिओ कॅप्शन, दारुमधून महाराष्ट्राला किती पैसा मिळतो?
  11. धारावीत 34 नवे कोरोनाग्रस्त, एकूण संख्या 275 वर

    मुंबईतील झोपडपट्टीचा परिसर धारावीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत.

    धारावीत आज 34 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे इथल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 275 वर पोहोचली आहे. धारावीत आतापर्यंत 14 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  12. धारावी कोरोना व्हायरसचा 'हॉटस्पॉट' का झाली?

  13. ब्रेकिंग, मृत पोलिसांच्या नातेवाईकांना 50 लाखांची आर्थिक मदत, घरातील एका सदस्याला नोकरी

    महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे दोन पोलीस मृत्यूमुखी पडले आहेत. या पोलिसांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

    मृत पोलिसांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीही देण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

    प्रकृतीची कोणतीही तक्रार असलेल्या पोलिसाला वा अधिकाऱ्याला तातडीने उपचार मिळावेत याकरिता एक स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष निर्माण करण्यात आला आहे.मुंबईसाठी सहपोलीस आयुक्त नवल बजाज तर महाराष्ट्रासाठी अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे.

    जिल्हा स्तरावर देखील संबंधित पोलिस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक हे अशा प्रकारच्या कक्ष निर्माण करतील. तसेच मुंबईमध्ये दोन हॉस्पिटल हे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येतील. अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्याला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचा आहे. त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी यावेळी केले.

    अनिल देशमुख

    फोटो स्रोत, twitter

  14. 3 मे नंतर महाराष्ट्रात काय सुरु होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काय दिली माहिती? महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीवर शरद पवारांनी लिहिलं पंतप्रधान मोदींना पत्र, याबाबत सांगतायत विनायक आणि आशिष

  15. लाॅकडाऊन 3 मेला संपेल का? महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय?, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याशी चर्चा

  16. ब्रेकिंग, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 26 हजार 917वर

    कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची देशातील संख्या 26 हजार 917 वर पोहोचली आहे. तर कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत एकूण 826 जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

    गेल्या 24 तासात देशात 1975 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली. तर 47 मृत्यूंची नोंद झाली.

    कोव्हिड-19मधून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. आतापर्यंत देशात 5 हजार 914 लोक कोव्हिड-19मधून बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  17. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 8 हजारांच्या पार

    महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 440 नवे कोरोना व्हायरसग्रस्त रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोव्हिड-19 बाधितांचा आकडा आता 8 हजारांच्याही पुढे गेला आहे.

    राज्यात आतापर्यंत 8068 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली. त्यापैकी 1188 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून एकूण 342 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

    आज राज्यात 440 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले. तर 19 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यासोबतच आज 112 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलं.

    कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या राजधानी मुंबईत असून इथं 5407 जणांना कोरोनाची लागण झाली. मुंबईत 204 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पाठोपाठ पुण्यात 1052 व्यक्तींना कोरोना व्हायरसची लागण झाली. त्यापैकी 76 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत.

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

  18. ब्रेकिंग, ई-कॉमर्स, होम डिलिव्हरीशी निगडीत उद्योगांना सरकारने प्रोत्साहन दिल्यास बेरोजगारी कमी होईल – शरद पवार

    ई-कॉमर्स व होम-डिलिव्हरीद्वारे शासनाने व्यवसायांनाप्रोत्साहन देणे आवश्यक आहे. विविध प्रकारचे निर्बंध आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियम यांमुळे पारंपरिक दुकाने आणि स्टोअर कायमस्वरूपी मिळू शकणार नाहीत.

    त्यामुळे सरकारनेच ई-कॉमर्स आणि होम डिलिव्हरीद्वारे त्यांना प्रोत्साहन द्यावे जेणेकरून रोजगार निर्मिती होईल आणि बेरोजगारीची समस्याही कमी होईल, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला केली आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लिहिलेल्या एका पत्राच्या माध्यमातून पवार यांनी या मुद्द्यांकडे सरकारचं लक्ष वेधलं.

    कोव्हिड-19ने शहरी अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचला आहे. विमानवाहतूक, वाहतूक, पर्यटन, आतिथ्य, मनोरंजन, माध्यमे आणि स्वयंसेवी संस्था यांसारख्या उद्योगक्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

    ही परिस्थिती पुन्हा नियंत्रणात आणणेकिंवा आर्थिक सुबत्ता या उद्योगांसाठी कठीण आहे

    .समांतर अशा उत्पादनांची व्यावसायिक मागणी व्यावसायिकांसाठी कठीण वाटू शकते. त्यामुळे उत्पादकांना ग्राहकांच्या मागण्यांचा विचार करून त्यानुसार उत्पादन करावे लागेल, असं पवार म्हणाले.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  19. लॉकडाऊनमध्ये तुम्ही खूप खाताय का?

  20. केरळमध्ये सोशल डिस्टन्सिंगसाठी छत्रीचा प्रयोग

    केरळच्या अलप्पुझा जिल्ह्यातील थानीमुक्कम गावात प्रत्येकाला मास्कसोबतच छत्री बाळगणं अनिवार्य करण्यात आल्याची माहिती मंत्री थॉमस इसाक यांनी दिली.

    कारण दोन उघडलेल्या छत्र्यांमुळे 1 मीटरचं अंतर आपोआप राखलं जातं त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळलाजातो, असं इसाक यांनी सांगितलं.