राज्यात दिवसभरात 394 नवे रुग्ण, 18 मृत्यू, एकूण रुग्ण संख्या 6817वर
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
लाईव्ह कव्हरेज
अर्णव गोस्वामी यांनी मानले सुप्रीम कोर्टाचे आभार
आपल्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमुळे
अटक होण्यापासून संरक्षण दिल्याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे अशा
शब्दांमध्ये रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे
आभार मानले आहेत. आजच्या निकालातून माध्यम स्वातंत्र्याला अधोरेखित केल्याबद्दल
गोस्वामी यांनी न्यायालयांचे आभार मानले आहेत.
ऑस्ट्रेलियानं कोणते उपाय केले?
जगभरातले अनेक देश कोरोनाविरोधात लढण्यासाठी आपापल्या
पद्धतीने उपाययोजना करत आहेत. बीबीसीच्या सिडनीमधील प्रतिनिधी साएमा खलील यांनी
ऑस्ट्रेलियामधील स्थितीची माहिती आपल्यासाठी पाठवली आहे.
दररोज कोरोनाचे शेकडो रुग्ण सापडू
लागल्यावर जवळपास चार आठवडे आधी ऑस्ट्रेलियात सोशल डिस्टन्सिंग अत्यंत काटेकोरपणे
लागू करण्यात आलं.
अनावश्यक सेवा बंद करण्यात आल्या. सर्वांनी हा नवा बदल
स्वीकारला. लोकांनी बाहेर पडणं थांबवलं. सर्व समुद्रकिनारे ओस पडले.
आता तिथली स्थिती बदलू लागली आहे. आज
ऑस्ट्रेलियात 13 नवे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा अर्थव्यवस्थेवरील संभाव्य
परिणाम लक्षात घेऊन सरकारने लोकांसाठी आणि व्यावसायिकांना मदतीचं पॅकेज जाहीर केलं
आहे.
फोटो स्रोत, Getty Images
महागाई भत्त्याबाबतचा निर्णय अमानवी- राहुल गांधी
कोरोनाच्या संकटामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कापणं अमानवी आणि असंवेदनशील असल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
रमजानच्या महिन्यात पंजाबमधली ही मशिद बनली क्वारंटाईन सेंटर
ब्रिटनमध्ये दोन जणांवर कोरोनाच्या लसीची चाचणी
फोटो स्रोत, Getty Images
ब्रिटनमध्ये दोन जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. कोरोनाच्या लसीची मानवी चाचणी करण्याची युरोपमधली ही पहिलीच वेळ आहे.
या चाचणीसाठी किमान 800 जणांची निवड करण्यात आलीये. या 800 जणांपैकी निम्म्या जणांना कोव्हिड-19 ची लस दिली जाईव तर उरलेल्या लोकांना मेनिनजायटिसच्या विषाणूविरोधात लढणारी लस दिली जाईल.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या एका टीमनं तीन महिने संशोधन करून ही लस बनवली आहे.
पंतप्रधान मोदींची सिंगापूरच्या पंतप्रधानांशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे पंतप्रधान ली सेन लुंग यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. कोरोनामुळे तयार झालेले आरोग्याविषयक आणि आर्थिक प्रश्न याबाबत त्यांनी चर्चा केली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
रेमडेसिवयर औषध चाचणीमधून बाहेर
कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी तयार करण्यात आलेलं रेमडेसिवयर औषध रँडम क्लिनिकल चाचणी पार करण्यात अपयशी ठरलं आहे. हे औषध कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी उपयोगी ठरेल अशी आशा होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या कागदपत्रांतून ही माहिती मिळाली आहे. या औषधामुळे रुग्णांचे आरोग्य सुधारल्याचे दिसून आले नाही.
कोरोनामुळे आईच्या कुशीत जाता येईना, मायलेकीची भेट व्हीडिओ कॉलवर
डोनाल्ड ट्रंप म्हणतात कोरोनावर उपाय म्हणून 'डिसइन्फेक्टंट'चं इंजेक्शन दिलं तर?
फोटो स्रोत, Getty Images
कोरोना
व्हायरसवरचा उपचार म्हणून रुग्णाच्या शरीरामध्ये 'डिसइन्फेक्टंट' म्हणजेच निर्जंतुकीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या द्रवाचं इंजेक्शन देता येईल का, याविषयी संशोधन करण्यात यावं असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप
यांनी सुचवलंय.
यासोबतच
रुग्णाच्या शरीरावर UV लाईटचा वापरही या विषाणूवरचा उपचार म्हणून
करण्याची कल्पनाही ट्रंप यांनी मांडली आहे.
सूर्यप्रकाश आणि 'डिसइन्फेक्टंट'मुळे विषाणू मरतात, असा उल्लेख ट्रंप
यांच्यापूर्वी बोलणाऱ्या एका अधिकाऱ्याने केला होता. त्यानंतर ट्रंप यांनी या
कल्पना मांडल्या.
व्हाईट
हाऊसमधल्या टास्क फोर्स ब्रीफिंगदरम्यान ही घटना घडली.
सूर्यप्रकाश आणि
उष्णतेच्या संपर्कात आल्यास कोरोना व्हायरस तुलनेने लवकर कमकुवत होत असल्याचं
अमेरिकन सरकारद्वारे करण्यात आलेल्या संशोधनात आढळल्याचं एका अधिकाऱ्याने
सांगितलं.
थुंकी आणि
श्वसनयंत्रणेतल्या द्रवामधल्या व्हायरसला मारण्यासाठी 'ब्लीच' (Bleach) प्रभावी ठरू शकतं, यामुळे 5 मिनिटांत विषाणू मारला जातो आणि ISOPROPLY मुळे तर
यापेक्षाही लवकर विषाणूचा नायनाट होत असल्याचं संशोधनात आढळल्याचं त्यांनी
सांगितलं.
अमेरिकेच्या
होमलँड सिक्युरिटीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे तात्पुरते प्रमुख विल्यम
ब्रायन यांनी पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती दिली. यानंतर
राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी काही याबद्दलच्या संशोधनासाठी काही सूचना दिल्या.
डॉय डेब्रा
ब्रिक्स यांच्याकडे वळत अध्यक्ष ट्रंप यांंनी विचारलं, "म्हणजे समजा आपण शरीरावर अल्ट्रा व्हायोलेट (UV) किंवा फक्त अत्यंत प्रखर उजेड टाकला तर...मला वाटतं तुम्ही म्हणालात की हे
तपासण्यात आलेलं नाही, आणि तुम्ही या विषयीची चाचणी करणार आहात."
"शिवाय त्वचेमार्फत किंवा इतर कोणत्या प्रकारे
हा लाईट शरीराच्या आत नेता आला तर...मला वाटतं तुम्ही त्याबद्दलही संशोधन करणार
आहात. शिवाय एका मिनिटात विषाणू मारणाऱ्या डिसइन्फेक्टंटबद्दल तुम्ही बोललात. मग
त्यासारखंच काही आपल्याला इंजेक्शनद्वारे देता येईल का? हे देखील तपासून पाहणं इंटरेस्टिंग ठरेल."
यापुढे ट्रंप
म्हणाले, "मी डॉक्टर नाही, पण माझ्याकडे
चांगल्या कल्पना असतात."
ट्रंप यांचे हे
उपाय जीवघेणे ठरू शकतात असा इशारा डॉक्टर्सनी दिलाय. ट्रंप यांच्यावर या
सूचनांमुळे वैद्यकीय क्षेत्रातून टीकेचा भडिमार होतोय.
पेशाने
पल्मनॉलॉजिस्ट (श्वसन यंत्रणेचा अभ्यास) असणाऱ्याडॉ. विन गुप्ता
यांनी NBC न्यूजशी बोलताना सांगितलं, "सफाईसाठी वापरण्यात येणारं कोणत्याही प्रकारचं उत्पादन शरीरामध्ये
इंजेक्शनद्वारे टोचण्याचं हे विधान बेजबाबदार आणि धोकादायक आहे. लोकं सहसा स्वतःचाजीव घेण्यासाठी हा पर्याय वापरतात."
अमेरिकेत
नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या अध्यक्षीय निवडणुकांमधले ट्रंप यांचे प्रतिस्पर्धी
जो बायडेन यांनी याविषयी ट्वीट करत म्हटलंय, "UV लाईट? डिसइन्फेक्टंट इंजेक्शन? अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला एक गोष्ट सुचवतो : जास्त टेस्ट्स
करा आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनासंरक्षक वस्तू
उपलब्ध करून द्या."
लक्षणं नसलेल्या रुग्णांमुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका अधिक वाढतोय?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशभरातील सरपंचांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. पंचायत राज दिवसचं औचित्य साधून त्यांनी कोरोनाच्या संकटकाळात गावपातळीवर काय उपाययोजना करता येतील, याबद्दलही पंतप्रधानांनी भाष्य केलं.
पंचायत राज मंत्री नरेंद्र सिंह तोमर हेदेखील या संवादामध्ये सहभागी झाले.
गावामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी पंतप्रधानांनी 'दो गज दूरी' हा मंत्र दिला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
कोरोनाच्या संकटात अर्थव्यवस्था सावरण्यासाठी देशात आर्थिक आणीबाणी लागू होईल?
मदुराईत लॉकडाऊनचे नियम धुडकावत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड गर्दी
मदुराईमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहनांसाठी ई-पासेस घेण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम या गर्दीमुळे धाब्यावर बसवण्यात आले.
लोकांची गर्दी झाल्यामुळे ऑफिस तात्पुरतं बंद करण्यात आलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
भारतानं गरीबांचा अधिक संवेदनशीलतेनं विचार करायला हवा- अभिजीत बॅनर्जी
नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जींनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, की भारताला गरीबांविषयी अधिक संवेदनशील राहण्याची गरज आहे. लॉकडाऊनमुळे लाखोंच्या संख्येने गरीबांवर परिणाम होत आहे. पण अजूनपर्यंत त्यांना पुरेशा प्रमाणात मदत देण्यात आली नाहीये.
भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 24 मार्चला देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर रोजंदारीवर जगणाऱ्यांना फटका बसू नये म्हणून त्यांना ठराविक रोख रक्कम तसंच अन्नसुरक्षा देण्यासंबंधी घोषणाही करण्यात आली होती.
अभिजीत बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी ईस्थर डफ्लो यांना 2019 सालचं अर्थशास्त्राचं नोबेल मिळालं होतं.
कोव्हिड-19 चा प्रसार थांबविण्यासाठी सरकारनं जी पावलं उचलली ती योग्य असल्याचं त्यांनी म्हटलं.
"मात्र हा आजार दीर्घकाळ चालणारा आहे. जोपर्यंत याची लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत हा संसर्ग सुरूच राहील आणि सध्या तरी याची लस तयार नसल्याचंच दिसत आहे."
फोटो स्रोत, Getty Images
भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 23 हजारांच्या पुढे
भारतात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 23 हजार 77 झाली आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या नवीन आकडेवारीनुसार भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 718 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 4749 जण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.
देशात कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे 6430 रुग्ण असून 283 लोकांचा मृत्यू झाला आहे.
गुजरातमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले 2624 रुग्ण आहेत. 112 लोकांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या 2376 असून मृतांचा आकडा 50 आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
जागतिक आरोग्य संघटना खरंच चीन धार्जिणी आहे का?
जर कोरोनाची साथ वणव्यासारखी जगभरात पसरत असताना WHO अपयशी ठरलंय का? WHO चीनला वाचवायचा खरंच प्रयत्न करतंय का?
आता अमेरिकेने निधी थांबवल्यानंतर WHOचं काय होणार? मुळात ही संघटना चालवतं कोण? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आपण शोधायचा प्रयत्न करणार आहोत. पाहूया सोप्या शब्दांत...गोष्ट WHOची.
व्हीडिओ कॅप्शन, जागतिक आरोग्य संघटना खरंच चीन धार्जिणी आहे का?
भायखळा मार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी लोकांची गर्दी
एकीकडे मुंबईत
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे अजूनही लॉकडाऊनचं गांभीर्यानं
पालन होत नसल्याचं चित्रही दिसत आहे. भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी त्याचंच
उदाहरण म्हणावं लागेल...
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
लॉकडाऊनमध्ये रमजान कसा साजरा करायचा?
कोरोना हे दुसऱ्या महायुद्धानंतरचं सर्वात मोठं आव्हान- अँजेला मर्केल
फोटो स्रोत, Getty Images
कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी आपण सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असं मत जर्मनीच्या अँजेला मर्केल यांनी व्यक्त केलं आहे.
"ही तर संकटाची सुरुवात आहे. आपल्याला या विषाणूसोबत बराच काळ रहायचं आहे. याचा सामना करण्यासाठी जर्मनीला वेगळ्या पद्धतीने तयार राहायला हवं. दुसऱ्या महायुद्धानंतरचं हे सर्वात मोठं आव्हान आहे," असं वक्तव्य अँजेला मर्केला यांनी केलं आहे.
जर्मनीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1,48, 046 झाली आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 5.094 झाली आहे.
कोरोनासंबंधीचे महत्त्वाचे अपडेेट्स
गुडमॉर्निंग,
बीबीसी मराठीच्या लाइव्ह
ब्लॉगमध्ये स्वागत. जगातले आणि देशातले कोरोनाबद्दलचे सगळे महत्त्वाचे अपडेट आपण
इथं पाहणारच आहोत. पण आजचे अपडेट जाणून घेण्यापूर्वी गेल्या 24 तासातल्या
महत्त्वाच्या घडामोडी अगदी थोडक्यात-
भारतात कोरोनाबाधितांची
संख्या 21 हजार 700 झाली आहे. मृतांचा आकडा 686 असून
कोरोनाच्या संसर्गातून 4325 रुग्ण बरेही झाले आहेत.
महाराष्ट्रात 778 नवे रुग्ण सापडले आहेत.राज्यातील
रुग्णांची एकूण संख्या 6427 झाली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या 2 लाख 74 हजार अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 1 हजार रुपये
प्रोत्साहनपर रकमेचे वितरण होणार असल्याचे राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.
1.महसुलासाठी वाईन शॉप्स सुरु करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
अध्यक्ष राज ठाकरे यांनी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
आयसीएमआरने दक्षिण
कोरियन कंपनीकडून 5 लाख कोरोना टेस्टिंग किट्स घेण्याचे
निश्चित केले आहे.