देशातली सर्वांत पहिली कोरोनाची केस केरळमध्ये सापडली.
देशातल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता 10 हजाराहून अधिक झाली आहे. पण केरळमध्ये
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांची संख्या 400 हून अधिक नाही.
सर्वात
आधी कोरोनाचे पेशंट सापडलेल्याकेरळमध्ये स्थिती
नियंत्रणात कशी आली हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. केरळनं केलेल्या उपाययोजना 'केरळ मॉडेल' म्हणून ओळखल्या जात आहेत.
पण त्याचबरोबर देशात आणखी
दोन मॉडेल्सची चर्चा आहे. भिलवाडा आणि आग्रा. यांना भिलवाडा पॅटर्न किंवा आग्रा
पॅटर्नही म्हटलं जात आहे.
केरळ, भिलवाडा आणि आग्रा या
ठिकाणी कोरोना आटोक्यात कसा आला? हाच पॅटर्न आपल्याला देशभरात आणि मुख्य म्हणजे
महाराष्ट्रात राबवता येणार नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होत
आहे.