लक्षणं दिसताच ताबडतोब रुग्णालयात दाखल व्हावं- राजेश टोपे

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. कर्नाटकातील एकूण रुग्णांची संख्या 315 वर

    कर्नाटक राज्यातील कोराना व्हायरस ग्रस्तांची संख्या 315 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 36 रुग्ण वाढले. 315 रुग्णांपैकी 82 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  2. गोव्यात नव्या रुग्णाची नोंद नाही

    महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असताना शेजारील राज्यातून दिलासादायक बातमी आली आहे. गोव्यात आज कोरोना व्हायरसची लागण झालेल्या एकाही नव्या रुग्णाची नोंद झाली नाही. आतापर्यंत राज्यात 7 रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती गोव्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  3. नरेंद्र मोदींनी शेअर केलं कोरोना व्हायरसबाबत जनजागृतीपर गाणं

    कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना करत आहे. त्याचप्रमाणे देशातील नागरिकही आपल्या पद्धतीने कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी होत आहेत.

    कोरोना व्हायरसबाबत सध्या वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जाताना दिसत आहेत. पण त्याला आळा घालण्यासाठी सायबा आणि सायशा गुप्ता या दोन मुलींनी कोरोनाबाबत जनजागृतीपर गाणं बनवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे गाणं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करताना दोन्ही मुलींचं कौतुक केलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  4. नागपूरमध्ये आणखी दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

    नागपूरमध्ये आणखी दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या 58 वर

  5. स्थलांतरित मजूर आक्रमक का झालेत?

    कोविडची साथ पसरल्यानंतर प्रत्येक देशात मुख्यतः दोन समस्या आहेत. एक म्हणजे आरोग्याची आणि दुसरी म्हणजे अर्थव्यवस्थेची. पण भारतात तिसरी मोठी समस्या डोकं वर काढतेय. ती म्हणजे मजुरांची.

    व्हीडिओ कॅप्शन, मुंबईसारख्या हॉटस्पॉटमध्ये एवढे लोक एकत्र रस्त्यांवर का आले.. असा प्रश्न तुम्हालाही पडला अ
  6. रेड झोन वगळता 20 एप्रिलपासून उद्योग सुरु करण्याच प्रयत्न करणार- सुभाष देसाई

  7. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे आयपीएल स्थगित

    भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या इंडियन प्रीमिअर लीग प्रशासकीय समितीने आयपीएलचा 2020चा सीझन पुढील सूचनेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, बीसीसीआयचे सरचिटणीस जय शाह यांनी ही माहिती दिली आहे.

    कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळेदेशभरातील विविध भागात मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली होती. काही जण मे महिन्यात ही स्पर्धा घेतली जाईल, असा अंदाज व्यक्त करत होते. पण आता ही स्पर्धा पुढील सूचनेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. याचाच अर्थ येत्या काळात ही स्पर्धा होण्याची शक्यता धूसर आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  8. परदेशातील 3036 भारतीयांना कोरोना व्हायरसची लागण, 25 जणांचा मृत्यू

    परदेशात अडकलेल्या 3036 भारतीय नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. जगातील 53 वेगवेगळ्या देशात हे भारतीय नागरिक अडकले आहेत. त्यापैकी 25 जणांचा कोव्हिड-19 मुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  9. नाशिकच्या शेल्टर होममध्ये सापडला कोरोनाची लागण झालेला मजूर

  10. वांद्रे सत्र न्यायालयाकडून राहुल कुलकर्णी यांना जामीन

    एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना वांद्रे सत्र न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे.

  11. कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेला वरळी कोळीवाडा नेमका कसा आहे?

  12. अहमदाबादच्या हॉस्पिटलमध्ये हिंदू-मुस्लीम आधारावर कोरोना वॉर्डांची विभागणी

  13. वांद्रे स्टेशन गर्दीप्रकरणी 9 जणांना पोलीस कोठडी

    वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ उत्तर भारतीय स्थलांतरित मजूरांची 14 एप्रिल रोजी मोठी गर्दी जमली होती. लॉकडाऊनच्या काळात अफवा पसरवून गर्दी जमवल्याप्रकरणी आज 9 जणांना 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  14. उद्धव ठाकरे कधीही मंत्री राहिले नाहीत, पण उत्तम प्रशासक आहेत - अशोक चव्हाण

  15. सोलापुरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 12 वर

    सोलापूर शहरात कोरोना व्हायरसची लागण झालेले आणखी दहा रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 12 वर पोहोचली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

    सोलापुरातील पाच्छा पेठ भागात एक रुग्ण काही दिवसांपूर्वी आढळून आला होता. हा व्यक्ती मृत्यूमुखी पडल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्याच्या संपर्कातील एका नर्स महिलेला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं आढळून आलं.

    या दोन्ही रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी केली असता मृत व्यक्तीचा एक नातेवाईक पॉझिटिव्ह आढळून आला. तर पॉझिटिव्ह नर्स महिलेच्या संपर्कातील नऊ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे सर्वजण पाच्छा पेठ परिसरातीलच आहेत.

    यामुळे सोलापुरात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज 12 झाली असून, यातील एक व्यक्ती यापूर्वीच मृत्यू पावला आहे. तर बाकी सर्व 11 रुग्णांवर सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावं, सोशल डिस्टन्स पाळावा असं आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  16. रेड झोन वगळता 20 एप्रिलपासून उद्योग सुरु करण्याचे प्रयत्न करणार- सुभाष देसाई

    1)राज्यातील रेड झोनमधील 12 महापालिका वगळून इतर जिल्हे आणि ग्रामीण भागातील परिस्थितीनुसार उद्योग-व्यापार 20 एप्रिलपासून सुरू करण्याची तयारी राज्याच्या उद्योग विभागाने सुरू केली राज्यातील जवळपास 20 जिल्ह्यांमधील परिस्थिती आटोक्यात आहे.

    2)जिल्ह्याच्या बॉर्डर बंद राहातील,कच्चा माल येऊ देण्याची आणि उत्पादन बाहेर जाण्याची व्यवस्था करण्यात येणार.

    3)कच्चा माल आणि उत्पादन वाहतूक करणाऱ्यांची आरोग्य तपासणी होणार,त्यांना ओळखपत्र देणार.

    4)उद्योग सुरू करताना कामगारांना तिथेच राहण्याची व्यवस्था करावी लागणार.

    5)काम करताना hand sanitizer, social distancing याची काळजी घ्यावी लागणार.

    6)लघु उदयोगाबाबत MIDC मध्ये एकत्र येऊन कामगारांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था करण्याची तयारी दाखवली तर MIDC देखील मदत करेल असा प्रस्ताव आहे.

    7)या जिल्ह्यातील व्यापार उद्योग सुरू करताना विशेष काळजी घेतली जाणार आहे, हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.

  17. कोरोना व्हायरसचा फक्त लॉकडाऊनमुळे पराभव होऊ शकत नाही - राहुल गांधी

    कोरोना व्हायरसचा लॉकडाऊनमुळे पराभव होऊ शकत नाही, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

    त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे -

    1. लॉकडाऊन हा उपाय नाही. ते पॉझ बटन आहे. कोरोना व्हायरसचा लॉकडाऊनमुळे पराभव होऊ शकत नाही, तर तो काही काळ थांबू शकतो.

    2. कोरोनाचा सामना करण्यासाठी टेस्टिंग हे सगळ्यांत प्रभावी शस्त्र आहे. आपला टेस्टिंग रेट 199 प्रति दशलक्ष इतका आहे, तो पुरेसा नाही.

    3. टेस्टिंग नाट्यमयरीत्या वाढवायला हवं. व्हायरस कुठे चाललाय हे ओळखून वेगाने टेस्टिंग करायला हवं. व्हायरसच्या मागे नाही, आपण पुढे चालायला हवं. सरकारला सल्ला आहे की टेस्टिंग वाढवा.

    4. टेस्टिंगचा वापर केवळ रुग्ण ओळखण्यासाठीच नाही, तर शस्त्र म्हणून वापर करायला हवा. रोग कुठे पसरतोय ते ओळखण्यासाठी टेस्टिंग वापरा.

    5. केरळ, वायनाडमध्ये जे यश मिळालंय ते जिल्हा स्तरावरच्या प्रयत्नांमुळे मिळत आहे. त्यामुळे जिल्हा आणि स्थानिक प्रशासन महत्त्वाचं आहे, पंतप्रधानांनी राज्यांना बळ द्यायला हवं.

    6. जितका आणि जिथे पैसा पोहोचालया हवा, तेवढा पोहोचत नाहीये. बेरोजगारी सुरू झालीये आणि येणाऱ्या दिवसांत मोठ्या प्रमाणात बेरोजगारी येईल. या गोष्टी आधीच ओळखून पावलं उचलायला हवी.

    7. लॉकडाऊननंतर एक्झिट रणनीती काय, टेस्टिंगची रणनीती काय याचा आधीच आणि पटकन विचार व्हायला हवा. लॉकडाऊननंतर केसेस वाढू शकतात. तेव्हा काय करणार याची तयारी आधीच हवी.

    8. देशातील काही महत्त्वाचे भाग उघडायला हवे. ते ओळखण्यासाठी टेस्टिंग हवं. भारतात दोन झोन्स हवेत - हॉटस्पॉट झोन आणि नॉन-हॉटस्पॉट झोन.

    9. तुम्ही जेव्हा लॉकडाऊन करता, तेव्हा आजारही बंद असतो, तुम्ही गोष्टी उघडता, तेव्हा आजारही वेगाने बाहेर येतो.

    10. आता आर्थिक संस्थांवर प्रचंड ताण येणार आहे. लोकांचे जीव वाचवणं ही सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट. पण त्याच बरोबर हाही विचार करायला हवा की आपण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होणार नाही.

    11. कोविडवर नियंत्रण नाही मिळवता येत, त्याला मॅनेज करावं लागतं.

    12. स्थलांतरितांच्या मुद्द्याबाबत 2 चुका झाल्या. अचानक लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे गोंधळ झाला. मुख्यमंत्र्यांशी अधिक संवाद साधायला हवा आणि रणनीती आखायला हवी.

    13. जगात दुसरा देश नाही जिथे एवढे स्थलांतरित लोक नाहीत. कदाचित चीनचा अपवाद असेल.

    14. देशांमधली राज्य अनेक अर्थांनी वेगळी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना अधिक स्वातंत्र्य हवं. कधी, कसं लॉकडाऊन हवं, हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावं.

    15. टेस्टिंगची रणनीती नसताना लॉकडाऊन उघडलं तर पुन्हा लॉकडाऊनमध्ये जाण्याची वेळ यावी येईल.

    16. बाकी देश काय करत आहेत याची मला काळजी नाही, मला भारताची चिंता आहे. टेस्टिंगची रणनीती काय? आर्थिक संकटासाठी काय रणनीती? अन्नाचा तुटवडा संभवतो, त्यासाठी सरकार काय करतंय? या गोष्टींची मला मुख्य चिंता आहे. भारताच्या समस्या इतर देशांपेक्षा वेगळ्या आहेत. लढाई आत्ता सुरू झालीये. ही दीर्घकाळ चालणारी लढाई आहे.

    17. आपल्या गोदामांमध्ये असलेलं धान्य गरिबांना द्यायला हवं. रेशन कार्ड नसलं तरी तरी द्यायला हवं. त्यावर मार्ग शोधून काढा. गोदामांमध्ये ओव्हरसप्लाय आहे. ताबडतोब धान्य वाटायला हवं.

    18. देशांमधली राज्य अनेक अर्थांनी वेगळी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना अधिक स्वातंत्र्य हवं. कधी, कसं लॉकडाऊन हवं, हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावं.

    19. बाकी देश काय करत आहेत याची मला काळजी नाही, मला भारताची चिंता आहे. टेस्टिंगची रणनीती काय? आर्थिक संकटासाठी काय रणनीती? अन्नाचा तुटवडा संभवतो, त्यासाठी सरकार काय करतंय? या गोष्टींची मला मुख्य चिंता आहे. भारताच्या समस्या इतर देशांपेक्षा वेगळ्या आहेत. लढाई आत्ता सुरू झालीये. ही दीर्घकाळ चालणारी लढाई आहे.

    20. भारत एकजुटीने लढला तर सहज कोरोनाला हरवू. जर आपण एकमेकांशी लढलो तर गोष्टी अवघड होतील.

    21. लॉकडाऊन झोपडपट्टीत पूर्णतः करणं कठीण असतं. इमारतीत राहणारे आणि झोपडपट्टीत राहणारे यांच्या समस्या वेगळ्या. स्थलांतरितांचे प्रश्न वेगळे. या सगळ्या समस्यांवर लवकर निर्णय घ्यायला हवे. नाहीतर असंतोष वाढेल.सगळ्यांच्या समस्यांच्या बाबतीत सरकारने संवेदनशील असावं आणि पटपट निर्णय घ्यावे.

    22. लॉकडाऊन झोपडपट्टीत पूर्णतः करणं कठीण असतं. इमारतीत राहणारे आणि झोपडपट्टीत राहणारे यांच्या समस्या वेगळ्या. स्थलांतरितांचे प्रश्न वेगळे. या सगळ्या समस्यांवर लवकर निर्णय घ्यायला हवे. नाहीतर असंतोष वाढेल.सगळ्यांच्या समस्यांच्या बाबतीत सरकारने संवेदनशील असावं आणि पटपट निर्णय घ्यावे.

    23. विजय होण्याआधीच विजयाची घोषणा करणं धोकादायक ठरू शकेल. विजयाची घोषणा करण्याची मानसिकता योग्य नाही.

    24. लॉकडाऊन झोपडपट्टीत पूर्णतः करणं कठीण असतं. इमारतीत राहणारे आणि झोपडपट्टीत राहणारे यांच्या समस्या वेगळ्या. स्थलांतरितांचे प्रश्न वेगळे. या सगळ्या समस्यांवर लवकर निर्णय घ्यायला हवे. नाहीतर असंतोष वाढेल.सगळ्यांच्या समस्यांच्या बाबतीत सरकारने संवेदनशील असावं आणि पटपट निर्णय घ्यावे.

    25. विजय होण्याआधीच विजयाची घोषणा करणं धोकादायक ठरू शकेल.विजयाची घोषणा करण्याची मानसिकता योग्य नाही.

    26. भारतात मधुमेह, बीपी, फुफ्फुसांचे आजार, इत्यादींचं प्रमाण जास्त आहे. यात फक्त वयोवृद्धच नाही तर तरुणही आहेत. या सगळ्या लोकांना नॉन हॉटस्पॉट झोनमध्येही जाऊन सांगावं लागेल की त्यांना धोका आहे.

    27. युरोपात धोका वयोवृद्धांना आहे. आपल्याकडे मध्यमवयीन लोकांनाही असू शकतो कारण त्यांना हे सर्व आजार आहेत.

    28. भारताने काळजी घ्यायला हवी की strategic विभागांतल्या कंपन्यांमधलं भाग-भांडवल परदेशी कंपन्यांना घेता येऊ नये.

    29. घाबरण्याचं कारण नाही. या व्हायरसला हरवण्यासाठी एकजूट महत्त्वाची. आपण विभाजित झालो तर व्हायरस जिंकेल.

    राहुल गांधी

    फोटो स्रोत, INC/YOU TUBE

    फोटो कॅप्शन, राहुल गांधी
  18. भारतात दहा लाख लोकांमागे 199 जणांचीच कोरोना चाचणी- राहुल गांधी

    कोरोनाचा सामना करण्यासाठी टेस्टिंग हे सगळ्यांत प्रभावी शस्त्र आहे. आपला टेस्टिंग रेट आहे 199 प्रति दशलक्ष व्यक्ती इतका आहे, तो पुरेसा नाही. टेस्टिंग नाट्यमयरीत्या वाढवायला हवं.

    व्हायरस कुठे चाललाय हे ओळखून वेगाने टेस्टिंग करायला हवं. व्हायरसच्या मागे नाही, आपण पुढे चालायला हवं. सरकारला माझा सल्ला आहे, की टेस्टिंग वाढवा. टेस्टिंगचा वापर केवळ रुग्ण ओळखण्यासाठीच नाही, तर शस्त्र म्हणून वापर करायला हवा. रोग कुठे पसरतोय ते ओळखण्यासाठी टेस्टिंग वापरा.

    राहुल गांधी

    फोटो स्रोत, Getty Images

  19. महाराष्ट्रात आज कोरोनाचे 165 नवीन रुग्ण

    महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाचे 165 नवीन रुग्ण आढळले आहेत. यापैकी 107 रुग्ण एकट्या मुंबईतील आहे. यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 हजार 81 इतकी झाली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  20. लॉकडाऊन मोडणाऱ्यांवर पोलिसांची ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर

    लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी देशभरातले पोलीस ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करत आहेत.

    महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्येही पोलिसांकडून ड्रोन कॅमेरे वापरले जात आहेत.

    लॉकडाऊननंतर मराठवाड्यात ड्रोन कॅमेऱ्याचा पहिला प्रयोग नांदेडमध्ये करण्यात आला.

    पोलीस या ड्रोन कॅमेऱ्याचा वापर कसा करत आहे, यासाठी पाहा हा व्हीडिओ.

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त