भारतात बाधितांची संख्या आता दहा हजारांवर

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. शेतकऱ्यांसाठी राज्याच्या कृषिमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश :

    लॉकडाऊनमधून शेतीची कामे वगळल्यानंतर महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी खालील आदेश दिले आहेत :

    • राज्यात 140 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप 2020 चे नियोजन सुरू करण्यासाठी आवश्यक बियाणे उपलब्ध करुन द्या.जिल्हा, विभागीय स्तरावरील नियोजन 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करा.
    • खरीप नियोजनात शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी आवश्यक सर्व उपाययोजनांचा समावेश करा. जिल्ह्याच्या नियोजनानंतर पालकमंत्र्यांची मान्यता घ्या. त्यानंतर विभाग, राज्यस्तरीय नियोजन पूर्ण करा. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी नियोजन सादर करणार
    • राज्यात 140 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप 2020 चे नियोजन. त्यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी या पिकांचा समावेश. सुमारे 16.57 लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता. केंद्र शासनाकडून 40 लाख मेट्रिक टन खत पुरवठा केला जाणार
    • कृषी विभागाच्या महत्वाकांक्षी योजनांची यशस्वी अमंलबजावणी होणे आवश्यक. शेततळे अस्तरीकरण, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, ठिबक सिंचन या योजनांची नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करा
    दादा भुसे

    फोटो स्रोत, Twitter/@MahaDGIPR

  2. लॉकडाऊन वाढवण्याचे आदेश जारी

    पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी 10 वाजता देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. त्यासंबंधीचे आदेश गृहमंत्रालयातर्फे जारी करण्यात आले आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  3. PPE किट्स, N-15 मास्कच्या विक्रीबाबत महाराष्ट्र सरकारकडून सूचना जारी

    PPE किट्स, N-15 मास्क यांचं उत्पादन, वितरण आणि विक्रीबाबत महाराष्ट्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  4. फडणवीस - केंद्र सरकारवर टीका करून पळ काढणं दुर्दैवी

    वांद्र्यातील परिस्थितीसाठी विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या ट्वीटवरून बोलताना विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी, "अशा स्थितीतही आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करून पळ काढला जात असेल तर ते आणखी दुर्दैवी आहे," असं म्हटलं आहे.

    "कोरोनाविरूद्धचा लढा हा राजकीय नाही, हे कृपया आतातरी लक्षात घ्या. हा लढा आपल्याला गांभीर्यानेच लढावा लागेल, ही पुन्हा एकदा माझी कळकळीची विनंती आहे," असं म्हटलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  5. केंद्र सरकार जबाबदार - आदित्य ठाकरे

    वांद्रे रेल्वेस्थानकाबाहेरील गर्दी आता नियंत्रणात आलीय. मात्र ही घटना तसंच सुरतमध्येही जे मजूर रस्त्यावर येऊन आंदोलन करत होते, हे सगळं केंद्र सरकारनं स्थलांतरित मजुरांना घरी परतण्यासाठी काही योग्य व्यवस्था निर्माण न केल्यानं झालंय, असं पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

    "या लोकांना अन्न किंवा घर नकोय, तर त्यांना घरी परत जायचंय," असंही ते म्हणाले.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  6. ब्रेकिंग - वांद्रे रेल्वे स्टेशन बाहेर हजारो स्थलांरितांची गर्दी

    मुंबईच्या वांद्रे स्टेशनच्या पश्चिमेकडे आज दुपारी शेकडो लोकांनी गर्दी केली. कोरोनाचा मुंबई हॉटस्पॉट असताना शेकडो लोक रस्त्यांवर आल्यामुळे पोलिसांची आणि प्रशासनाची धावपळ झाली.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  7. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयानं ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  8. इंडिगो 4 मे पासून टप्प्या-टप्प्यानं विमानसेवा सुरू करणार

    मे महिन्याच्या 4 तारखेपासून इंडिगो कंपनी टप्प्या-टप्प्यानं विमानसेवा सुरू करेल.

    कोरोना व्हायरस

    फोटो स्रोत, Twitter/PTI

  9. भारतात कोव्हिड-19 ची काय स्थिती आहे?

    भारतातील कोव्हिडसंदर्भात आरोग्य मंत्रालयचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी खालील माहिती दिली.

    • कोव्हिड-19 चा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक शहर, जिल्ह्यात 20 एप्रिलपर्यंत मूल्यांकन केलं जाईल. त्यानंतर निवडक भागात वाहतुकीस परवानगी दिली जाईल. मात्र, जिथं कोरोना पूर्णपणे नियंत्रित आहे, अशाच जागांचा यात विचार केला जाईल.
    • राज्यांच्या समन्वयानं 1 लाख 6 हजार 719 अलगीकरण बेड, 12 हजार 24 आयसीयू आणि 606 कोव्हिड हॉस्पिटल भारतात तयार आहेत. ही संख्या आणखी मोठ्या प्रमाणात वाढवली जातेय.
    • भारतात आतापर्यंत 1 हजार 36 कोरोनाग्रस्त बरे झाले आहेत. काल (13 एप्रिल) एका दिवसात 179 लोक बरे झाले.
    • भारतातील एकूण रुग्णांची संख्या 10 हजार 363 झाली, तर मृतांची संख्या 339 आहे.
    • भारतात गेल्या 24 तासात 1211 नवीन रुग्ण सापडले, तर 31 जणांचा मृत्यू झाला.
    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  10. कामगारांच्या वेतनासंदर्भात तक्रारींसाठी 20 कंट्रोल रूमची स्थापना

    कामगारांच्या वेतनासंदर्भात तक्रारींसाठी केंद्रीय कामगार मंत्रालयानं 20 कंट्रोल रुम आणि तक्रार केंद्र स्थापन केलेते. कामगार मंत्रालयाच्या वेबसाईटवर सर्व माहिती देण्यात आलीय.

  11. पुणे: ससून रुग्णालयातील नर्सला कोरोनाची लागण

    पुण्यातील ससून रुग्णालयतील 34 वर्षीय नर्सला कोरोना व्हायरसची लागण झालीय. या नर्सला अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. ससून रुग्णालयाचे अधिष्ठात डॉ. अजय चंदनवाले यांनी ही माहिती दिली.

    कोरोना व्हायरस

    फोटो स्रोत, Twitter/ANI

  12. नागपुरात आज 9 नवे रुग्ण

    नागपुरात आज 9 नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या 53 वर गेली आहे, अशी माहिती नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

    यापैकी 43 जणांवर उपचार सुरू आहेत तर 10 जणांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजवर नागपुरात 434 रुग्णांच्या चाचण्या निगेटिव्ह आढळल्या आहेत, असंही मुंढेंनी ट्वीट करून सांगितलं.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  13. बुलडाण्यात कोरोनाचे चार नवे रुग्ण आढळले

    बुलडाणा: आधीच्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील चार व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 21 झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिली आहे.

  14. केंद्राच्या मनाईनंतरही महाराष्ट्र सरकारकडून PPE किट्स, एन-95 मास्कची खरेदी

  15. पुण्यात मृतांची संख्या 38 वर पोहोचली

    पुण्यात कोरोना व्हायरसमुळं आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील आरोग्य प्रशासनानं ही माहिती दिली.

    पुण्यातील मृतांची संख्या 38 वर पोहोचली आहे.

    कोरोना व्हायरस

    फोटो स्रोत, Twitter/ANI

  16. धारावीत आणखी दोन रुग्णांचा मृत्यू

    मुंबईतील धारावीत कोरोना व्हायरसमुळं आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं धारावीतील मृत्यूंची संख्या 7 वर पोहोचली आहे. मुंबई महापालिकेनं यासंदर्भातील माहिती PTI ला दिली.

    कोरोना व्हायरस

    फोटो स्रोत, Twitter/PTI

  17. केरळनंतर आता मुंबईतही ‘प्लाझ्मा थेरेपी’च्या चाचणीला सुरुवात

    मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात कोव्हिड-19 रुग्णांवर उपचारासाठी ‘कन्व्हलसेंट प्लाझ्मा थेरेपी’वर अभ्यास सुरू करण्यात आलाय. सोमवारी कोव्हिड-19 मधून पूर्णत बरे झाललेल्या एका डोनरने (दात्याने) नायर रुग्णालयात या थेरपीसाठी रक्तदान केलं.

    कोरोना आजारातून बरे होऊन 20-21 दिवस उलटून गेलेल्या रुग्णांशी रुग्णालयाकडून संपर्क सुरू करण्यात आला असून, ICMR ची परवागी मिळण्यासाठी प्रक्रियाही सुरू करण्यात आलीय.

    राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने नायर रुग्णालयाला परवानगी दिलीय.

    पहिल्या टप्प्यात प्लाझ्मा एकत्र करणार, दुसऱ्या टप्प्यात गंभीर असलेल्या रुग्णांच्या शरीरात प्लाझ्मा इनफ्युज केले जातील.

    बीबीसी मराठीशी बोलताना बी.एल.वाय नायर रुग्णालयाचे अधीष्ठाता डॉ. रमेश भारमल म्हणाले, “ ‘कन्व्हलसेंट प्लाझ्मा थेरेपी’ची ट्रायल सुरू करण्यात आली आहे. यासाठी कोव्हिड-19 वर मात केलेल्या रुग्णांकडून रक्त घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. रुग्णालयाकडून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना संपर्क करण्यात आला आहे. कोरोनामुक्त झालेले रुग्ण यासाठी पुढाकार घेत आहेत.”

    “कोरोनामुक्त होवून 20 ते 21 दिवस पूर्ण झालेल्या रुग्णांचं रक्त घेण्यात येईल. या रुग्णांमध्ये अँटी-बॉडी निर्माण झाल्या असतील. रुग्णांकडून मिळालेला प्लाझ्मा एकत्र करण्यात येईल. सद्यस्थितीत, कोरोनामुक्त झालेल्यांचं रक्त घेणं आणि प्लाझ्मा वेगळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील टप्प्यात हा प्लाझ्मा गंभीर असलेल्या रुग्णांमध्ये इनफ्युज करण्यात येईल, ” असंही डॉ. भारमल पुढे म्हणाले.

  18. नाशिकमधील कोरोनाचा पहिला रुग्ण बरा झाला

    नाशिकमधील कोरोनाच्या पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाचा आता अहवाल निगेटिव्ह आलाय. कोरोनाची लागण झाल्यानं 29 मार्च रोजी या रुग्णाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता हा रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे.

  19. सोलापुरात कोरोनाचा आणखी एक रुग्ण सापडला

    सोलापुरात कोरोनाचा आणखी एक रुग्ण सापडला आहे. दोन दिवसांपूर्वी कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याच व्यक्तीच्या संपर्कातही रुग्ण महिला आली होती.

    सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली.

    सोलापुरात कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या एकूण 67 जणांची तपासणी झाली होती. त्यापैकी 66जणांचा अहवाल निगेटिव्ह आला.

  20. देशाला 'या' सात मुद्द्यांवर रोडमॅप हवाय- काँग्रेसची पंतप्रधानांकडे मागणी

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाला उद्देशून भाषण करताना लोकांकडून सात गोष्टी हव्या असल्याचं म्हटलं.

    मोदींच्या या मुद्दयाचा आधार घेत काँग्रेसने पंतप्रधानांना सात प्रश्न विचारले असून या सात प्रश्नांवर देशाला सरकारकडून रोड मॅप अपेक्षित असल्याचं म्हटलंय.

    काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं, की मोदीजी आता गप्पा पुष्कळ झाल्या. पण कोरोनाशी लढण्यासाठी रोडमॅप तयार आहे का?