You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

भारतात बाधितांची संख्या आता दहा हजारांवर

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आज भाषण, लॉकडाऊनबाबत काय बोलणार?

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दहा वाजता देशाला संबोधित करणार आहेत.

    देशभरात लागू असलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनची मुदत आज संपत आहे. त्यामुळे पंतप्रधान आपल्या भाषणात लॉकडाऊनसंबंधी कोणता निर्णय जाहीर करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

    11 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हीडिओ कॉन्फरन्स केली होती. त्यामध्ये जवळपास सर्वच मुख्यमंत्री लॉकडाऊन वाढविण्याबाबत आग्रही होते.

    त्यामुळे पंतप्रधान लॉकडाऊन वाढवणार का, यावेळी लॉकडाऊन सरसरकट असेल की काही सवलती असतील याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.

  2. आतापर्यंतचे महत्त्वाचे अपडेट्स

    • महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 352 ने वाढून 2334 वर पोहोचली
    • 15 एप्रिलपासून नवी मुंबईतील APMC मधील कांदा, बटाटा मार्केट उघडणार
    • भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 9325 वर पोहोचली, तर मृतांची संख्या 324
    • जगभरातील रुग्णांची संख्या आज 19 लाखांवर, अमेरिकेत सर्वांत जास्त बळी
    • ICUमधून घरी परतलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, कोरोना चाचणी निगेटिव्ह
    • ब्रिटनमध्ये मृतांचा आकडा 11 हजारच्याही पुढे