You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

भारतात बाधितांची संख्या आता दहा हजारांवर

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. IRCTC कडून प्रवाशांना तिकिटाची रक्कम परत मिळणार

    देशातील लॉकडाऊन वाढवल्यानंतर रेल्वेनं प्रवासी वाहतूकही 3 मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

    मात्र रद्द झालेल्या गाड्याच्या तिकिटांचे पैसे IRCTC कडून परत दिले जातील. प्रवाशांनी त्यांचे ई-तिकीट रद्द करण्याची गरज नाहीये. तिकिट भाड्याची पूर्ण रक्कम प्रवाशांच्या खात्यात जमा केली जाईल.

  2. उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर प्रकाश आंबेडकरांचं मत काय?

    महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकारकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेळोवेळी उपाययोजना केल्या जात आहेत.

    उद्धव ठाकरे सरकार करत असलेल्या या उपाययोजनांबद्दल प्रकाश आंबेडकर यांना काय वाटतं? त्यांच्यामते केंद्र आणि राज्य सरकारपैकी सध्याची परिस्थिती कोण नीट हाताळत आहे?

    जाणून घेण्यासाठी पाहा व्हीडिओ

  3. रेल्वेची प्रवासी वाहतूकही 3 मेपर्यंत बंद राहणार

    लॉकडाऊन वाढवल्यानंतर भारतीय रेल्वेनंही प्रवासी वाहतूक सेवा 3 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व प्रमुख शहरातल्या लोकलही या काळात बंद राहणार आहेत.

    या काळात केवळ जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालगाडया सुरु राहणार आहेत.

    रेल्वेच नाही, तर 3 मेपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवाही स्थगित करण्यात आली आहे.

  4. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2455

    राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2455 झाली आहे. आज मुंबईत कोरोनाचे 92 नवीन रुग्ण आढळले आहेत. नवी मुंबईत कोरोनाचे 13 रुग्ण आढळले असून ठाण्यात 1 आणि वसई विरारमध्ये एक रुग्ण आढळून आलं आहे.

    राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिलीये.

  5. महाराष्ट्रातले कोरोना अपडेट्स

    अहमदनगरमधील कोपरगाव इथल्या कोरोनाबाधित महिलेचा नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झालाय. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी ही माहिती दिली. हा जिल्ह्यातील कोरोनाचा दुसरा बळी आहे. याआधी श्रीरामपूर येथील तरुणाचा पुण्यात झाला मृत्यू.

    सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या 10 जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या 10 संशयितांमध्ये 8 पुरुष, 1 महिला आणि 9 महिन्याच्या बाळाचा समावेश आहे.

    उपजिल्हा रुग्णालय, कराड इथल्या कक्षात दाखल असणाऱ्या 6 जणांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. यात 3 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

    नाशिकमधील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णांचे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले असून आज त्याला आज रुग्णालयातून सोडण्यात येणार नाही.

    कोल्हापूर येथे कोरोना कक्षात मृत्यू झालेल्या 3 जणांचे चाचणीसाठी पाठवलेले अहवाल आज मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल.

    रत्नागिरीतील 6 महिन्याच्या मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

  6. राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली समिती

    राज्यावरील कोरोना संकटाचा सर्वस्तरावर प्रभावी मुकाबला करुन कोरोनाला संपवणं, ठप्प पडलेल्या राज्य अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करणं तसंच राज्याची आर्थिक, औद्योगिक, सामाजिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सात मंत्रिमंडळ सदस्यांची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे.

    या समितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील , महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा समावेश करण्यात आला आहे.

  7. भारतात सध्या 1 लाख बेड तयार आहेत

    दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचे 25 ते 30 टक्के रुग्ण कमी असल्याचं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतानं केलेल्या उपाययोजना सांगितल्या. जेव्हा देशात कोरोनाचा एकही पेशंट नव्हता तेव्हाच एअरपोर्टवर स्क्रीनिंग सुरू झालं,

    देशात जेव्हा कोरोनाचे 100 रुग्ण नव्हते, तेव्हाच आपण बाहेरून येणाऱ्या लोकांना क्वारंटाइन करायला सुरूवात केली, देशात जेव्हा 550 रुग्ण होते, तेव्हाच आपण संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला, असं मोदींनी सांगितलं.

    भारतानं कोरोनाला सामोरं जाण्यासाठी केलेल्या तयारीबद्दलही त्यांनी माहिती दिली. कोणत्याही देशात कोरोनाचे 10 हजारहून अधिक रुग्ण आढळले, की पंधराशे ते सोळाशे बेडची गरज भासते. आपण सध्या एक लाख बेडची व्यवस्था केलीये.

    देशात 600 कोविड सेंटर आहेत, जिथे केवळ याच रुग्णांवर उपचार होतील.

  8. नरेंद्र मोदींची सप्तपदी

    या 7 गोष्टींसाठी तुम्ही साथ दिली तर आपला विजय निश्चित होईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

  9. लॉकडाऊनचा त्रास गरीबांना होऊ नये याची काळजी घेणार

    लॉकडाऊन वाढविण्यासंबंधीच्या सरकारी गाइडलाईन उद्या जाहीर केल्या जातील. या गाइडलाईन बनवताना रोजंदारीवर काम करणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली आहे, असं पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटलं.

    देशात अनेक ठिकाणी रबी पिकांची कापणी सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारशी चर्चा करून शेतकऱ्यांना कमीत कमी त्रास होईल, यासाठी काळजी घेतली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

  10. 20 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनच्या नियमांची अधिक कठोर अंमलबजावणी

    3 मेपर्यंत लॉकडाऊनची वाढवण्याची घोषणा करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी लॉकडाऊनचे नियम पूर्वीपेक्षा कठोर असतील हे स्पष्ट केलं आहे.

    पुढच्या आठवड्यात 20 एप्रिलपर्यंत प्रत्येक जिल्हा, तालुक्याचं परीक्षण केलं जाईल. जिथे कोरोनाचे रुग्ण कमी असतील, ज्यांनी संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ज्या क्षेत्रांमध्ये हॉटस्पॉट होण्याची क्षमता कमी असले, तिथेच थोड्याफार सवलती दिल्या जातील, असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं आहे.

    लॉकडाऊन वाढवत असताना देशात अन्नधान्य आणि औषधांचा साठा पुरेसा असल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं.

  11. लॉकडाऊन वाढवताना मोदींनी लोकांकडून मागितल्या या 7 गोष्टी

  12. भारतात 3 मेपर्यंत असणार लॉकडाऊन

    भारतात ्र3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा.

    राज्य सरकारांशी चर्चा करून लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती.

  13. नागरिकांच्या सहकार्यामुळेच कोरोनामुळे होणारं नुकसान आटोक्यात

    नागरिकांच्या सहकार्यामुळेच कोरोनामुळे होणारं नुकसान काही प्रमाणात टाळण्यात भारताला आतापर्यंत यश मिळालं आहे. देश प्रयत्नपूर्वक कोरोनाच्या संकटाशी लढत आहे.

    आपण जी सामूहिक एकता दाखवत आहोत, घटनेतील ‘we the people’ या उक्तीला प्रत्यक्षात आणत आहोत, ती

    डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना खरी श्रद्धांजली आहे.

    हा वेगवेगळ्या सणांचा काळ आहे. बैसाखी, विशु, पोयला बैशाख…अनेक राज्यात नवीन वर्षाची सुरूवात झालीये. पण लोक ज्या संयमानं आपल्या घरात राहून सण साजरा करत आहेत, ते प्रेरक आहे.

  14. भारतात बाधितांची संख्या आता दहा हजारांवर

  15. चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग सुरूच

    कोरोना व्हायरसचा संसर्ग आटोक्यात आल्याचा दावा चीनकडून केला जात आहे. मात्र अजूनही चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याची काही प्रकरणं समोर येत आहेत.

    सोमवारी (13 एप्रिल) चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले 89 रुग्ण आढळले, तर रविवारी (12 एप्रिल) कोरोनाचे 108 नवीन रुग्ण आढळले होते.

    हे नवीन रुग्ण रशियाच्या सीमेला लागून असलेल्या हेलॉगजियांग प्रांतातून चीनमध्ये दाखल झालेले चिनी नागरिक आहेत.

    चीनमध्ये अजूनही कोरोनाचे रुग्ण सापडत असताना कोरोनावर नियंत्रण मिळविल्याच्या चीनच्या दाव्यावर किती विश्वास ठेवायचा? इथं क्लिक करून सविस्तर बातमी वाचा.

  16. खासगी लॅबमधील मोफत कोरोना चाचणीबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टानं बदलला

  17. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दहा हजारांच्या पुढे

    भारतात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा दहा हजारांच्या पुढे गेला आहे. देशात कोरोनाचे 10,363 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

    कोरोनामुळे आतापर्यंत 339 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

  18. कोरोनाचं संकट आणि डॉ. आंबेडकरांचा अर्थविचार

    दिवसागणिक खचत जाणारी अर्थव्यवस्था हे कोरोनाने उभं केलेलं दुसरं आणि न टाळता येणारं संकट. कोरोनाच्या लढाईच्या परिणामत: ज्या आर्थिक अरिष्टाकडे आपण चाललोय, तिथे अस्तित्वात असणारी आर्थिक विषमता आणखी वाढेल, असं भाकित वर्तवलं जातंय.

    जिथं विषाणूपेक्षा विषमतेमुळे होणारं मानवजातीचं नुकसान अधिक आणि अटळ आहे, तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अर्थविचार उपचार म्हणून आवश्यक आहे.

  19. सोनिया गांधी यांचंं देशवासियांना आवाहन

    काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी एक व्हीडिओ प्रसिद्ध करून कोरोनाविरोधातल्या लढाईत नागरिकांनी दिलोल्या योगदानाबद्दल आभार मानले आहेत.

    तसंच त्यांनी डॉक्टर्स, नर्स, आरोग्यसेवक, सफाई कर्मचारी, समासवेक आणि सुरक्षा यंत्रणांचे लोक उपकरणं आणि साधनांची कमी असून देखील काम करत असल्याचं म्हटलंय. पण लोकांनी साथ दिली तरच त्याच्या प्रयत्नांना यश येईल, असं सोनिया गांधींनी सांगितलं आहे.

    सकारी कर्मचाऱ्यांच्या कामाचीही त्यांनी स्तुती केली आहे.

    डॉक्टरांशी सौजन्यानं वागा, त्यांच्यासोबत गैरवर्तन करू नका, असं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं आहे.

    काँग्रेसचे कार्यकर्ते सर्वांच्या मदतीसाठी तयार आहेत. काँग्रेस सरकारमध्ये असो वा विरोधात ती या लढाईत सर्व लोकांच्या बरोबर आहे, असंही त्यांनी म्हटलंय

    स्वतःची सुरक्षा करा, घरात रहा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.