भारतात बाधितांची संख्या आता दहा हजारांवर

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. ओमिक्रॉन व्हेरियंटच्या संसर्गाची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?

  2. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,159 नवे कोरोना रुग्ण, 165 जणांचा मृत्यू

  3. कोरोनाच्या संकटात बाबासाहेबांची आज काय भूमिका राहिली असती?

  4. भारतात कोरोना रुग्णांची संख्या 10 हजारांवर

    सुप्रभात. कोरोनासंदर्भातले देशातले आणि जगभरातले अपडेट तुम्ही इथे जाणून घेऊ शकता. पण त्यापूर्वी मंगळवारी दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात आढावा.

    • भारतात लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.
    • भारतातील एकूण रुग्णांची संख्या 10 हजारांवर पोहोचलीय. सध्या देशात 10363 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत तर 353 जणांचा मृत्यू झालाय.
    • महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 350ने वाढून 2,684 वर पोहोचलीय, तर मुंबई महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या 1756 वर पोहोचलीय
    • मुंबईतील वांद्रे रेल्वेस्थानकाबाहेर स्थलांतरितांनी मोठी गर्दी केली. ट्रेन सुरू होणार असल्यानं लोक इथं जमले होते.
    • केरळनंतर आता मुंबईतही ‘प्लाझ्मा थेरेपी’च्या चाचणीला सुरुवात झाली.
  5. ट्रेनबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार - अनिल देशमुख

    ट्रेन सुरू होणार असल्याच्या ज्यांनी अफवा पसरवल्या, त्यांचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसंच, चौकशी करून अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

    मुंबईतील वांद्रे रेल्वेस्थानकाबाहेर हजारोंच्या संख्येत स्थलांतरितांनी गर्दी केली होती.

    कोरोना व्हायरस

    फोटो स्रोत, Twitter/Anil Deshmukh

  6. उद्धव ठाकरेंचा स्थलांतरितांना हिंदीतून संदेश

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  7. आजचा #CoronaPodcast

    आज दिवसभरात काय घडलं सांगतायत आशिष दीक्षित आणि विनायक गायकवाड

  8. 'लॉकडाऊन म्हणजे लॉकअप नव्हे' - उद्धव ठाकरेंचा स्थलांतरितांना संदेश

  9. महाराष्ट्रातील मृतांची संख्या 178 वर पोहोचली

    कोरोनाची लागण झालेल्या 18 जणांचा आज मृत्यू झाला. त्यामुळं मृतांची एकूण संख्या 178 वर पोहोचली आहे.

    आज मृत्यू झालेल्यांपैकी मुंबईतील 11, पुण्यातील 4, तर अहमदनगर आणि औरंगाबाद येथील प्रत्येक एका रुग्णाचा समावेश आहे. तसंच, एक रुग्ण राज्याबाहेरील आहे.

  10. महाराष्ट्रात कोरोनाची आजची स्थिती काय आहे?

    • महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या 2684 वर पोहोचलीय
    • आज राज्यात 350 नवीन रुग्णांची वाढ झाली
    • कोरोनाची लागण झालेल्या 18 जणांचा आज मृत्यू झाला. एकूण मृत्यूंची संख्या 178 झालीय.
    • राज्यात आजपर्यंत 259 जण बरे होऊन घरी परतले
    • मुंबई महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या 1756 वर पोहोचलीय
  11. धारावी, कोळीवाडा, जिजामाता नगरात HCQऔषध देणार – राजेश टोपे

    धारावी, कोळीवाडा, जिजामाता नगरातहायड्रोक्सीक्लोरोक्वीन (HCQ) हे औषध दिले जाणार आहे. मात्र, यातून 15 वर्षाखालील मुले, हृदय वयकृत संबंधित आजार असलेल्याव्यक्तींना वगळण्यात येईल.

    या भागात साधरणत: दोन लाख एवढी लोकसंख्या आहे.

    आरोग्य विभागाच्या निर्देशाच्या अनुषंगाने गठित करण्यात आलेल्या तज्ञ डॉक्टरांच्या समितीच्या शिफारसीनुसार, मुंबईमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आणिकोरनाची व्याप्ती रोखण्याच्या उद्देशाने हे औषध दिले जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

    “या औषधामुळं रुग्ण संख्येत घट, त्याचा संसर्ग आणिसंभाव्य गुंतागुंत,तसेच रुग्णांचा मृत्यू दर कमी होण्यास मदत होईल.राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या संयुक्त कमिटीने औषध देण्याबाबत निर्णय घेतला,” असेही राजेश टोपे यांनी सांगितलं.

    कोरोना व्हायरस

    फोटो स्रोत, Twitter/Rajesh Tope

  12. हॉटस्पॉट मुंबईत लॉकडाऊनचे तीनतेरा: वांद्रे स्थानकाबाहेर स्थलांतरितांची गर्दी

  13. ही वेळ राजकारणाची नाही, राजकारण करायला आयुष्य पडलंय - उद्धव ठाकरे

    • प्लाझ्मा ट्रीटमेंट आणि बीसीजी लस यांच्या प्रयोगासाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे.
    • संकट काळात महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली आहे. न जाणो महाराष्ट्र जगाला दिशा दाखवेल. या प्रयोगांत आपण नक्की यशस्वी होऊ.
    • मूळ तुटवडा आहे आहे तो PPE वगैरेंचा. तो पूर्ण जगात आहे. या संकट काळात काही उद्योजक आपल्या राज्याला, देशाला मदत करायला पुढे येताहेत.
    • ही वेळ राजकारणाची नाही. राजकारण करायला आयुष्य पडलंय. आत्ताची वेळ एकजुटीने लढण्याची आहे.
  14. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहणार - उद्धव ठाकरे

    • बळीराजा हा आमचा आत्मा. अन्नदात्याला लॉकडाऊनमध्ये कुणी अडवणार नाही, अशा सूचना दिल्या आहे. शेतीविषयक कामं, शेतीचा माल यांची ये-जा सुरू राहणार.
    • जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहणार
    • या विषाणूला आपण बऱ्यापैकी थोपवलं आहे. 10 जिल्ह्यांत विषाणू प्रवेश करू शकला नाही
    उद्धव ठाकरे

    फोटो स्रोत, Youtube/Shivsena

  15. आरोग्य आणि आर्थिक संकटांशी लढण्यासाठी टास्क फोर्स

    उद्धव ठाकरे यांनी यावेळी आरोग्य आणि आर्थिक विषयांसंबंधी स्थापन केलेल्या टास्क फोर्सची माहिती दिली.

    “डॉक्टरांची एक टास्क फोर्स बनवली आहे. ट्रीटमेंट कशी असावी, याबद्दल संपूर्ण आरोग्य सेवेला या टास्क फोर्समधले डॉक्टर मार्गदर्शन करतील,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

    तसंच, “कोव्हिडचं संकट गेल्यावर आर्थिक संकट येईल. त्याचा सामना करण्यासाठी एक मंत्रिगट स्थापन झाला. अजित पवार त्यांचं नेतृत्व करतील. तसंच डॉ. माशेलकर, अजित रानडे, दीपक पारेख, विजय केळकर यांसारख्या अर्थतज्ज्ञांची समिती बनवली आहे,” अशीही माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

  16. महाराष्ट्रात सगळ्यांत जास्त चाचण्या - उद्धव ठाकरे

    • आज आंबेडकर जयंती होती. तुम्ही बाबासाहेबांना घरातूनच मानवंदना दिली, यासाठी मला भीमसैनिकांना धन्यवाद द्यायचे आहेत. बाबासाहेबांनी विषमतेविरोधात लढा दिला. आज जग विषाणूविरोधात लढतंय.
    • मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आपण राज्यातला लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवत आहोत. पंतप्रधान मोदी यांनी आज तो 3 मेपर्यंत वाढवला आहे. हा लॉकडाऊन वाढवल्याबद्दल मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो.
    • महाराष्ट्रात काही विचित्र नाही चाललं. महाराष्ट्रात सगळ्यांत जास्त चाचण्या.
    • महाराष्ट्र सरकार खंबीर आहे, धैर्याने मुकाबला करतंय. जे शक्य ते सगळं करत आहोत.
    • तनिष्क मोरे नावाच्या 6 महिन्याच्या बाळाने कोरोनाला हरवलं. त्याच्या आईशी बोललो. कोरोनावर मात केलेल्या एका आजीशीही बोललो.
    उद्धव ठाकरे

    फोटो स्रोत, YouTube/ShivSena

  17. मालेगावात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 34 वर पोहोचली

    मालेगावमध्ये कोरोना व्हायरसचे पाच नवे रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णांची संख्या 34 वर पोहोचलीय. मालेगावात कोरोनामुळं आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झालाय.

  18. उद्धव ठाकरे यांचं भाषण

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला संबोधित करत आहेत.

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  19. वांद्रे स्थानकावर नेमकं काय झालं?

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  20. आदित्य ठाकरेंची सारवासारव

    वांद्र्याच्या घटनेची केंद्र सरकारने दखल घेतली असून राज्य सरकारला त्यांचं पूर्ण सहकार्य आहे, असं ट्वीट आदित्य ठाकरेंनी आता केलं आहे.

    “आम्ही केंद्र आणि राज्य सरकारांसमोरचा यक्षप्रश्न समजतो. मी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे आभार मानतो की ते परिस्थिती समजून स्थलांतरितांच्या राज्यांची सुरक्षितता पाहत आहेत,” असं आदित्य म्हणाले.

    स्थलांतरितांचा प्रश्न सगळीकडे कायम आहे. आम्ही सहा लाख स्थलांतरित मजुरांच्या राहण्या-खाण्याची सोय करतोय आणि केंद्र व राज्य सरकारांमध्ये त्यासाठीचा समन्वय सुरू आहे. सर्व मजुरांची काळजी घेतली जाईल, असंही ठाकरे म्हणाले.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त