तेलाच्या दरामुळे निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी ओपेक देशांमध्ये करार
तेलदरात झालेली घट आणि कोरोनामुळे मागणीत झालेली घट लक्षात घेऊन ओपेकच्या सदस्य देशांनी तेल उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाने घेतलेल्या भूमिकेमुळे फेब्रुवारी महिन्यात तेलाचे दर कोसळले होते. त्यानंतर कोरोनामुळे मागणीत घट झाली आणि तेलाचे दर आणखी कोसळले होते.