You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

ठाणे जिलह्यातील सर्व भाजीपाला, फळे दुकानं 14 एप्रिलपर्यंत बंद राहणार

पाहा कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स एकाच ठिकाणी...

लाईव्ह कव्हरेज

  1. कोरोनाचे 100 दिवस

    चीनमध्ये कोरोनाची साथ पसरण्याच्या घटनेला 100 दिवस झाले आहेत. कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी जगभरात कसे प्रयत्न केले गेले याचा जागतिक आरोग्य संघटनेने घेतलेला आढावा

  2. लॉकडाऊनदरम्यानचे दिल्लीचे चित्र

  3. 'मुख्यमंत्री, गृहमंत्री उत्तर द्या'

    काल झालेल्या वाधवा-महाबळेश्वर प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. हे नक्की कोणाच्या आदेशानुसार झाले, याचं उत्तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी द्यावे असे त्यांनी म्हटले आहे.

  4. अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर

    वाधवा-महाबळेश्वर प्रकरणी राज्याचे मुख्य सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांची चौकशी करण्याचे आदेशही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

  5. इंग्लंडमधल्या या गावानं साडेतीनशे वर्षांपूर्वी कसं हरवलं होतं प्लेगला?

    पाहा व्हीडीओ-

  6. ब्रिटनचे पंतप्रधान आयसीयूमधून बाहेर

    ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना आता आयसीयूमधून जनरल वॉर्डात हालवण्यात आल्याचं त्यांच्या प्रवक्यानं स्पष्ट केलं आहे. त्यांची तब्येत स्थिर असून त्यांना सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

  7. कोरोना व्हायरस : देशात गुरुवारी काय घडलं?

    • महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोनाचे 229 नवीन रुग्ण, एकूण संख्या 1364
    • लॉकडाऊनचं काटेकोर पालन करण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाची मदत घेणार - राजेश टोपे
    • भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 5734 वर, 166 रुग्णांचा मृत्यू
    • जगभरात आतापर्यंत 15 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण, 90 हजारहून अधिक बळी
  8. कोरोना व्हायरसविषयक LIVE पेजमध्ये आपलं स्वागत

    आतापर्यंत जगात, देशात आणि महाराष्ट्रात काय काय घडलं आहे हे जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा

    कोरोना व्हायरस : जगभरात गुरुवारी काय घडलं?

    1.जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 15 लाखांपेक्षा अधिक असल्याचं जॉन हॉपकिन्स विद्यापाठीच्या विश्लेषणातून समोर आलं आहे.

    2.जगभरात कोरोना व्हायरसमुळे जवळपास 90 हजार व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

    3.कोरोना व्हायरसमुळे जगभरातील50 कोटी लोक गरिबीच्या गर्तेत ढकलले जाईल, असा इशारा ऑक्सफॅमनं दिला आहे.

    4.अमेरिकेतल्या 66 लाख व्यक्तींनी बेरोजगारी भत्ता मिळावा म्हणून सरकारकडे स्वत:ची माहिती नोंदवली आहे.

    5.देशातील कोरोना व्हायरसविषयक माहिती दडपल्याचा आरोप चीननं खोडून काढला आहे.

    "चीन अत्यंत जबाबदारीनं आणि पारदर्शकपणे कोरोनाविषयक माहिती जगापर्यंत पोहोचवत आहे," असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झिओ लिजान यांनी म्हटलं आहे.