मास्कविना घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई
वायव्य दिल्लीमध्ये मास्कविना घराबाहेर पडलेल्या 32 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाहा कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स एकाच ठिकाणी...
वायव्य दिल्लीमध्ये मास्कविना घराबाहेर पडलेल्या 32 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
जागतिक व्यापारात यावर्षी मोठी घसरण होईल, असा अंदाज जागतिक व्यापार संघटनेनं (WTO) व्यक्त केला आहे.
जागतिक व्यापारावर लक्ष ठेवून असणाऱ्या आणि या व्यापाराचं नियमन करणाऱ्या WTOने काळजीत टाकणारं भाकित वर्तवलं आहे.
यावर्षी जागतिक व्यापारात 13 ते 32 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते, असा अंदाज WTOने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात व्यक्त केला आहे.
सध्या जग ज्या आरोग्य संकटाचा सामना करत आहे त्याचे भविष्यात काय परिणाम होतील, याचा नेमका अंदाज सध्यातरी कुणालाच नाही. याच अनिश्चिततेमुळे व्यापारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. बीबीसीचे अर्थविषयक घडामोडींचे प्रतिनिधी अँड्र्यू वॉकर यांनी लिहिलेला लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी वाधवा प्रकरणाची चौकशी व्हावी अशी विनंती करणारं पत्र राज्यपालांना दिलं आहे.
राजभवनातून समांतर सरकार चालवणे योग्य नव्हे असं म्हणतांना 'सामना'च्या अग्रलेखाने राज्यपाल आणि विरोधी पक्षनेते फडणवीस यांना टीकेचे लक्ष केले आहे.
"आपल्या राज्यपालांना कामाची आवड आहे. ते राजभवनात आज आले असले तरीही कालपर्यंत ते संघाचे प्रचारक आणि भाजपाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे आजही कदाचित ते कार्यकर्त्याच्या मानसिकतेतच असावेत.
वेळकाळाचे बंधन न ठेवता काम करणारे राज्यपाल महाराष्ट्राला लाभले आहेत, हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या वेळी झालेल्या शपथविधी सोहळ्याने महाराष्ट्राने अनुभवले आहे," असे म्हणत कोशियारी यांच्यावर 'सामना'च्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्रातील कारागृहेसुद्धा पूर्णतः बंद करण्यात येणार आहेत. कारागृहात अधिकारी-कर्मचाऱ्यांची दोन शिफ्टमध्ये नेमणूक होणार. त्यांच्या भोजन व निवासाची आतच व्यवस्था. मेन गेट पूर्णतः बंद राहणार.
हापुड येथील वकील मुकुल त्यागी यांनी सोशल डिस्टन्सिंग म्हणून थेट झाडावर जाऊन राहाण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा फोटो-
रत्नागिरी जिल्ह्यातील साखरतर परिसरामध्ये राहाणाऱ्या एका महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले.
सध्या कोरोनाची लागण झालेले जिल्ह्यात 3 रुग्ण आहेत. खेड तालुक्यात एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर गुहागरमधील एक रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे.
पाहा व्हीडीओ-
दिल्लीमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 720 रुग्ण आढळल्याचे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले. त्यातील 22 जण आयसीयूमध्ये असून 7 जणांना व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे.
कोरोना विषाणुचा फैलाव कमी करण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्र विशेषतः मुंबई, पुणे याशिवाय दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारनेही त्या त्या राज्यातल्या ज्या भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे त्यांना 'हॉटस्पॉट' म्हणून घोषित केलं आहे.
हॉटस्पॉट घोषित झाल्यानंतर ते परिसर पूर्णपणे सील होतात.
हे हॉटस्पॉट आणि लॉकडाऊन यातला फरक वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पाहा व्हीडीओ-
अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवणं ही फक्त धूळफेक आहे असं मत प्रशासकीय अधिकारी अशोक खेमका यांनी व्यक्त केलं आहे. गुप्ता यांच्यावर कोणत्या नियमांतर्गत कारवाई करता येते हे सुद्धा खेमका यांनी अनिल देशमुख यांना ट्विटरवर दिलेल्या प्रत्युत्तरात सांगितलं आहे.
डीएचएफएल कंपनीच्या वाधवा कुटुंबानं लॉकडाऊनचा नियम तोडून महाबळेश्वरला जाण्याचं प्रकरणं आणखी वाढत जाण्याची चिन्हं दिसत आहेत.
गृहमंत्र्यांनी मुख्य सचिव ( विशेष) अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. तर केंद्रीय एजन्सीपैकी सीबीआय आणि ईडीने महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क केला आहे.
पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट किट्सची वाहतूक हवाई दलाच्या विमानाच्या मदतीने मुंबई ते बंगळुरु अशी करण्यात आली.
देशभरात गेल्या 24 तासांत 30 जणांचे प्राण गेले आहेत. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 6412 वर गेली असून त्यातील 199 लोकांचा मृत्यू झाला आहे.
क्लोरोक्वाईन पाठवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार असे ट्वीट इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केले आहे.