मुंबईतील वॉकहार्ट रुग्णालयात 53 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
मुंबईतील वॉकहार्ट रुग्णालयात 53 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण. यात 33 परिचारिका आणि 20 इतर कर्मचार्यांचा समावेश.
You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाहा कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स एकाच ठिकाणी...
मुंबईतील वॉकहार्ट रुग्णालयात 53 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण. यात 33 परिचारिका आणि 20 इतर कर्मचार्यांचा समावेश.
लसीकरणाचा 1 हजार वर्षांचा इतिहास
कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी आपण सर्वांनी तीन मीटरचे सुरक्षित अंतर ठेवूया,मी गर्दी करणार नाही,मी गर्दीच्या ठिकाणी जाणार नाही,मीच माझा रक्षक, मी घरी थांबणार..मी कोरोनाला हरवणार..! आपण सर्व कोरोना विरुद्धची लढाई जिंकू या..!- राजेश टोपे, आरोग्यमंत्री
इंदोरमध्ये कोव्हिड-19 झालेल्या डॉक्टरचा मृत्यू झाला असून शहरातील कोव्हिड-19मुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 22 वर गेली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे 162 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 143 रुग्ण मुंबई पालिकेच्या क्षेत्रातील आहेत. महाराष्ट्रात आता कोरोनाची लागण झाल्याचे एकूण 1297 रुग्ण असल्याचे आरोग्य खात्याचे प्रवक्ते अनुप यादव यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 20 वर गेली असून त्यातील एक बारामती तर उरलेले पुणे महापालिका हद्दीतील मृत्यू आहेत. तर शहरात 168, पिंपरी चिंचवड 22, ग्रामीण14 अशी एकूण 204 रुग्ण संख्या नोंदवली गेली आहे.
काश्मीरमध्ये वाढले कोव्हिड-19 रुग्ण, काश्मीरवासी कसा करतायत कोरोनाचा सामना? पाहा व्हीडीओ
कोरोनाची लागण झाल्यामुळे बोकारो येथिल एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री या रुग्णाच्या चाचणीचे अहवाल मिळाले.
त्या व्यक्तीला बोकारोच्या जनरल हॉस्पिटलमधील कोव्हिड वॉर्डमध्ये दाखल केलं होतं. रांचीमधून बीबीसी हिंदीचे प्रतिनिधी रवी प्रकाश यांनी ही माहिती पाठवली आहे.
बोकारोचे सिव्हिल सर्जन डॉ. अशोककुमार पाठक यांनी या रुग्णाने कोठेही देशाबाहेर प्रवास केला नव्हता असे सांगितले आहे. आता बोकारोत सर्वत्र धूरफवारणी केली जात आहे. डीसी मुकेश कुमार यांनी कोव्हिड वॉर्डाला भेट देऊन निरीक्षणही केले.
मध्यप्रदेशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 369 वर गेली आहे. राज्यभरात कोरोनाचे 51 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यात इंदोरमध्ये सर्वात जास्त म्हणजे 40 रुग्ण आढळले आहेत. बीबीसी हिंदी प्रतिनिधी शुरैह नियाझी यांनी ही माहिती दिली आहे.
भोपाळमध्ये 11 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यात 10 आरोग्य कर्मचारी आहेत आणि एक पत्रकार आहे. आतापर्यंत राज्यात 25 जणांचा मृत्यू झाला आहे.
मध्यप्रदेशातील 14 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची साथ पसरलेली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शहरांमधील कोरोनाग्रस्त प्रदेश पूर्णपणे सील करण्याचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मदतीचे कौतुक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी केल्यानंतर त्याच्या ट्वीटला मोदींनी उत्तर दिले आहे.
कोव्हिड 19 विरुद्ध लढण्यासाठी भारत मानवतेच्या बाजूने सर्वतोपरी प्रयत्न करेल. अवघड काळच मित्रांना जवळ आणतो. भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री सध्या अत्यंत मजबूत आहे असेही मोदी म्हणाले.
कोरोना व्हायरसच्या प्रसाराबाबत कोणत्याही एका विशिष्ट समुदायाकडे बोट दाखवू नका किंवा त्यांना दोषी धरु नका असं केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या नव्या सुचनावलीत म्हटलं आहे.
कोरोना व्हायरसग्रस्त लोकांची ओळख जाहीर करण्यात येऊ नये. त्यांचे राहाण्याचे परिसर किंवा सोशल मीडियावरची त्यांची ओळख जाहीर करु नये. भीती आणि गोंधळाचे वातावरण पसरवणे टाळा.
आरोग्य आणि सफाई कर्मचाऱ्यांना कोणीही लक्ष्य करू नका ते तुमच्या मदतीसाठी आहेत असंही या सूचनांमध्ये म्हटलं आहे.
गेल्या महिन्यात तबलीगी जमातीच्या कार्यक्रमानंतर कोव्हिडच्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे सोशल मीडियासह इतरत्र त्याबाबत उलटसुलट विधान ं केली जात होती. त्यानंतर या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.
दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील काही भागांना सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिल्लीत 20 भागांना सील केल्याचं सांगितलं. या भागात रोजच्या गरजेच्या वस्तू पुरवल्या जाती याची काळजी केंद्र सरकार घेणार आहे. याबरोबरच दिल्लीमध्ये मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेशात काही हॉटस्पॉट सील करण्यात आले आहेत. त्यात गाझियाबादमधील 13, नोएडामधील 12, कानपूरमधील 12 आणि वाराणसीच्या 4 भागांचा सामवेश आहे. आग्र्यात सर्वात जास्त 22 हॉटस्पॉट आहेत.
शामली येथे 3, मेरठमध्ये 7, बरेलीत 1, बुलंदशहरमध्ये 3, बस्ती येथे 3, फिरोजाबादमध्ये 3, सहारणपूर येथे 4, महाराजगंज येथे 4, सीतापूर यथे 1 आणि लखनऊमध्ये 8 मोठे व 5 लहान हॉटस्पॉट निश्चित केले आहेत.
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेएर बोल्सोनारो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. भारताने देऊ केलेल्या मदतीमुळे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन तयार करु शकू असे त्यांनी म्हटले आहे.
कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी पोलीस आणि जगभरातली सरकारं आता वेगवेगळी सॉफ्टवेअर वापरून नागरिकांवर लक्ष ठेवताहेत.
नागरिकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी सरकारं स्वतःकडे अधिकाधिक शक्ती एकवटत आहेत. त्यामुळे जगात अनेक विचारवंत भीती व्यक्त करत आहेत की कोविड लोकशाहींचा तर बळी घेणार नाही ना? याविषयी अनेक घटना घडत आहेत. अनेक विचारवंत बोलत आहेत.
भारतात 24 तासांमध्ये 17 जणांचा कोव्हिडमुळे मृत्यू झाला आहे. भारतातील एकूण रुग्णांची संख्या 5734 वर गेली आहे.
लडाखमध्ये राहाणाऱ्या लोकांसाठी भारतीय लष्कराने अन्नाची पाकिटे पाठवली आहेत.