You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

खासगी लॅबमध्येही कोरोनाची मोफत चाचणी - सुप्रीम कोर्ट

पाहा कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स एकाच ठिकाणी...

लाईव्ह कव्हरेज

  1. 11 आठवड्यानंतर चीनच्या वुहानमधून धावली रेल्वे

    तब्बल 11 आठवडे लॉकडाऊनमध्ये असलेल्या चीनमधील वुहानने बुधवारी थोडासा मोकळा श्वास घेतला.

    वुहानमधून लॉकडाऊन शिथिल करण्यात आलं असून 11 आठवड्यानंतर पहिल्यांदाच वुहानमधून पहिली ट्रेन बाहेर पडली आहे.

    वुहानमध्येच गेल्या डिसेंबरमध्ये कोरोना व्हायरस संक्रमणाची पहिली केस सापडली होती. त्यानंतर संपूर्ण जगभरात या व्हायरसचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं.

    एपी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार आता वुहानमधील रहिवाशांना कुठेही येण्याजाण्याची अनुमती देण्यात आलेली आहे.

    चीनमध्ये कोरोना व्हायरस संक्रमणाची नवीन 62 प्रकरणं समोर आली आहेत. एक दिवसापूर्वी 32 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं होतं. चीनमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या आता 81 हजार 802 झाली आहे.

  2. जितेंद्र आव्हाडांवर तरुणाला मारहाण केल्याचा आरोप, फडणवीसांकडून राजीनाम्याची मागणी

  3. गेल्या 24 तासात भारतात 500हून अधिक केसेस

    भारतात गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोना व्हायरस संक्रमण झालेल्या 508 प्रकरणांची नोंद झाली आहे. भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या आता 4,789 झाली आहे. कोव्हिड-19मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 124 आहे. यातील 13 लोकांचा मृत्यू गेल्या चोवीस तासामध्ये झाला आहे. आरोग्य खात्याने मंगळवारी संध्याकाळी ही माहिती दिली.

    असं असली तरी सोमवारपेक्षा मंगळवारी कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होती. सोमवारी कोरोना व्हायरस संक्रमणाचे 704 प्रकरणं समोर आली होती.

  4. बीबीसी मराठीच्या कोरोनाविषयक लाईव्ह पेजमध्ये आपलं स्वागत

    बीबीसी मराठीच्या कोरोनाविषयक लाईव्ह पेजमध्ये आपलं स्वागत आहे.

    आतापर्यंतचे सर्व जाते अपडेट्स असे.

    • जगभरात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 12 लाख 72 हजारांवर गेली आहे. तर मृतांचा आकडा 70 हजारला टेकला आहे.
    • देशात गेल्या 24 तासात 693 नवीन रुग्ण, एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 4,067, एकूण मृत्यू 109
    • महाराष्ट्रात सोमवारी 120 नवे रुग्ण आढळले तर 7 मरण पावले. सध्या राज्यात 868 पॉझिटिव्ह तर एकूण 52 मृत्यू.
    • अमेरिकेत कोरोनाची 3.37 लाख जणांना लागण झाली आहे तर मृतांचा आकडा 9,600 वर