You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

खासगी लॅबमध्येही कोरोनाची मोफत चाचणी - सुप्रीम कोर्ट

पाहा कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स एकाच ठिकाणी...

लाईव्ह कव्हरेज

  1. देशभरात गेल्या 24 तासात 773 नवीन रुग्ण, एकूण 5,194

    आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसंच कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आकड्यांबद्दल माहिती दिली.

    त्यांच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे-

    • आतापर्यंत देशभरात कोरोनाचे 5,194 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात कोरोनाचे 773 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
    • कोरोनामुळे आतापर्यंत 149 रुग्णांचा बळी गेला असून मंगळवारी (7 एप्रिल) 32 लोक मृत्युमुखी पडले आहेत. रुग्णालयातून 402 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
    • आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक ती सर्व साधनसामुग्री देण्यासाठी केंद्राकडून प्रयत्न होत आहेत.
    • कोव्हिड-19 झालेल्या किंवा ज्यांना संसर्ग झाला आहे, अशा गर्भवती महिलांवर उपचारासाठी डॉक्टरांना विशेष ट्रेनिंग दिलं जात आहे.
    • भारतीय वायुसेनेकडून ईशान्य भारत, केंद्रशाशित प्रदेश तसंच राज्यांना वैद्यकीय संसाधनांचा पुरवठा करण्यात येत आहे.
    • कोरोनाच्या 80 टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं दिसून येतात, अशा रुग्णांवर कोव्हिड केअर सेंटर्समध्ये उपचार करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विस्तारावर भर देण्यात येतोय. शाळा, ह़ॉस्टेल्स, हॉटेलमध्ये ही कोव्हिड केअर सेंटर्स उभारली जात आहेत.
    • संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रुग्णांची संख्या जशी वाढत आहे, त्यादृष्टीनं उपाययोजना केल्या जात आहेत.
  2. पाहा उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषण इथे

  3. 'तबलीगी जमातचा दिल्ली कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्रालयाचे अपयश नाही का?', अनिल देशमुखांचं केंद्राच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

    मुंबईत वसईमध्ये 15 आणि 16 मार्चला नियोजित असलेल्या तबलीगी जमातच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र सरकारने परवानगी नाकारली होती, असं सांगून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्लीतील तबलीगी जमातच्या कार्यक्रमावरुन केंद्राच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

    दिल्लीतील तबलीगी मरकजमध्ये मुळात या कार्यक्रमाला परवानगी कशी दिली गेली? निजामुद्दीन इथे असलेल्या या मरकजला लागूनच निजामुद्दीन पोलीस स्टेशनही आहे. मग पोलिसांनी हस्तक्षेप करून हे आयोजन थांबवले का नाही, असा प्रश्न अनिल देशमुख यांनी उपस्थित केला.

    या मरकजमध्ये अशापद्धतीने लोक एकत्र आले आणि त्यांच्यामुळे वेगवेगळ्या राज्यात कोरोनाचा संसर्ग झाला. या प्रादूर्भावाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्रालयाची नाही का, असंही देशमुख यांनी म्हटलं.

    राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि दिल्लीचे पोलिस आयुक्त या विषयावर कोणतंही भाष्य का करत नाहीयेत, असाही प्रश्न अनिल देशमुखांनी विचारला.

  4. आरोग्य कर्मचाऱ्यांना आवाहन

    वैद्यकिय प्रशिक्षण घेतलेल्या आणि सैन्याच्या आरोग्यविभागात काम केलेल्यांना उद्धव ठाकरे यांचं आवाहन. देशाला गरज आहे आरोग्य सेवेसाठी पुढे या, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

    covidyoddha@gmail.com वर उच्छुकांनी संपर्क करण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

  5. ब्रेकिंग, घरातून बाहेर पडताना मास्क वापरा - उद्धव ठाकरे

    वापरलेल्या मास्कची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावा, सुरक्षित जागा पाहून वापरलेला मास्क जाळून टाका.

    साध्या कपड्याचा मास्क वापरला तरी चालेल, तो धुवून वापरता येईल.

  6. ब्रेकिंग, इतर गरिबांना किमान आधारभूत किंमतीत धान्य द्या - उद्धव ठाकरे

  7. उद्धव ठाकरे यांच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे

    - घरी बसून कंटाळा आला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.

    - वाहिन्यांनी आनंदी राहण्याचे कार्यक्रम दाखवावेत.

    - घरातल्या घरात थोडा व्यायाम करा. त्यामुळे मानसिक युद्ध लढायला बळ मिळेल.

    - मला एकाही रुग्णाची वाढ झालेली नकोय.

    - वुहानमधले निर्बंध हटले ही दिलासादायक बातमी

    - कोरोनानंतर अर्थव्यवस्थेशी लढायचं आहे.

    - हे युद्ध आपण जिंकणारच

    - इतर गरिबांना किमान आधारभूत किंमतीत धान्य द्या

  8. ब्रेकिंग, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं राज्याला उद्देशून संबोधन

  9. लॉकडाऊन उठवल्यावर असा असेल सरकारचा प्लान

  10. अमेरिकेत 24 तासांमध्ये 1800 जणांचा मृत्यू

    अमेरिकेत गेल्या 24 तासांमध्ये कोरोना व्हायरसमुळे 1800 पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत.

    आतापर्यंत अमेरिकेत जवळपास 13,000 जणांचा मृत्यू झाल्याचं जॉन्स हॉपकिन्स विद्यापिठाचं म्हणणं आहे.

    अमेरिकेत आतापर्यंत 3,98,000 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर जगात हा आकडा 1.4 दशलक्षपर्यंत गेला आहे.

  11. उत्तर कोरियाचा नागरिकांना लसूण खाण्याचा सल्ला

    उत्तर कोरिया म्हणतं त्यांच्याकडे कोरोना व्हायरसची लागण झालेलं कुणीही नाही. असं असलं तरी सरकार मात्र मर्यादित स्वरुपात अनेक नियम राबवत आहे.

    उत्तर कोरियाने आपल्या नागरिकांसाठी अनेक सूचना दिल्या आहेत. कोरोना व्हायरसपासून बचाव कऱण्यासाठी काय करायला हवं याविषयीच्या सूचनांचा त्यात समावेश आहे.

    डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलंही औषध घेऊ नका अँटीव्हायरल औषधं स्वतःच्याच मनाने घेऊ नका, असं यात म्हटलं आहे.

    दारूमुळे रोग प्रतिकारक शक्ती कमी होते असं म्हणत सरकारने लोकांना दारू न पिण्याचा सल्ला दिला आहे.

    त्याऐवजी पारंपरिक घरगुती उपचार करा असं सरकारने म्हटलं आहे. सरकारने जनतेला जेवणामध्ये लसूण, कांदा आणि मधाचा जास्तीत जास्त वापर करण्याविषयी सूचना केली आहे. मास्कचा वापर करण्याविषयी सूचना केली आहे.

  12. न्यूयॉर्कमध्ये 24 तासात 731 मृत्यू

    न्यूयॉर्कमध्ये गेल्या चोवीस तासात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 731 जणांचा मृत्यू झाला आहे.

    न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत चोवीस तासात झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत. कोरोना व्हायरसमुळे न्यूयॉर्क शहरामध्ये आतापर्यंत 5,498 लोकांचा मृत्यू झाला आहे.

    प्रशासनाने लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.

  13. महाराष्ट्राला कोरोनाचा वाढता विळखा, 60 नव्या रुग्णांची भर, एकूण 1078 बाधित

    महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत 60 नं वाढ झाली आहे.

    पुण्यात 9, अहमदनगरमध्ये 1, मुंबईत 44, अकोल्यात 1 आणि बुलडाण्यात 1 असे 60 नवे रुग्ण आढळून आले आहेत. परिणामी महाराष्ट्रातली कोरोमाबाधितांची संख्या आता 1078वर गेली आहे.

  14. लॉकडाऊन कधी आणि कसा संपणार?

  15. कोरोना व्हायरसच्या संकटात कशी साजरी होणार शब-ए-बारात?

  16. ब्रिटनमध्ये 55 हजार जणांना लागण

    लंडनमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य सेवाच्या नायटिंगेल रुग्णालयात पहिला रुग्ण दाखल झाला आहे.

    कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी हे रुग्णालय उभारण्यात आलं असून इथे 4000 अतिदक्षता बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

    ब्रिटनमध्ये आतापर्यंत 55,242 जणांना कोरोना व्हायरसी लागण झाल्याचे निष्पण झालं आहे.

  17. फ्रान्समध्ये 10 हजार मृत्यू

    फ्रांसमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे आतापर्यंत 10,300 लोकांचा मृत्यू झाला आहे.

    गेल्या काही काळात रुग्णालयांमध्ये 607हून अधिक तर दुसऱ्या नर्सिंग होमध्ये 820 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती फ्रान्समधील एका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

    फ्रान्स हा जगातली तीसरा देश आहे, जिथे या संक्रमणामुळे दहा हजारांहून अधिक मृत्यू झालेत.

  18. उत्तर कोरियात 500 लोक क्वारंटाईनमध्ये

    जगातील काही मोजक्या देशांमध्ये कोरोना व्हायरस संक्रमणाची एकही केस अद्याप नोंद झालेली नाही. त्यात उत्तर कोरियाचाही समावेश होता.

    पण आता जागतिक आरोग्य संघटनेने रॉयटर्स वृत्तसेस्थेला दिलेल्या माहितीनुसार उत्तर कोरियामध्ये 500 लोकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

    WHOने माहिती दिली आहे की, उत्तर कोरियाच्या आरोग्य विभागाकडून दर आठवड्याला अहवाल प्राप्त होत आहे.

  19. खासगी लॅबमध्येही कोरोनाची मोफत चाचणी - सुप्रीम कोर्ट

  20. महाराष्ट्रात कोरोनाचा मृत्यूदर जास्त का आहे?