साताऱ्यात 60 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण
साताऱ्यातील कराड तालुक्यातल्या 60 वर्षीय व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झालीय. साताऱ्यातील एकूण रुग्णांची संख्या 6 वर पोहोचली.
पाहा कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स एकाच ठिकाणी...
साताऱ्यातील कराड तालुक्यातल्या 60 वर्षीय व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झालीय. साताऱ्यातील एकूण रुग्णांची संख्या 6 वर पोहोचली.
मुंबई : क्वारंटाईनचे नियम मोडल्याप्रकरणी तबलीगी जमातच्या 150 जणांवर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

फोटो स्रोत, Twitter
"भारतानं सर्व देशांना मदत करावी. मात्र, त्याआधी भारताच्या कानाकोपऱ्यात औषधं आणि उपकरणं पोहोचणं गरजेचं आहे," असं काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारताला दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी हे ट्वीट केलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या जसलोक आणि वॉकहार्ट या दोन मोठ्या खासगी रुग्णालयांमध्येही कोरोनाने शिकराव केलाय. या दोन खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीय.
महालक्ष्मी परिसरातील जसलोक आणि मुंबई सेंट्रल परिसरातील वॉकहार्ट रुग्णालय महापालिकेने कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलं आहे. या दोन्ही रुग्णालयांना बाह्यरुग्ण विभाग बंद करण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत.
या दोन्ही रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची चाचणी केली जाणार आहे.
महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये 23 ने वाढ होऊन, रुग्णांची एकूण संख्या 891 वर पोहोचली आहे.
नव्यानं वाढलेल्या रुग्णांची यादी :
मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार कुठे कुठे झाला आहे आणि कोव्हिड-19ची लागण झालेले रुग्ण किती प्रमाणात आणि किती वेगानं समोर येत आहेत, याचा अंदाज 4 आणि 5 एप्रिलची आकडेवारी दाखवणारे हे दोन नकाशे पाहिल्यावर येईल.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
आमच्या हॉस्पिटलमधील काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोव्हिड-19 ची लागण झालीय. 70 वर्षीय रुग्णामुळं डॉक्टरांना संसर्ग झाल्याचं समोर आलंय. सगळ्यांवर उपचार सुरू असून, पूर्ण हॉस्पिटल कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आलाय, अशी माहिती वॉकहार्ट हॉस्पिटलनं दिली.

फोटो स्रोत, Twitter
जगभरात आतापर्यंत 13 लाख 38 हजार लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जगभरात कोरोना व्हायरसमुळे जवळपास 74,000 मृत्यू झाले आहेत.
भारतात आतापर्यंत 4,281 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे चाचण्यांमधून समोर आले आहे. तसेच कोव्हीड 19मुळे 111 लोकांचा मृत्यू झाला आहे.
मागील 24 तासांमध्ये चीनमध्ये कोरोना व्हायरस संक्रमणामुळे एकही मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे. असं असलं तरी कोरोना व्हायरसची लागण झालेले 32 प्रकरणं समोर आली आहेत.
AFP या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यापासून पहिल्यांदाच एकही मृत्यू चोवीस तासात झाला नसल्याची नोंद करण्यात आली.
चीनमध्ये आतापर्यंत 81,740 जणांना कोरोना व्हायरसी लागण झाली असून 3,300 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना इंटेन्सिव्ह केअर यूनिट अर्थात ICU मध्ये दाखल करण्यात आलंय. बोरिस जॉन्सन यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे 27 मार्च रोजी लक्षात आले होते.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
मुंबईतील वांद्रे येथील शासकीय विश्रामगृहाच्या जवळील एक व्यक्ती कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर रात्रीच मुंबई महापालिकेनं या भागाला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केलं. याच परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेला मातोश्री बंगला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
तेलंगणात गेल्या 24 तासात 30 नवे रुग्ण सापडले, तर 12 जण बरे होऊन घरी परतले. तेलंगणा सरकारनं ही माहिती दिली.

फोटो स्रोत, Twitter
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रसार वेगानं होत असल्याचं रुग्णांच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत देशातील सर्वाधिक रुग्ण सापडलेत. रुग्णांची एकूण संख्या 868 वर पोहोचली आहे. एकट्या मुंबईत 526 रुग्णांची नोंद झालीय.

फोटो स्रोत, Twitter/Rajesh Tope
अमेरिकेत गेल्या 24 तासात कोरोना व्हायरसमुळं सर्वाधिक मृत्यूंची नोंद झालीय. 1150 जणांचा गेल्या 24 तासात जीव गेला.

फोटो स्रोत, Twitter