कोरोना व्हायरस: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह

फोटो स्रोत, Getty Images
UPDATE - ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची कोरोना व्हायरसची चाचणी निगेटिव्ह आलीय.
जॉन्सन हे आता चेकर्स या त्यांच्या शासकीय निवासस्थानी आराम करत आहेत, अशी माहिती ब्रिटिश सरकारच्या प्रवक्त्यांनी दिली.
'10 डाऊनिंग स्ट्रीट' या पंतप्रधानांच्या निवासस्थानाऐवजी जॉन्सन शासकीय निवासस्थानी का आहेत, असं विचारल्यावर प्रवक्त्यांनी सांगितलं, "सध्या ते ठिकाण त्यांच्यासाठी योग्य आहे."
मात्र इतक्यात ते कामावर परतणार नाही, असं 10 डाऊनिंग स्ट्रीटने रविवारीच स्पष्ट केलं होतं. त्यांना रविवारीच लंडनच्या सेंट थॉमस हॉस्पिटलमधून सुटी देण्यात आली होती.
कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं 27 मार्च रोजी लक्षात आल्यापासून ते होम क्वारंटाईनमध्ये होते. मात्र तापासह काही लक्षणं कायम राहिल्यामुळे त्यांना रविवारी (5 एप्रिल) संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 7 एप्रिल रोजी त्यांना मध्ये हलवण्यात आलं होतं.
यापूर्वीच राणी एलिजाबेथ यांचे पुत्र आणि वारसदार प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं.

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

'सर्व सूत्र अजूनही पंतप्रधानांच्याच हाती'
स्वतः पंतप्रधान हॉस्पिटलमध्ये आहेत, मग सध्याच्या परिस्थिती देश कोण चालवतंय, असा प्रश्न बीबीसीच्या प्रतिनिधी लॉरा कुएनसर्ग यांनी यूकेचे परराष्ट्र मंत्री डॉमिनिक राब यांना विचारला होता.
त्यावर उत्तर देताना राब यांनी म्हणाले होते, की "लक्षणं कायम असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून चाचण्या करून घेण्यासाठी पंतप्रधान हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. मात्र त्यांची प्रकृती नीट आहे आणि अजूनही सर्व सूत्रं त्यांच्याच हातात आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
लॉकडाऊन खरंच परिणामकारक ठरत आहे का, या प्रश्नाचं उत्तर देताना प्रोफेसर अँजेला मॅकलीन यांनी म्हटलं, की सध्या करण्यात आलेल्या उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासण्यासाठी संसर्गाच्या प्रत्येक टप्प्याची आकडेवारी तपासावी लागेल. आताच त्याबद्दल काही बोलणं हे फार घाईचं ठरेल, असंही मॅकलीन यांनी म्हटलं.
लोकांनी उपाययोजनांचं काटेकोरपणे पालन केलं, तर तीन आठवड्यांनंतर लॉकडाऊनचा खरंच परिणाम झाला का, हे सांगता येत असल्याचं अँजेला मॅकलीन यांनी सांगितलं.
एका पंतप्रधानांच्या दुसऱ्या पंतप्रधानांना शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना ट्वीट करून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"तुम्हाला लवकर हॉस्पिटल मधून सुटी मिळेल, हीच आशा करतो," असं त्यांनी म्हटलं.
बोरिस जॉन्सन लवकर बरे व्हावेत - ट्रंप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांनी व्हाईट हाऊसमधून प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये बोरिस जॉन्सन लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.
सर्व अमेरिकन नागरिक ते बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. ते माझे चांगले मित्र आहेत, ते एक उत्तम व्यक्ती आणि उत्तम नेते आहेत. ते कणखर असून लवकरच बरे होतील अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना कळवल्या आहेत.
लेबर पार्टीचे नेते कायर स्टार्मेर यांनीही जॉन्सन लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
चीनमधून सुरू झालेल्या कोरोना वायरसचा संसर्ग आता जगभरातल्या 195 देशांमध्ये पोहोचला आहे. जगभरात सुमारे 4 लाख लोकांना याची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असून मृतांचा आकडा 17 हजारपेक्षा जास्त आहेत.
या व्हायरसचे सगळ्यात जास्त बळी आता इटली, चीन आणि स्पेनमध्ये आहेत. त्यामुळे एकीकडे चीनमध्ये गोष्टी पूर्ववत होत असतानाच युरोप सध्या कोरोना उद्रेकाचं केंद्र बनलं आहे.
पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनीही ब्रिटन तसंच लॉकडाऊन केलं आहे, जशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी भारतात केली आहे. जीवनावश्यक गोष्टींसाठीच बाहेर पडा, शक्य तिथे डिलिव्हरीचा पर्याय निवडा जेणेकरून लोक एकमेकांपासून दूर राहतील आणि आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होईल, असं आवाहन जॉन्सन यांनी केलं आहे.
71 वर्षांचे चार्ल्स यांच्यात सौम्य लक्षणं आढळल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय, "मात्र त्यांची प्रकृती उत्तम आहे," असंही क्लॅरेन्स हाऊसच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय. त्यांच्या पत्नी डचेस ऑफ कॉर्नवॉल यांचीही चाचणी घेण्यात आली होती, मात्र त्यांना विषाणूची लागण झालेली नाही.
प्रिन्स चार्ल्स हे "गेल्या काही दिवसांपासून घरूनच काम करत होते" आणि यापुढे ते आणि कॅमिला बॅलमोरल कॅसलमध्ये स्वतःला वेगळे ठेवणार आहेत, असंही क्लॅरेन्स हाऊसने स्पष्ट केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
चाचणीसाठी पुरेशी लक्षणं आढळल्यानंतर NHSने चार्ल्स यांची अॅबरडीनशायरमध्ये चाचणी घेतली, असं एका अधिकृत निवदेनात सांगण्यात आलं. NHS अर्थात National Health Service ही युनायटेड किंगडममध्ये आरोग्य सेवा पुरवणारी राष्ट्रीय संस्था आहे.
"सरकारच्या आणि आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यांनुसार प्रिन्स आणि डचेस आता त्यांच्या स्कॉटलंडमधील घरी वेगळे इतरांपासून राहणार आहेत," असंही पुढे सांगण्यात आलंय.
"गेल्या काही आठवड्यांमध्ये त्यांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांची भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे चार्ल्स यांना कुणापासून कोरोना व्हायरसची लागण झाली असावी, हे नेमकं सांगता येणार नाही," असंही या निवेदनात सांगण्यात आलंय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























