'शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा' - मोदींच्या हाकेला देशाची साद

पाहा कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स एकाच ठिकाणी...

लाईव्ह कव्हरेज

  1. अतिरेक्यांप्रमाणे विषाणूचं लक्ष्यही मुंबई आहे - उद्धव ठाकरे

    • इतर राज्यांमधील पाच लाखांच्या आसपास मजूर महाराष्ट्रात आहेत, त्यांच्या जेवण, नाश्ता, वैद्यकीय सुविधा दिल्यात
    • मुंबईमध्ये आरोग्याच्या सुविधा वाढवत आहोत
    • अतिरेक्यांप्रमाणे विषाणूचं लक्ष्यही मुंबई आहे, पण तो विषाणू आपलं काहीच करू शकणार नाही
    • राज्यभरात कोव्हिडसाठी खास हॉस्पिटल उभारतोय
  2. बरं होऊन घरी जाणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे - उद्धव ठाकरे

    • रोज रुग्णांची संख्या वाढतेय, मात्र बरं होऊन घरी जाणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे
    • वृद्ध, आधीच आजार असलेल्यांचा दुर्दैवानं यात मृत्यू झालाय, त्यामुळं अशांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे
    • दिल्लीतना जेवढे लोक महाराष्ट्रात आले, ते सर्व सरकारी विलगीकरण कक्षात आहेत
    • पुढच्या सूचना येईपर्यंत, महाराष्ट्रात कुठलाच धार्मिक, राजकीय, क्रीडा कार्यक्रम होणार नाही
  3. ...त्यांना सोडणार नाही - उद्धव ठाकरे

    • सर्वजण जात-पात, धर्म, पक्ष बाजूला ठेवून आपल्यासोबत आहेत
    • प्रत्येकजण आपापल्या परीनं मदत करतोय, सगळ्यांचे महाराष्ट्रातर्फे हात जोडून आभार मानतोय
    • समाजघातक व्हायरसला सांगतोय, माझ्या महाराष्ट्राला सुरक्षित ठेवण्यासाठी मी कुठलेही पाऊल उचलेन
    • नोटांना थुंकी लावणं, वेगवेगळे इशारे देणं असं करणाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यातून सोडणार नाही
  4. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री थोड्याच वेळात जनतेशी संवाद साधणार

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी दोन वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलेल्या आवाहनाबाबत उद्धव ठाकरे काही बोलतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण लाईट्स बंद करण्यास राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी नापसंती दर्शवलीय. त्यावर मुख्यमंत्री काय बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

    पाहा उद्धव ठाकरे यांचा संवाद लाईव्ह ०

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  5. कर्जाचे हप्ते 3 महिने पुढे ढकलण्याची सवलत घ्यावी का?

  6. नगरमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण बरा होऊन घरी परतला

    कोरोना व्हायरसची लागण झालेला दुसरा रुग्ण बूथ हॉस्पिटल येथून बरा होऊन आज त्याच्या घरी रवाना झाला. यावेळी हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्याला रवाना केले.

    जगभर दहशत पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसची लागण झालेला रुग्ण बरा झाल्यानं वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या या यशाचे कौतुक केले आहे.

    कोरोनामुक्त झालेल्या हा रुग्ण रवाना होताना महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, बूथ हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

    नगर शहरात सध्या कोरोनाबाधित 17 रुग्ण असून त्यापैकी दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

    आतापर्यंत नगरमध्ये 494 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे 1 लाख 10 हजार जणांना 14 दिवस घरामध्ये बसण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

    अहमदनगर कोरोना व्हायरस

    फोटो स्रोत, Nilesh Aagarkar

  7. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 537 वर पोहोचली

    कोरोना व्हायरसचे भारतातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 537 वर पोहोचलीय.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  8. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चीन घेतोय तंत्रज्ञानाची मदत

    कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी चीनमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांवर पाळत ठेवण्यात येत आहे. - पाहा व्हीडिओ

    व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरस : चीनमध्ये संसर्ग रोखण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांवर ठेवली पाळत
  9. लॉकडाऊनची शिस्त पाळा, अन्यथा मोठं आर्थिक संकट येईल - राज ठाकरे

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनेतशी संवाद साधला. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी लोकांना लॉकडाऊन गांभीर्यानं घेण्याचं आवाहन केलं. आपण शिस्त पाळली नाही, तर मोठं आर्थिक संकटाला आपल्याला सामोरं जावं लागेल असं ते म्हणाले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेणबत्त्या लावण्याच्या आवाहनावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, "पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे लोक काळोख करतील, मात्र त्यानं कोरोनावर परिणाम होणार असेल तर होवो. पण मेणबत्त्या, टॉर्च यापेक्षा आशेचा किरण दिसला असता तर बरं झालं असतं"

    निजामुद्दीनमधील मरकजच्या कार्यक्रमावर राज ठाकरेंनी टीका केली. ते म्हणाले, "मरकजचा प्रकार घडला, असल्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे." यावेळी राज ठाकरेंनी वसईतील मरकजचा कार्यक्रम रद्द करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदनही केलं.

    राज ठाकरे यांच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे :

    • रेशन, भाजी आणण्यापासून अनेक प्रश्न लोकांना असतील, मात्र सरकार सर्व उपलब्ध करून देत आहे
    • डॉक्टर जीव धोक्यात घालून काम करतायत
    • शेतमालाचा पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचे आभार मानला पाहिजेत
    • सर्व यंत्रण जीव धोक्यात घालून काम करतेय आणि लोकांना गांभीर्य येत नाही?
    • उद्योगधंद्यांना मदतनिधी न दिल्यास नोकऱ्यांवर परिणाम होईल
    • लोक असेच वागत राहिले, तर लॉकडाऊन वाढेलच
    • कुणामध्ये लक्षणं आढळली तर लोकांनी स्वत:हून पुढे येऊन सांगितलं पाहिजे
    • नुसतं सुशिक्षित असून चालत नाही, सुज्ञ सुद्धा असायला हवं
    • सरकारवर आरोप करण्याची वेळ नाही, मात्र भाजी वाटप किंवा इतर ठिकाणी नीट यंत्रणा लावणं आवश्यक आहे
    • धान्यांचा काळाबाजार करणाऱ्यांना फोडून काढलं पाहिजे
    • पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांविरोधात कडक पावलं उचलली पाहिजेत, त्याबाबतचा संदेश समाजात गेला पाहिजे
    • लोकांना हात जोडून विनंती आहे की, हा लॉकडाऊन गांभीर्यानं घ्या
    • लॉकडाऊनचे दिवस वाढल्यास यंत्रणेवरील ताण वाढेल, उद्योगधंदे बंद होतील, नोकऱ्या जातील

    दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी आरोग्य विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, "आरोग्य खात्यावर कमी लक्ष दिल्यानं आताची स्थिती ओढवलीय. आपली आरोग्य व्यवस्था किती कचाकड्याची आहे, हे आता दिसतंय."

    लोकांची आजच्या घडीला मोठी जबाबदारी आहे, केवळ यंत्रणेला दोष देऊन चालणार नसल्याचंही ते शेवटी म्हणाले.

    राज ठाकरे

    फोटो स्रोत, SHARAD BADHE/BBC

  10. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून दिशाभूल- बावनकुळे

    वीज घालवून दिवे लावण्यावरुन आता महाराष्ट्राच्या आजी-माजी ऊर्जामंत्र्यांमध्ये वाद पेटला आहे. नितीन राऊत लोकांची दिशाभूल करत असल्याचे मत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. राज्य सरकारला याची तयारी करण्याचा पुरेसा वेळ पंतप्रधानांनी दिला आहे. 9 मिनिटं दिवे बंद केल्यामुळे काहीही होणार नाही असेही बावनकुळे म्हणाले. पंतप्रधानांच्या आवाहनावर कोणीही राजकारण करु नये असे ते म्हणाले.

  11. लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी भारताचा 'एक्झिट प्लॅन' काय असेल?

  12. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2902 वर पोहोचली

    भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 2902 वर, तर मृतांची संख्या 68 वर पोहोचलीय. आतापर्यंत 183 जण बरे होऊन हॉस्पिटलमधून घरी परतले. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागानं ही माहिती दिली.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  13. छिंदवाड्यात 36 वर्षीय रुग्णाचा मृत्यू

    मध्य प्रदेशातील छिंदवाडा इथं कोरोना व्हायरसग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला. ही व्यक्ती 36 वर्षांची होती.

    मध्य प्रदेशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या आता 155 वर पोहोचलीय, तर आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झालाय.

    कोरोना व्हायरस

    फोटो स्रोत, Twitter

  14. भोपाळमधील कोरोनाबाधित महिलेची चाचणी निगेटिव्ह

    मध्य प्रदेशातील भोपाळमधील कोरोना व्हायरसची लागण झालेली महिला आणि तिच्या वडिलांची चाचणी निगेटिव्ह आलीय. त्यामुळं दोघांनाही हॉस्पिटलमधून सोडण्यात आलंय. महिलेचे वडील हे पत्रकार आहेत.

    कोरोना व्हायरस

    फोटो स्रोत, Twitter

  15. अमरावतीत कोरोना व्हायरसचा पहिला बळी

    अमरावतीतल्या इर्विन रुग्णालयात उपचारादारम्यान कोरोना व्हायरसग्रस्ताचा मृत्यू झाला. न्यूमोनिया झाल्यानं या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, थ्रोट स्वॅब टेस्टिंगच्या अहवालातून या व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

    अमरावती शहरात कोरोना व्हायरसचा हा पहिला बळी ठरला आहे.

    मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी, थ्रोट स्वॅब आणि इतर आवश्यक चाचण्या केल्या जात आहेत.

    "नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करावं आणि काळजी घ्यावी. शक्यतो घराबाहेर पडू नये. ताप, खोकला इत्यादी कुठलाही त्रास जाणवत असल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. घाबरून न जाता दक्ष राहावे. आपल्यासह इतरांचीही काळजी घ्यावी," असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

    अमरावती रुग्णालय

    फोटो स्रोत, Nitesh Raut

  16. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेणार आहेत. आज सकाळी 11.30 वाजता ही पत्रकार परिषद सुरू होणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलीय.

    या विषाणूच्या संदर्भानं जनतेशी संवाद साधण्याची इच्छा राज ठाकरेंनी व्यक्त केलीय. ते जनतेला काय आवाहन करणार आणि यासदंर्भात आणखी कोणते मुद्दे मांडणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  17. राजस्थान: परदेशी प्रवासाचा इतिहास नसलेल्या रुग्णाचा मृत्यू

    राजस्थानमधील बिकानेरमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. या महिलेचा कुठलाही परदेशी प्रवास केलेला नव्हता

    दुसरीकडे, राजस्थानमध्ये कोरोना व्हायरसचे 12 नवे रुग्ण आढळले. त्यातील 8 जण तबलीगी जमातशी संबंधित आहेत. राजस्थानातील रुग्णांची संख्या 191 वर पोहोचली आहे.

    कोरोना व्हायरस

    फोटो स्रोत, Twitter

  18. मुंबईतील भायखळ्यात भाजी खरेदीसाठी लोकांची गर्दी

    मुंबईतील भायखळ्यात भाजी खरेदीसाठी मोठ्या संख्येत लोक सकाळी सकाळी बाहेर पडल्याचे दिसून आलं. देशव्यापी लॉकडाऊनचा आज दहावा दिवस आहे.

    दरम्यान, कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची महाराष्ट्रातील संख्या 490 वर पोहोचलीय.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  19. कर्नाटकात कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू

    कर्नाटकातील बगलकोटमध्ये कोरोना व्हायरसग्रस्त रुग्णाचा मृत्यू झालाय. कर्नाटकातील कोरोनामुळं मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 4 वर पोहोचलीय.

    कोरोना व्हायरस

    फोटो स्रोत, Twitter

  20. पाणबुड्यांमध्ये राहाणारे लोक कसे दिवस काढत असतील?

    कोरोना व्हायरसमुळे आपण सर्वजण लॉकडाऊन अनुभवत आहोत. पण अनेक महिने एकाच पाणबुडीत राहाणारे लोक कसे जगत असतील असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? ते जाणून घेण्यासाठी हा व्हीडिओ नक्की पाहा

    व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरस : लॉकडाऊनच्या दिवसांत पाणबुड्यांकडून काय शिकण्यासारखं आहे?