'शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा' - मोदींच्या हाकेला देशाची साद

पाहा कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स एकाच ठिकाणी...

लाईव्ह कव्हरेज

  1. एअर डेक्कन गाशा गुंडाळणार?

    कोरोना विषाणूचा संसर्ग अर्थकारणालाही हादरे देत आहे. लॉकडाऊन काळात देशांतर्गत विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे.

    एअर डेक्कन कंपनीने पुढील सूचना मिळेपर्यंत कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे सर्व कर्मचारी विनापगार रजेवर जातील, असं कंपनीने म्हटलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  2. पंतप्रधान मोदींची माजी राष्ट्रपती, पंतप्रधानांशी चर्चा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि प्रतिभा पाटील यांच्याशी कोरोना संदर्भात चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, एच.डी. देवेगौडा यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, सपा नेते मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, एम.के. स्टॅलिन, प्रकाश सिंग बादल यांच्याशी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात संवाद साधला.

  3. नवी मुंबईत 10 फिलिपाईन्सच्या नागिरकांवर गुन्हे दाखल

    नवी मुंबईत 10 फिलिपाईन्सच्या नागिरकांवर परदेशी कायदा 1946 (सेक्शन 14) मधील कलम 188, 269 आणि 270, तसंच महाराष्ट्र कोव्हिड-19 च्या नियमांमधील सेक्शन 11 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  4. दिवे लावून कोरोना जातो, हे सिद्ध करून दाखवा - वडेट्टीवार

    महाराष्ट्र :“कोरोना व्हायरसच्या संकटात दिवे लावणे ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. दिवे लावून कोरोना जातो, हे सिद्ध करून दाखवा,” अशी टीका कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलीय.

    कोरोनाशी लढण्यासाठी मोदींनी महाराष्ट्राला निधी दिला नसल्याची खंत वडेट्टीवारांनी व्यक्त केली.

    तसंच, अचानक लॉकडाउन केल्याने मजूर देशोधडीला लागला त्याची चिंता मोदींना नसल्याची टीकाही वडेट्टीवारांनी केली.

    विजय वडेट्टीवार

    फोटो स्रोत, Nitesh Raut

  5. दिल्ली : मलेशियाला पळ काढणारे तबलीगी जमातचे 8 सदस्य ताब्यात

    मलेशियाला जाणाऱ्या विमानातून पळ काढणाऱ्या 8 तबलीगी जमातचे सदस्यांना दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आलंय.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  6. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 661 वर पोहोचली

    महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 661 वर पोहोचलीय. राज्याच्या आरोग्य मंत्रालयानं ही आकडेवारी जाहीर केलीय.

  7. 'ज्या तीन महिन्यात कमाई होते, त्याचवेळी घरी बसलोय, आता आम्ही जगायचं कसं?'

  8. इटलीच्या चुकांतून आपण काय धडा घ्यायला हवा

    व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरस: इटलीच्या चुकांतून आपण काय धडा घ्यायला हवा

    कोरोना व्हायरसमुळे बळी गेलेल्या लोकांची सर्वाधिक संख्या इटलीत आहे. कोरोना व्हायरसच्या साथीची सुरुवात चीनमध्ये झाली पण सर्वाधिक लोक इटलीत मृत्युमुखी पडले आहेत. इटलीमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार इतक्या झपाट्याने का झाला?

  9. पुण्यात कोरोना व्हायरसनं घेतला तिसरा बळी

    पुण्यात कोरोना व्हायरसमुळं तिसरा बळी गेलाय. 3 एप्रिल रोजी मृत्युमुखी पडलेल्या 60 वर्षीय महिलेला पुण्यातील ससून रुग्णालयात आणण्यात आलं होतं. तिथं मृत्यूचं कारण शोधण्यासाठी मृतदेहाची चाचणी झाली असता, ही महिला कोरोनाग्रस्त होती, असं आढळलं. याआधीच्या चाचणीत ही महिलेला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आढळले नव्हते.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  10. कोरोना व्हायरस मुंबईत का पसरतोय?

    धारावी हा दाटीवाटीचा भाग आहे. हजारो झोपड्या आणि या झोपड्यांमध्ये राहणारे लाखो श्रमिक लोक. जगातल्या सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेल्या भागांपैकी हा एक भाग आहे. आणि या भागात कोरोनाचे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

    मुंबईमध्ये इतके रुग्ण का आढळले, मुंबई का बनली कोरोनाचा हॉटस्पॉट, धारावीत सापडलेल्या रुग्णांमुळे इतरांना किती प्रमाणात धोका आहे, जर तिथे कोरोनाचा प्रसार झाला तर आपल्याकडे पुरेशा सोयी-सुविधा आहेत का?

    व्हीडिओ कॅप्शन, धारावी हा दाटीवाटीचा भाग आहे. आणि या भागात कोरोनाचे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
  11. उद्योगधंदे बंद असल्यानं गंगा नदीचं पाणी स्वच्छ

    उत्तर प्रदेश : कानपूरमधील औद्योगिक कारखाने लॉकडाऊनमुळे बंद असल्यानं गंगा नदीतील पाणी आधीपेक्षा अधिक स्वच्छ झालंय. जवळपास 40 ते 50 टक्क्यांनी पाणी शुद्ध झालंय.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  12. 'खबरदार... कोरोनाचं नाव काढाल तर...'

  13. कोरोना व्हायरसचे भारतातील 30 टक्के रुग्ण तबलीगी जमातशी संबंधित

  14. 'निझामुद्दीनला मी गेल्याची खबर गुजरात पोलिसांना कशी मिळाली?'

  15. दिल्लीत AIIMS च्या तिसऱ्या मजलवरुन संशयित रुग्णाची उडी

    दिल्लीतल्या AIIMS च्या तिसऱ्या मजल्यावरुन कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णानं उडी मारली. या व्यक्तीच्या पायाला दुखापत झाली असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. या व्यक्तीची कोरोना व्हायरसबाबत चाचणी झाली आहे. मात्र, रिपोर्ट्स अद्याप आले नाहीत.

    कोरोना व्हायरस

    फोटो स्रोत, Twitter

  16. बुलडाण्यात कोरोनाचे आणखी तीन रुग्ण आढळले

    बुलढाण्यात कोरोना व्हायरसचे आणखी 3 रुग्ण आढळले. त्यामुळं बुलढाण्यातील रुग्णांची एकूण संख्या 8 वर पोहचलीय.

    नव्यानं सापडलेले तिन्ही रुग्ण निजामुद्दीन येथील मरकजमधून आलेले होते.

  17. जम्मू-काश्मीरमध्ये 3 सरकारी कर्मचाऱ्यंकडून कर्फ्यू पासचा गैरवापर

    जम्मू-काश्मीरमधील दोडा इथं कर्फ्यू पासचा तीन सरकारी कर्मचाऱ्यांनी गैरवापर केल्याचं उघड झालंय. लॉकडाऊनमध्ये बाहेर पडण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना हे पास देण्यात आलेत.

    कर्फ्यू पासचा गैरवापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित केलं जाईल, असं उपायुक्त डॉ. सागर डोईफोडे यांनी सांगितलं.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  18. भारतात गेल्या 12 तासात 302 रुग्णांची वाढ

    भारतात गेल्या 12 तासात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत 302 वाढ झाली असून, एकूण रुग्ण 3374 एवढे झाले आहेत. तर देशभरात आतापर्यंत 267 जण बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं ही माहिती दिली.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  19. जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या 11 लाख 97 हजारांवर

    आज पहाटेपर्यंत जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 11 लाख 97 हजारांवर गेल्याचं दिसून आलं आहे. लवकरच ही संख्या 12 लाखांपर्यंत जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. इटलीमध्ये शनिवारी 681 लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत इटलीत 15,362 लोकांचे या विषाणूमुळे प्राण गेले आहेत.स्पेनमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 809 लोक मृत्युमुखी पडले आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 8400 च्यावर गेली आहे.

  20. कोरोना संकटावर उद्धव ठाकरे सरकारचे निर्णय अपुरे – फडणवीसांची टीका