पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांवर रासुका लावणार- उत्तर प्रदेश
पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिले आहेत.
You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाहा कोरोना व्हायरस विषयीचे देश जगातले सर्व ताजे अपडेट्स एकाच ठिकाणी...
पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिले आहेत.
कोव्हिडचा आणखी एक रुग्ण गोव्यामध्ये आणखी एक रुग्ण सापडला असून तो मोझांबिक, केनिया असा प्रवास करुन आल्याची माहिती गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे.
त्या उजेडात आपण एकटे नाही हा संकल्प करुया, कोणीही एकटं नाही हा संकल्प करु. 130 कोटी लोक एकाच संकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी कटिबद्ध होऊ. कोणीही घराबाहेर पडून हे करायचं नाहीये. आपल्याच दरवाजा, बाल्कनीतून करायचं आहे.
सोशल डिस्टन्सिंगची मर्यादा ओलांडायची नाहीये. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हाच रामबाण उपाय आहे.
या संकटाच्या काळात लढण्याची ताकद यातून येईल आणि जिंकण्याचा आशावाद यातून मिळेल.आपल्या उत्साहाशिवाय जगात दुसरी कोणतीही ताकद श्रेष्ठ नाही चला एकत्र येऊ कोरोनाला हरवू, भारताला विजयी बनवू.
या रविवारी 5 एप्रिलला आपल्या सर्वांना कोरोना संकटाच्या अंधःकाराला आव्हान द्यायचं आहे. यादिवशी 5 एप्रिलला 130 कोटी लोकांच्या महाशक्तीचं जागरण करायचं आहे. रविवारी रात्री 9 वाजता मला तुमची 9 मिनिटं हवी आहेत. घरातील सर्व विजेचे दिवे बंद करून दारात आणि बाल्कनीत उभं राहून मेणबत्ती, दिवे, मोबाइलचे फ्लॅशलाईटस लावावेत. 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटे हे करायचं आहे. यावेळेस घरातले विजेचे दिवे बंद केले असले तर या प्रकाशाच्या महाशक्तीचा सर्वांना साक्षात्कार होईल.
आपल्याला सतत प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करत राहिले पाहिजे. आपल्या गरीब बांधवांना कोरोनामुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून बाहेर काढून आशेच्या दिशेने नेलं पाहिजे - मोदी
अंधःकारमय संकटाला पराभूत करण्यासाठी आपल्याला प्रकाशाचं तेज चारही दिशांना पसरवलं पाहिजे - मोदी
जनता-जनार्दन ईश्वराचाच अवतार असते. जनतारुपी महाशक्तीचा या काळात साक्षात्कार सतत होत राहिला पाहिजे. त्यामुळे मनोबल वाढतं. आपला मार्ग अधिक स्पष्ट करतो - मोदी
आज देशातले कोट्यवधी लोक घरात आहेत. तेव्हा आपण एकटे काय करु शकणार आहोत असा विचार मनात येऊ शकतो. असे किती दिवस घालवायचे असा प्रश्न पडू शकतो. आपण आपापल्या घरात असलो तरी आपल्यापैकी कोणीही एकटं नाहीये. 130 कोटी लोकांचा सामूहिक शक्ती प्रत्येकाबरोबर आहे.
या सामूहिक शक्तीची अनुभूत वेळोवेळी घेणं आवश्यक आहे.
लॉकडाऊनच्या काळात ही सामूहिकताच उपयोगी पडत आहे - मोदी
आज अनेक देश भारताचं अनुकरण करत आहेत. जनता कर्फ्यु, आरोग्य कर्मचाऱ्यांचं अभिनंदन यामुळे सामूहिक एकतेचा भाव प्रकट झाला - मोदी
कोरोनाच्या साथीविरोधातील देशव्यापी लॉकडाऊनचा आजवा नववा दिवस आहे. या काळात तुम्ही आणि प्रशासनाने स्थिती चांगली ठेवण्याचचा भरपूर प्रयत्न केला आहे - नरेंद्र मोदी
सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद
धारावीत 35 वर्षिय डॉक्टरला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
कोरोना व्हायरसची लागण झालेले हे डॉक्टर ज्या इमारतीत राहात होते ती इमारत सील करण्यात आली आहे.
हे तिघे हिमाचल प्रदेशातील मंडी येथील असून ते सध्या नाक्रोह येथे मशिदीत राहात होते. खबरदारीचा उपाय म्हणून गावातील लोकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
आज सकाळी 9 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातल्या जनतेशी संवाद साधतील. हा संवाद व्हीडिओमार्फत होईल.