You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुण्यात कोरोनाचा दुसरा बळी, महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 423
पाहा कोरोना व्हायरस विषयीचे देश दुनियेतील सर्व ताजे अपडेट्स एकाच ठिकाणी...
लाईव्ह कव्हरेज
वास न येणे, चव न कळणे हीसुद्धा कोरोनाची लक्षणं
कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
कोरोनाचे आणखी ताजे अपडेटस् पाहाण्यासाठी इथे क्लिक करा
महाराष्ट्रात आज कोरोनाचे 88 नवीन रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या 423
आज राज्यात कोरोनाच्या 88नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील 54 रुग्ण मुंबई येथील आहेत. मुंबईत आज 17 रुग्ण रिपोर्ट झाले असून इतर रुग्ण मागील दोन दिवसातील आहेत. याशिवाय 9 रुग्ण अहमदनगरचे, 11 पुणे येथील आहेत, तर 9 जण मुंबई परिसरातील इतर मनपाचे, 2 औरंगाबादचे तर प्रत्येकी 1 रुग्ण सातारा, उस्मानाबाद आणि बुलढाण्याचा आहे. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 423 झाली आहे.
याशिवाय आज राज्यात 4 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
पुण्यात कोरोनाचा दुसरा बळी
गुरुवारी पुण्यात कोरोना व्हायरसमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
"गुरुवारी (2 एप्रिल) पुण्यात सातपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. गेल्या 3 दिवसांमध्ये दुसऱ्या मृत्यूची घटनासुद्धा पुण्यात आज घडली आहे. एका कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू आज झाला आहे. त्यामुळे वस्ती आणि झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग दिसून यायला लागला आहे," असं मोहोळ यांनी म्हटलं आहे,
कोरोनामुळे आतापर्यंत देशात 53 जणांचा मृत्यू
कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे आतापर्यंत देशात 53 जणांचा मृत्यू झाला आहे. आता देशातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2069 इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे.
जास्त चाचण्या घेतल्या असत्या, तर तबलीगी प्रकरण वेळेत समोर आलं असतं?
तबलिगी जमातच्या कार्यक्रमाशी संबंधित 960 विदेशी नागरिक काळ्या यादीत
तबलिगी जमातच्या कार्यक्रमाशी संबंधित 960 विदेशी नागरिकांचा समावेश काळ्या यादीत करण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयानं त्यांचा व्हीसा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोना व्हायरस : घरात आहेत पण हिंसाचारापासून सुरक्षित नाहीत त्यांचं काय?
महाराष्ट्रात कोरोनाचे 81 नवीन रुग्ण
राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 416 झाला आहे. गुरूवारी (2 एप्रिल) राज्यात 81 नवीन रुग्ण आढळले आहेत.
मुंबईत कोरोनाचा संसर्ग झालेले 57 रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या चिंता वाढवणारी आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे 9 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ठाण्यामध्ये कोरोनाचे 5 तर नगरमध्ये 9 रुग्ण आढळले आहेत. बुलडाण्यातही एक नवीन रुग्ण आढळला आहे. राज्य सरकारनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी व्हीडिओ मेसेज शेअर करणार
शुक्रवारी सकाळी 9 वाजता मी देशातल्या जनतेशी व्हीडिओद्वारे संवाद साधेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून सांगितलं आहे.
कोरोनामुळे इतर रुग्णांचे हाल, लॉकडाऊनमुळे हॉस्पिटल गाठणं झालं अवघड
राज्यात कोरोना उपचारासाठी 30 विशेष रुग्णालये - राजेश टोपे
कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील 30 शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषीत केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून 2305 खाटा कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
या अधिसूचनेमुळे या रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे.
देशात 24 तासांत 12 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू - आरोग्य मंत्रालय
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी कोरोना व्हायरस संदर्भात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी मांडलेले मुद्दे -
1. तबलीगीच्या कार्यक्रमातील 9 हजार लोकांची ओळख पटली आहे. यापैकी 1804 जणांना क्वारंटाईन केलं आहे, तर 334 जणांना दवाखान्यात भरती करण्यात आलं आहे.
2. तामिळनाडू 173, जम्म-काश्मीर 22, आसाममधून 16 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळळे आहेत. येत्या काही दिवसांत ही संख्या वाढण्याची संख्या आहे.
3. देशात गेल्या 24 तासांत 12 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, तर 328 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
4. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून टेस्टिंग सुविधा वाढवण्याची सूचना केली.
5. मोदींनी म्हटलं की, देशात ज्यापद्धतीनं कोरोनाचे रुग्ण समोर येत आहेत. ते पाहता आता आपली कोरोनाविरुद्धची लढाई सुरू झाली आहे. सगळ्यांनी एकत्र येत ही लढाई लढण्याची गरज आहे.
6. मुंबईच्या धारावीत एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या भागाला सील करण्यात आलं आहे. या भागात 4 हजार आरोग्य कर्मचारी काम करत आहेत.
तबलीगीच्या कार्यक्रमातील 1300 जणांचं ट्रेसिंग पूर्ण - राजेश टोपे
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांची मााहिती दिली.
त्यांनी मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे-
1. स्थलांतरित कामगारांची काळजी राज्य सरकार घेत आहेत. जवळपास साडे तीन लाख लोकांचं जेवण, नाश्त्याची सोय सरकार घेत आहे
2. मार्केट कमिटीत लोकांची झुंबड उडू नये म्हणून त्यासंबंधीची नियमावली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
3. निझामुद्दीनला 18 मार्चला झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातून जवळपास 1400 जण तिथं गेले होते. त्यापैकी 1300 जणांचं ट्रेसिंग पूर्ण झालं आहे. त्यांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
4. केंद्राकडून राज्य शासनाचे 16 हजार कोटी रुपये आले तर त्याचा योग्य विनियोग करता येईल.
5. राज्यात कोरोनाचा सामना करण्यासाठी काही हॉस्पिटल तयार करण्यात येत आहेत. या हॉस्पिटलमध्ये फक्त कोरोनावर उपचार होईल.
6. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या प्रतीची साधनं उपलब्ध करण्यात यावीत, असा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मांडण्यात आला.
पुण्यात कोरोनाचा दुसरा बळी, महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 423
कोरोना व्हायरस रोगातून भारतातले सर्वांत म्हातारे ’बाबा’ असे बरे झाले
'माझ्या छातीत दुखतंय,' असं बोलून चालता चालता त्याने प्राण सोडला
लॉकडाऊनचा काळ संपला तरी नियमांचे पालन करण्याची गरज- पंतप्रधान
लॉकडाऊनचा काळ संपला तरी नियमांचे पालन करण्याची गरज आहे असे पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सांगितल्याचे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी ट्वीट केले आहे.