You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुण्यात कोरोनाचा दुसरा बळी, महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 423
पाहा कोरोना व्हायरस विषयीचे देश दुनियेतील सर्व ताजे अपडेट्स एकाच ठिकाणी...
लाईव्ह कव्हरेज
ब्रिटिश एअरवेज 36 हजार कर्मचाऱ्यांचं निलंबन करणार
जगभरात मृतांची संख्या 50,000 जवळ
जगभरातील कोव्हिड-19 मृतांची संख्या 50 हजारच्या जवळ गेली आहे,
काही देशांमध्ये मृतांची संख्या 5000 च्या वर गेली आहे.
मृतांची देशवार संख्या
इटली 13,155
स्पेन 9,387
अमेरीका 5,116
फ़्रांस 4,043
चीन 3,316
इराण 3,036
ब्रिटन 2,357
नेदरलँडस् 1,173
जर्मनी 931
बेल्जियम 828
महाराष्ट्रात आढळले 3 नवे रुग्ण
या रुग्णांमधील 2 रुग्ण पुण्यातले आहेत तर एक रुग्ण बुलढाण्यात आढळला आहे.
शरीराचे तापमान मोजण्यासाठी नौदलाने तयार केलेले उपकरण कसे आहे?
नौदलाने तयार केलेल्या या उपकरणाची किंमत 1000 रुपये आहे.
हरियाणामध्ये एका रुग्णाचा मृत्यू
हरियाणातील अंबाला येथे एका कोव्हीड-19 झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
मणिपूरमध्ये सापडला दुसरा रुग्ण
तबलिगी जमात मेळ्यात सहभागी झालेल्या एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मणिपूरमध्ये कोव्हिड-19 रुग्णांची संख्या 2 झाली आहे.
केवळ 1000 रुपयांमध्ये शरीराचे तापमान मोजण्याचे यंत्र
भारतीय नौदलाने स्वतः एक उपकरण विकसित केले असून नौदलाच्या यार्डांमध्ये येणाऱ्या लोकांचे तापमान मोजण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. हे यंत्र केवळ 1000 रुपयांत तयार करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशात 'कम्युनिटी लेव्हल स्प्रेड' नाही- उ. प्र. सरकार
उत्तर प्रदेशात कम्युनिटी लेव्हलचा कोरोना विषाणू प्रसार झाला नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत राज्यात कोव्हिड-19 चे 113 रुग्ण आढळले आहेत.
प्रत्येक स्थलांतरित कामगाराला 1000 रुपयांची मदत
लॉकडाऊनमुळे राज्यात परतणाऱ्या प्रत्येक कामगाराला 1000 रुपयांची मदत देण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतला आहे.
भारतात राहिलेल्या अमेरिकन नागरिकांना मायदेशी नेण्याची मोहीम
भारतात राहिलेल्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेत नेण्यासाठी मोहीम सुरु करण्यात आली आहे. या नागरिकांना नवी दिल्ली आणि मुंबई येथील विमानतळावरून नेण्यात /येईल.
कोरोनाच्या नावाखाली समाजात फूट पाडणाऱ्यांवर कारवाई करु- मुख्यमंत्री, केरळ
निझामुद्दिन मर्कजमध्ये सहभागी झालेल्या लोकांविरोधात व त्यांच्या समुदायाविरोधात सोशल मीडियावर हेतुपुरस्सर द्वेषमूलक मोहीम चालवली जात आहे. अशा साथीच्या काळामध्ये धार्मिक फूट पाडणाऱ्या लोकांवर कारवाई करु असा इशारा केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दिला आहे.
राजस्थानमध्ये 9 नवे रुग्ण
राजस्थानमध्ये कोव्हिड-19 चे 9 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यातील 7 रामगंजचे तर झुनझुनू आणि जोधपूरचा प्रत्येकी 1 रुग्ण आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची राजस्थानातील संख्या आता 129 वर गेली आहे.
महाराष्ट्राच्या इंजिनियर्स तयार करत आहेत स्वस्त दरातले व्हेंटिलेटर्स
Nocca Robotics Pvt. Ltd या स्टार्ट-अप कंपनीच्या तरुण इंजिनियर्सनी स्वस्त दरात व्हेंटिलेटर्स तयार केले आहेत. या कंपनीेचे इंजिनियर निखिल कुरेले म्हणाले, "आम्हाला पोर्टेबल व्हेंटिलेटर्स तयार करायचे आहेत." या व्हेंटिलेटर्सची किंमत 50,000 पेक्षा कमी असेल, त्यादृष्टीने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
संसर्ग टाळण्यासाठी तो स्वतःच एअरपोर्टवरून हॉस्पिटलमध्ये गेला
भुवनेश्वरमधील 19 वर्षिय रुग्णाला सोडले घरी
भुवनेश्वरमधील एम्समध्ये उपचार घेऊन कोव्हिडमधून बऱ्या झालेल्या 19 वर्षिय तरुणाला घरी सोडण्यात आले आहे.
मध्य प्रदेशात आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लोकांची तपासणी आणि रुग्णांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्याची घटना मध्य प्रदेशात इंदोरमध्ये घडली आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
तबलिगीमधून आलेल्या लोकांचे बेशिस्त वर्तन
तबलिगी जमातमध्ये सहभागी झालेल्या लोकांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आल्या नंतर त्यांनी खाद्यपदार्थांच्या अवास्तव मागण्या सुरु केल्या. तसेच क्वारंटाइन सेंटरच्या कर्मचाऱ्यांशी त्यांनी गैरवर्तन करून शिव्याही दिल्या. तसेच ते इतस्ततः आणि डॉक्टर्स व स्टाफवर थुंकले, हॉस्टेल इमारतीत फिरुही लागले अशी माहिती उत्तर रेल्वेच्या प्रमुख माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दिल्लीत 172 परदेशी नागरिक क्वारंटाईन
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राइमब्रँच आणि दिल्ली सरकारयांच्या संयुक्त मोहिमेमध्ये 275 परदेशी नागरिकआढळूनआले. त्यामध्ये 172 लोक इंडोनेशियाचे, 36 किरगिझिस्तानचे तर 21बांगलादेशचे आहेत. या लोकांनी निझामुद्दीन मर्कज येथे जमातमध्ये भाग घेतला होता. या लोकांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यातआलंआहे.