महाराष्ट्रात दिवसभरात कोरोनामुळे 2 मृत्यू, रुग्णांचा आकडा 220
कोरोनामुळे देशात आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे.
लाईव्ह कव्हरेज
आर्थिक वर्ष 30 जूनला संपणार-रिझर्व्ह बँक
कोरोनामुळे विस्कळीत झालेलं जनजीवन लक्षात घेऊन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष 30 एप्रिल रोजी 30 जून रोजी संपणार आहे. नवीन आर्थिक वर्ष 1 जुलै, 2020 रोजी सुरू होईल परंतु ते 31 मार्च 2021 रोजी संपेल असं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्रात संचारबंदी; आंतरजिल्हा सीमा बंद - मुख्यमंत्री
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. याअंतर्गत आंतरजिल्हा सीमा बंद करण्यात आल्या आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान अन्नधान्य, किराणा, औषधं हे नागरिकांना उपलब्ध असतील. त्याचा पुरेसा साठा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. खाजगी वाहनांनी आवश्यकता असेल तरच बाहेर पडावं असंही त्यांनी सांगितलं.
देशांतर्गत विमानसेवाही बंद होणार
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यादृष्टीने देशांतर्गत विमानसेवाही बंद करण्याचा निर्णय हवाई वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. 24 मार्च अर्थात मंगळवारी मध्यरात्रीपासून देशांतर्गत विमानांची वाहतूक थांबवण्यात येईल असं निर्देश हवाई वाहतूक मंत्रालयाने एअरलाईन्स कंपन्यांना दिले आहेत.
कामगारांचे पगार कापायला कामगार मंत्रालयाने केली मनाई
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नोकऱ्यांवर संकट आलेलं असताना, श्रम मंत्रालयाने दिलासा देणारी घोषणा केली आहे. सरकारी तसंच खाजगी कंपन्यांनी कोणालाही कामावरून काढू नका तसंच पगारात कपात करू नका असे आदेश दिले आहेत.
फोटो स्रोत, Labour Ministry
राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा
"कोरोनाचं प्रकरण सहज घेऊ नका, हात जोडून विनंती करतो घरात बसा," असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक सुद्धा केलं आहे.
सरकारी कर्मचारी, डॉक्टर, पोलीसांचे राज ठाकरे यांनी आभार आणि उपकार मानले आहेत.
लॉक डाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश
लॉक डाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश केंद्र सरकारनं राज्य सरकारांना दिले आहेत. लॉक डाऊनची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेशही केंद्र सरकारनं दिले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
शासकीय यंत्रणा, पोलीसांना सहकार्य करा - शरद पवार
महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे.
अतिशय महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा, नाहीतर घरीच थांबा. शासकीय यंत्रणा,
पोलीस यांना पूर्णपणे सहकार्य करा, असं आवाहन शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केलं आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड नाही, घराबाहेर कुणीही पडू नये - राजेश टोपे, राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 89 झाली आहे. 74 वरून ती 89वर गेलीय. 8 जण बाहेरून आले आणि त्यांना कोरोना झालाय.
या 89 पैकी 1 जण पुण्याचा आणि 1 जण मुंबईचा आयसीयूमध्ये आहेत. बाकी सगळ्यांची प्रकृती उत्तम आहे.
ही संख्या वाढत असली तरी उद्यापासून उपचार सुरू असलेले अनेक जणांचे निगेटिव्ह रिपोर्ट येत आहेत.
रस्त्यावरची गर्दी 144 जमावबंदी लागू. राज्यातल्या शहरी भागात बंदी लागू नये, पाचपेक्षा अधिक जणांनी एकत्र येऊ नये. अन्यथा पोलीस कारवाई करण्यात येईल.
मीच आहे माझा रक्षक, हे धोरण या वातावरणात सगळ्यात महत्त्वाचं आहे.
आता पत्रकार परिषद घेण्यापेक्षा
डिजिटल माध्यमांद्वारे अपडेट्स देत राहणार. त्यासाठी फेसबुक लाईव्हचा वापर करण्यात
येईल.
फोटो स्रोत, ANI
स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका - उद्धव ठाकरे
"कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. १४४ कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका," असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
लॉक डाऊनला गांभीर्यानं घ्या - नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना लॉक डाऊनचा गांभीर्यानं घेण्याचं आवाहन केलं आहे.
कोरोना व्हायरस : मुंबईची आजची स्थिती?
लोकल ट्रेन बंद.परिणामी दूध आणि भाज्यांची आवक घटली.
बेस्टबसेस फक्त अत्यावश्यक सेवांसाठीसुरू.
रिक्षाआणि टॅक्सीवाल्यांना पोलीस
थांबवत आहेत.
मुंबईत आज वृत्तपत्रंआलेली नाहीत.
काही किराणा व्यापारी
दुकानं स्वत: बंद ठेवत आहेत.
औषधांची दुकानं सुरू आहेत, खरेदीसाठी लोकांची
गर्दी होत आहे.
काही हॉटेल्स फक्त होम डिलिव्हरी देत आहेत.
फोटो स्रोत, Getty Images
ब्रेकिंग, राज्यात कोरोना व्हायरसचा तिसरा बळी
राज्यात कोरोना व्हायरसचा
तिसरा बळी गेला आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 68 वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू
झाला आहे. ही व्यक्ती फिलिपाईन्सची नागरिक होती. सुरुवातीला कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर काही दिवसांनी त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. म्हणून त्यांना कस्तुरबा रुग्णालयातून खासगी रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
ब्रेकिंग, देशातल्या कोरोना बाधितांची संख्या 390 वर
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
ब्रेकिंग, मुंबई शेअर बाजार कोसळला
मुंबई शेअर बाजारात व्यवहारांना सुरुवात होताच सेन्सेक्समध्ये 2500 पेक्षा जास्त अकांची घसरण झाली आहे.
ब्रेकिंग, महाराष्ट्रातला कोरोनाबाधितांचा आकडा 89 वर
महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 89 वर पोहोचलीय. रविवारी राज्यात रुग्णांच्या संख्यात 15 नं वाढ झाली.
पाचपेक्षा अधिक लोक एकत्र दिसल्यास कायदेशीर कारवाई - राजेश टोपे
राज्यातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी 89वर पोहोचली आहे. सरकारनं जमावबंदी लागू केली असतानाही पाचपेक्षा अधिक लोक एकत्र दिसल्यास पोलीस त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना सांगितलं.