कोरोना व्हायरसच्या संकटामुळे रेपो, रिव्हर्स रेपो रेटमध्य कपात.
रेपोरेटमध्ये 0.75 टक्क्याची कपात
रिव्हर्स रेपो रेटमध्ये 0.90 टक्क्याची कपात
कोरोनामुळे देशात आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे रेपो, रिव्हर्स रेपो रेटमध्य कपात.
रेपोरेटमध्ये 0.75 टक्क्याची कपात
रिव्हर्स रेपो रेटमध्ये 0.90 टक्क्याची कपात
अनेक क्षेत्रांना कोरोना व्हायरसचा आर्थिक फटका बसणार
व्याजदर कमी होऊन कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार.
अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याजदरात कपात
कोरोनामुळे मागणी कमी झाल्याने महागाई वाढण्याची शक्यता.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने देशातील 27 खाजगी प्रयोगशाळांना करोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे 8 लॅब महाराष्ट्रातील आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
या खाजगी तपासणी केंद्रांना केंद्र शासनाने ‘कोरोना तपासणी केंद्र’ म्हणून मान्यता देण्याची शिफारस राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केंद्र शासनाकडे करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.
थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड, नवी मुंबई, सबर्बन डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड, मुंबई, सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, नवी मुंबई, एस. आर. एल. लिमिटेड, मुंबई, ए.जी. डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, पुणे, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल लॅबरोटरी, मुंबई आणि इन्फेक्शन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे या खासगी लॅबचा यात समावेश आहे.
यामुळे कोरोना तपासणी अधिक जलद गतीने होऊ शकेल आणि रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होतील. ही तपासणी केंद्रे पूर्ण क्षमतेने चालविल्यास दररोज एकूण 2 हजार संशयित रुग्णांचे नमुने तपासणी करणे शक्य होणार आहे, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
आज वर्षा येथे कोरोना उपयाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात यावर चर्चा झाली.
लॉक डाऊनमुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे, त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य खरेदी करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्यात असेही यासंदर्भात झालेल्या बैठकीत ठरले.
कोरोना उपयाययोजना संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बंदिस्त वातावरण टाळून आणि अधिकाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेत योग्य अंतर ठेवून ही बैठक घेण्यात आली

बांधकाम क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आलेल्या घोषणा- बिल्डिंग अँड अदर वर्कर्स वेलफेअर फंड उपलब्ध असतो. सध्या या फंडामध्ये 31 हजार कोटी रुपये आहेत. राज्य सरकारांना या फंडाचा वापर करण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून बांधकाम मजुरांना या अडचणीच्या काळात मदत मिळेल.
आरोग्य तपासणी, औषधोपचार यांसाठी जिल्हा वैद्यकीय निधी असतो. राज्य सरकारकडे त्यासंबंधीचे अधिकार आहेत. त्यांनी हा निधी वापरावा, अशी सूचना आम्ही त्यांना करतो.
संघटित क्षेत्रातील मजुरांसाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या महत्त्वाच्या घोषणा
1. 100 पेक्षा कमी कामगार आहेत आणि पंधरा हजार पेक्षा कमी ज्यांचा पगार कमी आहे, अशा उद्योगांना सरकारकडून मदत. नोकरी करणाऱ्यांचा 12 टक्के आणि नोकरी देणाऱ्यांचा 12 टक्के EPF सरकार देणार आहे.
2 EPF स्किमच्या पैसे काढण्यासाठीच्या तरतूदींंमध्येही बदल
80 लाख मजूरांना आणि 4 लाख उद्योगांना याचा फायदा होण्याची आशा.
महिला बचत गटांनाही आर्थिक मदत मिळेल. देशात 63 लाख बचत गट आहेत. या बचत गटांना विनातारण दहा लाख रुपयांचं कर्ज मिळत होतं. ही मर्यादा वाढविण्यात आली आहे.
उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या महिलांना गॅस सिलिंडर मिळतो त्यांना पुढचे तीन महिने सिलिंडर मोफत देण्यात येतील. जवळपास आठ कोटी महिलांना याचा लाभ मिळेल.
शेतकऱ्यांच्याा खात्यात 2 हजार रुपयांची रक्कम देणार.
एप्रिल महिन्यात पहिल्या आठवड्यात ही रक्कम जमा होईल.
सुमारे 8 कोटी शेतकऱ्यांना फायदा.
निर्मला सीतारामन यांनी देशातल्या गरीबांसाठी 1 लाख 70 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे.
तसंच कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांचा विमा जाहीर केलं.
यामध्ये डॉक्टर, नर्सेस, आशा सेविका, पॅरामेडिकल स्टाफ यांचा समावेश आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरीबांना अन्न आणि आर्थिक मदत मिळणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनातील मुद्दे..
* डॉक्टर व पोलिसांवरील हल्ले दुर्दैवी. असे हल्ले सहन केले जाणार नाहीत.
* ‘कोरोना’ प्रतिबंधक कार्यात अडथळे आणणाऱ्या व डॉक्टर, पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करणार
* पोलीस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त व संयम पाळावा.
* लोक बाजारात, रस्त्यावर ज्या पद्धतीनं गर्दी करत आहेत. सुरक्षित अंतर पाळत नाहीत, यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका वाढत आहे.
* नागरिकांची खरेदीसाठीचा गर्दी होणे, कोरोना प्रादुर्भावासाठी चिंताजनक आहे.
* कोरोना प्रतिबंधक अंमलबजावणीसाठी, लष्कराची मदत घ्यायला लागू नये हे पाहणं आपली सर्वांची जबाबदारी.
* प्रवासबंदी असताना दुधाच्या टँकरमधून प्रवास करण्यासारख्या घटना गंभीर.
* राज्यात संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत.
* दुध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू घरपोच, सोसायटीपर्यंत उपलब्ध करण्याचे नियोजन व्हावे.
*केंद्रीय वाहतूकमंत्रीनितीन गडकरी यांनी केलेल्या टोलमाफीच्या घोषणेचे स्वागत.