एक्झिट पोलची आकडेवारी समोर, कोणत्या पक्षाला किती मिळणार जागा?

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी आज मतदान पार पडले. महायुती, महाविकास आघाडी या दोन युत्या-आघाड्यांसह अनेक पक्ष रिंगणात आहेत. त्यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद झाले आहे.

थोडक्यात

  • महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदानाला सुरुवात
  • राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
  • सत्ताधारी महायुती, विरोधक महाविकास आघाडी या प्रमुख दोन आघाड्यांसह इतरही अनेक पक्ष मैदानात
  • राज्यातील 288 जागांवर विविध पक्षांचे एकूण 4 हजार 136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
  • आज मतदान पार पडल्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे 23 नोव्हेंबरला निकाल लागणार
  • आष्टी विधानसभा मतदारसंघातील बेदरवाडी गावात दोन गटात तुंबळ हाणामारी

लाईव्ह कव्हरेज

ओंकार करंबेळकर, बीबीसी मराठी प्रतिनिधी

  1. सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान

    महाराष्ट्रात सकाळी 9 वाजेपर्यंत अंदाजे 6.61 टक्के मतदान झालं असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

    राज्यातील जिल्हा निहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे.

    अहमदनगर - 5.91 टक्के, अकोला - 6.0 टक्के, अमरावती - 6.6 टक्के, औरंगाबाद- 7.5 टक्के, बीड - 6.88 टक्के, भंडारा- 6.21 टक्के, बुलढाणा- 6.16 टक्के, चंद्रपूर- 8.5 टक्के, धुळे -6.79 टक्के, गडचिरोली- 12.33 टक्के, गोंदिया - 7.94 टक्के, हिंगोली - 6.45 टक्के, जळगाव - 5.85 टक्के, जालना- 7.51 टक्के, कोल्हापूर-7.38 टक्के, लातूर 5.91 टक्के, मुंबई शहर- 6.25 टक्के, मुंबई उपनगर- 7.88 टक्के, नागपूर - 6.86 टक्के, नांदेड - 5.42 टक्के, नंदुरबार- 7.76 टक्के, नाशिक - 6.89 टक्के, उस्मानाबाद- 4.85 टक्के, पालघर- 7.30 टक्के, परभणी- 6.59 टक्के, पुणे - 5.53 टक्के, रायगड - 7.55 टक्के, रत्नागिरी- 9.30 टक्के, सांगली - 6.14 टक्के, सातारा - 5.14 टक्के, सिंधुदुर्ग - 8.61 टक्के, सोलापूर - 5.7, ठाणे 6.66 टक्के, वर्धा - 5.93 टक्के, वाशिम - 5.33 टक्के, यवतमाळ - 7.17

    महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक
    फोटो कॅप्शन, महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक
  2. दादरमध्ये मतदान केंद्रावर कोण कोण आलं? मुंबईकरांच्या मनात काय?

    बीबीसी मराठी प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी केलेलं वार्तांकन तुम्ही इथे क्लिक करुन पाहू शकता.

  3. आज सकाळी मुंबईतून गावी कोकणाकडे मतदानासाठी जाणाऱ्या लोकांची प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून आली.

    रेल्वेतील गर्दी

    फोटो स्रोत, Anagha Pandit

    फोटो कॅप्शन, रेल्वेतील गर्दी
    बसेसनाही मोठ्या प्रमाणावर गर्दी होती

    फोटो स्रोत, Anagha Pandit

    फोटो कॅप्शन, बसेसनाही मोठ्या प्रमाणावर गर्दी होती
  4. गडचिरोलीतील आदिवासी भागात मतदानाला मोठा प्रतिसाद

    सकाळपासूनच गडचिरोलीतील आदिवासी भागात मतदानाला मोठा प्रतिसाद आहे. बूथवर मोठ्या रांगा असून सर्व ठिकाणी कडक सुरक्षेमध्ये शांततेत मतदान सुरू आहे.

    गडचिरोलीतील आदिवासी भागात मतदानाला मोठा प्रतिसाद
    फोटो कॅप्शन, गडचिरोलीतील आदिवासी भागात मतदानाला मोठा प्रतिसाद
    युवक, महिलांसहित अपंगांचाही मतदानाला प्रतिसाद
    फोटो कॅप्शन, युवक, महिलांसहित अपंगांचाही मतदानाला प्रतिसाद
    बूथवर मोठ्या रांगा
    फोटो कॅप्शन, बूथवर मोठ्या रांगा
  5. सचिन तेंडुलकरने केलं सहकुटुंब मतदान

    भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली आणि मुलगी सारासह मतदानाचा हक्क बजावला आहे.

    सचिन तेंडुलकरने यावेळी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "मी गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय निवडणूक आयोगाचा आयकॉन आहे. मतदान करा हा संदेश मी नेहमी देत आलो ​​आहे. ती आपली जबाबदारी आहे. मी सर्वांना विनंती करतो की घराबाहेर या आणि मतदान करा."

    सचिन तेंडुलकर आणि त्याचं कुटुंब
    फोटो कॅप्शन, सचिन तेंडुलकर आणि त्याचं कुटुंब
  6. दिग्गजांचं मतदान

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे. सकाळच्या सत्रात अनेक दिग्गजांनी मतदान केलं आहे.

    महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज विधानसभा निवडणूक 2024 करिता 185-मलबार हिल विधानसभा मतदार संघाअंतर्गत राजभवन भवन क्लब मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

    महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
    फोटो कॅप्शन, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

    बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनीही मतदानाचा अधिकार बजावला.

    भूषण गगराणी
    फोटो कॅप्शन, भूषण गगराणी

    महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी बजावला मतदानाचा अधिकार

    मुख्य सचिव सुजाता सौनिक
    फोटो कॅप्शन, मुख्य सचिव सुजाता सौनिक

    विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

    विजय वडेट्टीवार
    फोटो कॅप्शन, विजय वडेट्टीवार

    भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरूड मधील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.

    चंद्रकांतदादा पाटील
    फोटो कॅप्शन, चंद्रकांतदादा पाटील
  7. अजित पवारांनी बारामतीतील काटेवाडीत केलं मतदान

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी बारामतीतील काटेवाडीमधील माध्यमिक शाळेमध्ये मतदान केलं आहे.

    महायुतीचं सरकार बहुमतानं येईल, असा विश्वास मतदानानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

    ते म्हणाले की, "आम्ही चांगलं काम केलं आहे, आम्हाला पुढेही काम करायचं आहे आणि भविष्यात विकासाच्या वाटचालीसाठीची दृष्टी आमच्याकडे आहे. बारामतीतील मतदार मला विजयी करून आठव्यांदा विधानसभेवर नक्की पाठवतील, याबाबत मला विश्वास आहे."

    अजित पवार मतदान करताना
    फोटो कॅप्शन, अजित पवार मतदान करताना
  8. नागपूरमधील मतदान केंद्रांवर मतदानास सुरुवात

    नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात आज सकाळी सात वाजता पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानासाठी मतदान केंद्र सज्ज झाली असून पंचायत समिती कळमेश्वर येथील आदर्श मतदान केंद्राच्या सुसज्जतेचं हे छायाचित्र!

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
    फोटो कॅप्शन, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  9. विनोद तावडे, पैसेवाटप यावर माजी निवडणूक आयुक्त काय म्हणाले?

    भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप होतोय. नालासोपारा मतदारसंघात तावडे यांनी पैसे वाटले असा आरोप बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी केला.

    नालासोपारा पूर्वमध्ये असलेल्या विवांता हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. याविषयी माजी मुख्य निवडणूक आयुक्त एय. वाय. कुरेशी यांच्याशी बीबीसीचे प्रतिनिधी निलेश धोत्रेंनी चर्चा केली.

    व्हीडिओ कॅप्शन, विनोद तावडे, पैसेवाटप यावर माजी निवडणूक आयुक्त काय म्हणाले?
  10. पंतप्रधान मोदींनी मतदानासाठी केलं आवाहन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करणारं ट्विट केलं आहे. त्यातही विशेषकरुन युवा आणि महिलांनी मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडावं, असं त्यांनी म्हटलं आहे.

    नरेंद्र मोदी यांचं ट्विट

    फोटो स्रोत, X/Narendra Modi

    फोटो कॅप्शन, नरेंद्र मोदी यांचं ट्विट
  11. मतदार यादीत नाव आहे, पण मतदान कार्ड नाहीये?, 'या' 12 पैकी एक कागदपत्र असेल, तरी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मतदान करता येणार

    आज मतदान करण्यासाठी तुमचं नाव मतदार यादीमध्ये असणं आवश्यक आहे. मात्र, तुमच्याकडे निवडणूक आयोगाकडून देण्यात येणारं ओळखपत्र नसेल किंवा गहाळ झालं असेल तर ओळखीचा पुरावा म्हणून पर्यायी 12 पैकी कागदपत्रांपैकी कोणतंही एक दाखवून तुम्ही मतदान करु शकता.

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  12. नमस्कार!

    मी बीबीसी मराठी प्रतिनिधी विनायक होगाडे.

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा आजचा दिवस. आज मतदानाच्या अनुषंगाने होत असलेल्या सर्व घडामोडींची इत्यंभूत आणि विश्वासार्ह माहिती मी तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून देणार आहे.

    2024 ची ही निवडणूक 15 व्या विधानसभेसाठी होणार आहे. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे तीन पक्षांच्या मिळून दोन आघाड्या प्रामुख्याने एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामधील, सत्ताधारी महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे; तर प्रमुख विरोधी आघाडी असलेल्या महाविकास आघाडीमध्ये भारतीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) या पक्षांचा समावेश आहे.

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

    याशिवाय, तिसरी आघाडी, वंचित बहुजन पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ठिकठिकाणचे अपक्ष आणि बंडखोर अशा सर्वांसह निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या एकूण 4 हजार 136 उमेदवारांचे भविष्य मतपेटीमध्ये बंद होणार आहे.

    या निवडणुकीचा निकाल शनिवारी म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी लागणार असून या घडामोडींकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे.

    तुम्हाला आज दिवसभरातल्या घडामोडी बीबीसी मराठीच्या या लाईव्ह पेजवर वाचायला मिळतील. त्यासोबतच तज्ज्ञांच्या विश्लेषणांसह वस्तुनिष्ठ माहिती असलेल्या बातम्या, विश्वासार्ह आकडेवारी, निष्पक्ष वार्तांकनांसह निवडणुकीची ही रणधुमाळी अत्यंत सोप्या आणि तुम्हाला समजेल अशा शब्दात 'महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024' या पेजवर वाचता येतील. क्लिक करा!