एचडी रेवन्नांच्या पत्नीची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली

थोडक्यात

  • लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. सकाळीच मतदानाला सुरुवात झाली आहे.
  • सलमान खानवर आणखी एका हल्ल्याच्या कट उघड, चौघांना अटक केल्याचा पोलिसांचा दावा
  • फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी चीनला दक्षिण चीन सागरात आपली सीमा ओलांडू नये असं सांगितलं आहे.
  • बायडेन यांनी जाहीर केला गाझातील युद्ध थांबवण्यासाठीचा इस्रायलचा प्रस्ताव
  • हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातील भाजप उमेदवार कंगना रनोतनं हिमाचल प्रदेशात मोदींची लाट असल्याचं म्हटलं आहे.
  • पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईलाही पोलिसांनी अटक केली आहे.
  • देशीतील 57 लोकसभा मतदारसंघांमध्ये सातव्या टप्प्यातील मतदान सुरू झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात यावेळी इंडिया आघाडीचं सरकार येणार असल्याचा दावा केला आहे.
  • सुप्रीम कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाची मुदत वाढवून देण्यास नकार दिल्यानंतर आता त्यांना 2 जूनला तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागणार आहे.

लाईव्ह कव्हरेज

नितीन सुलताने

  1. प्रज्वल रेवण्णांना जर्मनीहून परतताच अटक, न्यायालयात हजर करणार

    प्रज्वल रेवन्ना

    फोटो स्रोत, FB/PRAJWAL REVANNA

    भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आणि कर्नाटकातील लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांना गुरुवारी रात्री उशिरा बलात्कार आणि लैंगिक छळ प्रकरणी अटक करण्यात आली. जर्मनीहून बेंगळुरूला पोहोचताच त्यांना अटक करण्यात आली.

    प्रज्वल रेवन्ना बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एक्झिट गेटमधून बाहेर आले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर काहीही तणाव नव्हता. त्यानंतर लगेचच पोलीस, सीआरपीएफ आणि एसआयटीच्या पथकानं त्यांना घेरलं.

    महिलांच्या लैंगिक छळाचे अनेक आरोप त्यांच्यावर आहेत. कर्नाटकातील हासन येथील जागेसाठी मतदान झाल्यानंतर, दुसऱ्या दिवशी ते जर्मनीला गेले होते.

    एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, पोलिसांनी प्रज्वल रेवन्नाला न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी केली.

    बेपत्ता झाल्यानंतर प्रज्वल यांना एक व्हिडिओ मेसेज समोर आला होता. त्यात ते 31 मे रोजी तपास करणाऱ्या एसआयटीसमोर हजर होणार असल्याचं सांगितलं होतं.

    2960 व्हिडिओ क्लिप असलेले पेनड्राईव्ह बसस्थानकं, उद्यानं आणि इतर सार्वजनिक ठिकाणी पेनड्राईव्ह मिळाल्यानंतर या प्रकरणी राजकीय आरोप झाले होते.

    त्यानंतर अनेक पीडित महिलांनीही पोलिसांकडं तक्रार केली होती.

    अटकेनंतर प्रज्वल रेवन्ना.

    फोटो स्रोत, ANI

    एका पीडितेनं रेवन्ना यांनी धमकावल्याचा आरोपही केला. 1 जानेवारी 2021 ते 25 एप्रिल 2024 दरम्यान त्यांच्या अधिकृत सरकारी बंगल्यावर बलात्कार केल्याचा आरोपही या पीडितेनं केला होता.

    पीडितेनं न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाबही नोंदवला होता.

    निवडणुकीदरम्यान हा मुद्दा समोर आल्यानंतर जेडीएस बचावात्मक पवित्र्यात आहे.

    जेडीएस प्रमुख आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनीही प्रज्वलला तपासात सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं. जेडीएस नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमार स्वामी यांनीही याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.

    प्रज्वल रेवन्ना हे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आहेत. कर्नाटकमध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी जेडीएस आणि भाजपमध्ये युती होती आणि युतीच्या वतीनं प्रज्वल यांना हासन मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

  2. ब्लड अल्कोहोल टेस्ट रिपोर्ट कोर्टात सबळ पुरावा ठरतो? वाचा

  3. पॉर्न स्टारला पैसे दिल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प दोषी, आता ते अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकणार का?

  4. नमस्कार

    बीबीसी मराठीच्या पेजवर आपले स्वागत आहे. भारतात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सहा टप्पे पूर्ण झाले आहेत. शेवटच्या टप्प्याचा प्रचार देखील आता संपला आहे.

    तेव्हा प्रचाराची रणधुमाळी आणि त्याचसोबत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील बातम्या तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतील.

    30 मे रोजीच्या बातम्या वाचण्यासाठीबीबीसी मराठीच्या या पेजला भेट द्यावी.