सीमेपलिकडून झालेल्या गोळीबारात 10 ठार : भारतीय लष्करी अधिकारी
सीमेपलिकडून भारतीय भागात झालेल्या गोळीबारातील भारतीय नागरिकांच्या मृतांचा आकडा 10 वर पोहोचला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बीबीसीला याबाबत माहिती दिली आहे. हे सर्व मृत्यू पूंछ जिल्ह्यात झाले आहेत. हा भाग भारत आणि पाकिस्तानमधील नियंत्रण रेषेजवळ (डी-फॅक्टर सीमेवर) आहे. भारतानं पाकिस्तान आणि पाक प्रशासित काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईनंतर सुरू झालेल्या हिंसाचारात किमान 32 जखमी झाल्याचं वृत्त आहे.

फोटो स्रोत, Getty Images

भारताच्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची पाकिस्तानची माहिती
पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले की, 'दोन्ही देशांमधील प्रत्यक्ष सीमा असलेल्या नियंत्रण रेषेवर झालेल्या भारतीय हवाई हल्ल्यात आणि गोळीबारात 26 जण ठार झाले आहेत आणि 46 जण जखमी झाले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानने यापूर्वी मृतांची संख्या आठ असल्याचे सांगितले होते.
आजच्या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितलं की, "पाकिस्तानात नागरिकांच्या जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही".