राष्ट्र महाराष्ट्र : लाडक्या बहिणींना जे पैसे दिले, ते पुन्हा परत घेणं असा कद्रूपणा करणार नाही - शिंदे

महाराष्ट्रातील महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने BBC न्यूज मराठी 'राष्ट्र महाराष्ट्र' हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे.

थोडक्यात

  • महाराष्ट्रातील विद्यामान सरकारच्या कामगिरीवर चर्चेसाठी बीबीसी मराठीचा 'राष्ट्र महाराष्ट्र' कार्यक्रम
  • बीबीसीच्या मंचावर महायुती सरकारच्या 100 दिवसांचा लेखाजोखा आणि त्यावर चर्चा
  • सत्ताधारी मंत्र्यांसह विरोधी पक्षातील नेतेही यात सहभागी होत आहेत.
  • आतापर्यंत आदित्य ठाकरे, चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे यांनी आपलं म्हणणं मांडलं
  • यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि जंयत पाटील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत

लाईव्ह कव्हरेज

बीबीसी मराठी टीम

  1. एकंदर पॉलिसी मेकींगमध्ये माझं लक्ष आहे - पंकजा मुंडे

    पंकजा मुंडे या राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या मंत्री आहेत. तुमचे प्राधान्याचे विषय कोणते आहेत, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की,

    • हे खातं फार मोठं आहे. पर्यावरणाबरोबर आता वातावरणीय बदल हा पूर्ण मोठा विषय जोडला गेला आहे.
    • उद्योगांना वळण लावून पर्यावरण जपणे, गरजेचं वाटतंय.
    • एकंदर पॉलिसी मेकींगमध्ये मला काम करायचं आहे.
    • टेक्नॉलॉजी आणि मेडिकल वेस्ट हे मोठे विषय आहेत.
    • नदी पुनरुज्जीवन करणं, हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
    • आता 3 पक्ष आहेत, म्हणून काम करताना मला काही अडचण जाणवत नाही.
    पंकजा मुंडे
  2. राज्याच्या सत्तेत पाच वर्षांनंतर परतल्यानंतर काय वाटतं?

    राज्याच्या सत्तेत पाच वर्षांनंतर परतल्यानंतर काय वाटतं, यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की,

    • सत्तेबाहेर काही काळ आमच्या पक्षाला जावं लागले, तेव्हा संघटनेसाठी काम करावं लागलं.
    • पूर्वीचं जे पद होतं, तेच पुन्हा मिळालं आहे. पाच वर्षांनंतर मंत्री म्हणून आल्यानंतर वेगळं काही वाटलं नाही.
    • पाच वर्षांनंतर सोशल मीडियाचा प्रभाव फार वाढला आहे, असं वाटतंय. इंटरॅक्शन जास्त वाढलंय, असं वाटतंय.
    • पाच नाही तर दहा वर्षे झाली आहेत, असं म्हणावं लागेल.
    पंकजा मुंडे
  3. थोड्याच वेळात पंकजा मुंडे 'बीबीसी मराठी'च्या मंचावर

    बीबीसी न्यूज मराठीच्या सर्व सोशल प्लॅटफॉर्म, तसंच वेबसाईटवर हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येईल आणि अपडेट्स वाचता येतील.

    पंकजा मुंडे
  4. दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरे म्हणतात...

    मुख्यमंत्री व्हायला आवडेल का, या प्रश्नावर ते म्हणाले की,

    • मी हा विचार करतच नाही. असे विचार करणारे कुठेही जात नाहीत. ते स्वप्नातच रमतात. हे माझ्या मनात नाहीये. जी काही जबाबदारी लोक देतील, तिथून लोकांची मला सेवा करायला आवडेल.
    आदित्य ठाकरे

    फोटो स्रोत, आदित्य ठाकरे

    दिशा सालियान प्रकरणावरुन होणाऱ्या आरोपांबाबत ते म्हणाले की,

    • गेले पाच वर्षे जे बदनामी करत आहेत, ते या मुद्द्यावरुन आजही करतात. याबाबत आम्ही कोर्टातच बोलू. ज्या विषयाशी दूरदूरपर्यंत आमचा संबंध नाही, त्यावर काय बोलणार? ज्यांना बदनामी करण्याचाच पगार मिळतो, ते त्यावरच बोलत बसतात.
    • या बदनामीच्या बातम्यांवरच्या कमेंट्स बघा. लोकांना सत्य काय आहे, ते माहिती आहे.
    • असल्या फालतू आरोपांना मी कचऱ्याच्या टोपलीत टाकतो.
    • जे आरोप करणारे लोक आहेत, ते पुढचे पन्नास वर्षे हाच आरोप करत राहतील. ते आरोप यासाठीच करतात की, कुठेतरी मी घाबरुन शांत बसेल. ज्यांना कुणाला लपवायचं असतं ते भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जातात. यांच्या भ्रष्टाचाराचे कपडे मी दररोज फाडतो.
    • हे मलाही पप्पू, पप्पू 2 म्हणायला बघतात. पण दोन पप्पूंनी यांचे कपडे फाडलेत.
  5. 'आमचं हिंदूत्व चूल पेटवणारं'

    • आमचं हिंदूत्व घरातील चूल पेटवणारे हिंदूत्व आहे. भाजपचं वा मिंधेंचं हिंदूत्व हे घर पेटवणारं हिंदूत्व आहे.
    • भाजपचं हिंदुत्व म्हणजे त्यांना बाहेरचे श्रीमंत मुसलमान चालतात. हे नवाज शरीफकडे जाऊन केक चारतात. पण यांना आपल्या देशातले मुस्लीम चालत नाहीत.
    आदित्य ठाकरे

    फोटो स्रोत, आदित्य ठाकरे

    • मतांसाठी आम्ही कधी राजकारण केलं नाही, आम्ही समाजासाठी जे योग्य आहे त्यावरच बोललो.
    • गडचिरोलीतील समुदाय हा वनांवर अवलंबून आहे, आपली संस्कृती जपली पाहिजे.
    • मुंबईतल्या लोकांना सोयीसुविधा कमी पडतात, यावर ते म्हणाले की, 1997 ते 2022 चे अर्थसंकल्प बघा. आम्ही तो कोणाच्याही घशात पैसा घातला नाही. आम्ही कोणतेही छुपे टॅक्स लावला नाही.
    • एकनाथ शिंदेंनी ज्याला हात लावला तिथं सगळं भकास करून ठेवलं.
  6. कुणाल कामरा प्रकरणावर आदित्य ठाकरे म्हणतात...

    ही संपूर्ण मुलाखत तुम्ही इथे पाहू शकता.

    आदित्य ठाकरे

    फोटो स्रोत, आदित्य ठाकरे

  7. सत्ताधारी तीन पक्षातच 'वॉर' सुरु आहे - आदित्य ठाकरे

    • भाजप आणि मिंधे गटात सुरु असलेल्या वॉरमध्ये महाराष्ट्राचे हाल होत आहेत.
    • बीडची घटना, परभणीची घटना, पुण्यातील घटनांवर आम्ही आंदोलनं केली.
    • विरोधी पक्ष जेव्हा एखादी भूमिका घेतो तेव्हा मीडियानं पण आम्हाला दाखवलं पाहिजे.
    • संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो कुठून लीक झाले? ते सत्ताधारी पक्षातीलच नेते लीक करतात.
    • सत्ताधारी तीन पक्षातच भांडण सुरु आहे, हे वास्तव आहे.
    • शेतकरी आत्महत्या वाढत चालल्या आहेत. हे सगळं असताना कृषीमंत्री कधी बांधावर गेले का? या राज्यातल्या कृषीमंत्र्याचं नाव तरी कुणाला माहिती आहे का?
    आदित्य ठाकरे

    फोटो स्रोत, आदित्य ठाकरे

  8. भाजपसोबत जाणार का?

    तुम्ही भाजपसोबत जाणार का, या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की -

    • मी जर तरमध्ये जाणार नाही. एका बाजूला तुम्ही हिंदू-मुस्लीम दंगली घडवत आहात.
    • त्याच पाकिस्तानासोबत तुम्ही तिथल्या क्रिकेटर्स सोबत एन्जॉय करतात. ही म्हणजे दुटप्पी भूमिका आहे. ही मुंडे साहेबांची भाजप नाही. तुमची पोरं परदेशात व्यवसाय करतात, रस्त्यावर गरिबांची पोरं उतरतात.
    • हा मुंडे-महाजन यांचा भाजप पक्ष नाहीये.
    आदित्य ठाकरे

    फोटो स्रोत, आदित्य ठाकरे

  9. 'स्थिर सरकार चालवायला जमत नाहीये म्हणून औरंगजेबाचा विषय'

    • स्थिर सरकर चालवायला जमलं नाही की मग औरंगजेब यासारखे विषय काढले जातात.
    • अर्थसंकल्पावर टीका करताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय की, "ज्या मुद्द्यावर ते निवडणून आले त्यातलं काही अर्थसंकल्पात होतं का?"
    आदित्य ठाकरे बीबीसीच्या मंचावर
    फोटो कॅप्शन, आदित्य ठाकरे बीबीसीच्या मंचावर
    • तुमची फडणवीसांसोबत जवळीक दिसतेय का, यावर ते म्हणाले की, "फडणवीस आज ज्या परिस्थितीत आहेत, त्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत , त्यातले एक काम करतात, दुसरे लावालावीची कामं करतात. मुख्यमंत्र्यांनी हे ओखळलं पाहिजे की त्यांना अकार्यक्षम दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे."
  10. मिरची क्यों लगी? - आदित्य ठाकरे

    कुणाल कामरा प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलंय.

    ते म्हणाले की,

    • तोडफोडीचा जो प्रकार झाला आहे, त्याला दोन-तीन बाजू आहेत. तुम्हाला राग आला असेल तर तुम्ही केस टाकू शकता. कालचं पूर्वनियोजित असून ठरवून केलेला प्रकार आहे.
    • अशाप्रकारची तोडफोड ते कोरटकर वा सोलापूरकरांच्या विरोधात करणार आहेत का?
    आदित्य ठाकरे

    फोटो स्रोत, आदित्य ठाकरे

    • स्वत: त्यांचेच खासदार एकनाथ शिंदेंना 'साप' संबोधत आहेत. नाव न घेता केलेली टीका तुमच्यावरच आहे, हे कसं कळलं?
    • एकनाथ शिंदेंनी स्वतःवर ओढवून घेतलंय. त्यांना राग का आला जर ते 'गद्दार' नसतील?
    • टीका करणं हे लोकशाहीत गरजेचं आहे असं स्वतः मोदींनी पॉडकास्ट मध्ये सांगितलं होतं.
  11. 'राष्ट्र महाराष्ट्र' कार्यक्रम थोड्याच वेळात लाईव्ह

    बीबीसी न्यूज मराठीच्या सर्व सोशल प्लॅटफॉर्म, तसंच वेबसाईटवर हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येईल आणि अपडेट्स वाचता येतील.

    तुम्हाला इथे पाहता येईल कार्यक्रम :

    फेसबुकवर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

    युट्यूबवर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

    वेबसाईटवर पाहण्यासाठी आणि अपडेट वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

    राष्ट्र-महाराष्ट्र
  12. आदित्य ठाकरे थोड्याच वेळात बीबीसी मराठीच्या व्यासपीठावर...

    शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे थोड्याच वेळात बीबीसी मराठीच्या व्यासपीठावर...

    संपूर्ण मुलाखत तुम्ही इथे पाहू शकता.

    आदित्य ठाकरे
    फोटो कॅप्शन, आदित्य ठाकरे

    यापूर्वी, आदित्य ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीला मुलाखत दिली होती. तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपली मते रोखठोक पद्धतीने मांडली होती.

    ती संपूर्ण मुलाखत तुम्ही इथे पाहू शकता.

  13. नमस्कार

    महाराष्ट्रातील महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने BBC न्यूज मराठी 'राष्ट्र महाराष्ट्र' हा विशेष कार्यक्रम आयोजित करत आहे.

    या कार्यक्रमात मंत्री आणि नेते निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता, तसेच आगामी योजनांबाबत चर्चा करणार आहेत.

    शिवाय, विरोधी पक्षातील नेतेही विद्यमान सरकारच्या कामकाजाबाबत आपलं म्हणणं मांडणार आहेत.

    हा कार्यक्रम दुपारी 12 ते रात्री 9.30 या वेळेत मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होत आहे.

    राष्ट्र महाराष्ट्र

    'राष्ट्र महाराष्ट्र' कार्यक्रम तुम्हाला कुठे पाहता येईल :

    बीबीसी न्यूज मराठीच्या सर्व सोशल प्लॅटफॉर्म, तसंच वेबसाईटवर हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येईल आणि अपडेट्स वाचता येतील.

    तुम्हाला इथे पाहता येईल कार्यक्रम :

    फेसबुकवर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

    युट्यूबवर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

    वेबसाईटवर पाहण्यासाठी आणि अपडेट वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

    या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या श्रोत्यांना थेट प्रश्नही विचारण्याची संधी मिळणार आहे. शिवाय, सोशल प्लॅटफॉर्मवरूनही कमेंट्समधून प्रेक्षक, वाचकांना प्रश्न विचारता येतील.