राष्ट्र महाराष्ट्र : लाडक्या बहिणींना जे पैसे दिले, ते पुन्हा परत घेणं असा कद्रूपणा करणार नाही - शिंदे

महाराष्ट्रातील महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने BBC न्यूज मराठी 'राष्ट्र महाराष्ट्र' हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे.

थोडक्यात

  • महाराष्ट्रातील विद्यामान सरकारच्या कामगिरीवर चर्चेसाठी बीबीसी मराठीचा 'राष्ट्र महाराष्ट्र' कार्यक्रम
  • बीबीसीच्या मंचावर महायुती सरकारच्या 100 दिवसांचा लेखाजोखा आणि त्यावर चर्चा
  • सत्ताधारी मंत्र्यांसह विरोधी पक्षातील नेतेही यात सहभागी होत आहेत.
  • आतापर्यंत आदित्य ठाकरे, चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे यांनी आपलं म्हणणं मांडलं
  • यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि जंयत पाटील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत

लाईव्ह कव्हरेज

बीबीसी मराठी टीम

  1. सरकार आल्यानंतरच्या 100 दिवसांत काय झालं?

    • सरकार आल्यानंतर 100 दिवसांमध्ये 'दावोस'चा दौरा झाला.
    • पंधरा लाख सत्तर हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. लाखो मुलामुलींना आम्ही रोजगाराची संधी आम्ही उपलब्ध करून दिली आहे.
    • इतर राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्यातील गुंतवणुकीचा रेट हा 80-85 टक्के आहे.
    • 'दावोस'ला जाऊन नुसते करारच करत नाही, तर आम्ही आऊटपुटही देतो.
    उदय सामंत

    या 'दावोस' दौऱ्यातून प्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतात का, या प्रश्नावर ते म्हणतात की,

    • उद्योग विभागाला तुम्ही माझी मुलाखत घेऊन आजमावता. तुम्ही माझ्यासोबत अशी एक टीम पाठवा, ज्यांना मी काय काम सुरु आहे, ते सगळं दाखवू शकतो. मी टीका करत नाहीये, पण मुलाखतीतून उद्योग विभाग सिद्ध होणार नसेल, तर माझ्यासोबत चला. मी दाखवून देतो.
    • माझं म्हणणं असं आहे की, तुम्ही मला आजमावून पाहा. माध्यमांनी एक टीम तयार करा आणि त्यांना माझ्या सोबत पाठवा आणि तिथं जाऊन बघा किती प्रकल्पांवर काम चालू आहे.
    • नोकऱ्या मिळण्याचा रेशो हा 80-85 टक्के आहे. उद्योग कशाप्रकारे सुरु केले आहेत, ते मी तुम्हाला दाखवून देतो. कधीतरी आपण फील्डवर जाऊन या गोष्टीचं विश्लेषण करणार आहोत की नाही, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
  2. उद्योगमंत्री उदय सामंत 'बीबीसी मराठी'च्या मंचावर...

    उदय सामंत
  3. लग्नाबाबतच्या प्रश्नावर काय म्हणाल्या आदिती तटकरे?

    आदिती तटकरेंबाबत सर्वाधिक सर्च होणारा प्रश्न त्यांच्या लग्नासंदर्भातला आहे, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, "एक महिला लग्न झालं नसेल तर तिचं स्वतंत्र्य अस्तित्व असू शकत नाही अशी लोकांची मानसिकता असते. ती यातून दिसते."

    आदिती तटकरे
  4. दारुबंदी आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर आदिती तटकरे म्हणाल्या की...

    • दारुबंदीसारख्या निर्णयावर सगळ्या बाजूनं विचार करावा लागतो. बिहारसारख्या ज्या इतर राज्यांनी दारुबंदीचा विचार केला, त्या राज्यात बेकायदा दारुचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं.
    • आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळात गुटखाबंदीचा निर्णय झाला होता, तेव्हाही बेकायदा गुटखा वाढला.
    आदिती तटकरे
    • कायद्याने बंदी आणण्यापेक्षा प्रबोधन होणं जास्त गरजेचं आहे.
    • महिला सुरक्षेबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, महिला सुरक्षेसंदर्भात पुरुषांवरही काम करण्याची गरज आहे. महिला दिनाला फक्त महिला आमदारांनीच बोलावं, अशी काही गरज नाहीये. यासंदर्भातील मानसिकतेमध्ये कधी बदल होईल, ते पहावं लागेल. लहानपणापासूनच आपल्या मुलाला शिकवलं पाहिजे की, मुलगा आणि मुलगीमध्ये काही फरक नाहीये.
    • कुठलंही राज्य प्रगतशील तेव्हाच असतं जेव्हा तिथल्या महिला सुरक्षित असतात, असं मला वाटतं.
    • जेव्हा भक्कम शक्ती कायदा लागू होईल, तेव्हा परिणामकारक बदल होतील, असं वाटतं.
  5. 'महिला आर्थिकदृष्ट्या स्थिर कशा होतील, याकडेही आमचं लक्ष'

    • अंगणवाडी आणि मदतनीसांच्या मानधनात आम्ही वाढ केली आहे. त्याची अमंलबजावणी आम्ही डिसेंबरपासून सुरु केलीय.
    • वेलफेअर स्कीममध्ये लाभ देणं हा एक भाग असतो, त्याबरोबरच महिला आर्थिकदृष्ट्या स्थिर कशा होतील, याकडेही आमचं लक्ष आहे.
    आदिती तटकरे
  6. 'योजनेबाबत अनेक गैरसमज निर्माण करण्यात आले'

    • या योजनेचा एकही निकष बदलण्यात आलेला नाहीये.
    • एका लाभार्थ्याने दहा-दहा जणींचं नाव टाकलं, असेल तर त्यांना वगळण्यात येत आहे.
    • या योजनेबाबत अनेक गैरसमज निर्माण करण्यात आले आहेत.
    • इतर योजनांच्या तुलनेमध्ये लाडकी बहिण योजनेला एका वर्षाचा कालावधीही पूर्ण झालेला नाहीये. योजनेत कालांतराने बदल होत राहतात.
    • ही योजना बंद पडेल, असं वातावरण तयार करण्यात आलं.
    • विरोधकांनी 'कॅश फॉर व्होट'चा आरोप केला. पण, त्यांनी तीन हजार रुपये देऊ, असं आश्वासन दिलं होतं, ते कशाच्या आधारावर? दुसरे करतात ते चुकीचं आणि आपण करतोय ते बरोबर, असं कसं होऊ शकतं?
    • आजवर राज्यातील कोणत्याही आधीच्या सरकारनं अशी योजना आणलेली नव्हती. ती आम्ही यशस्वीपणे राबवतोय.
    आदिती तटकरे
  7. लाडक्या बहिणीची रक्कम कधी वाढवणार?

    • ही योजना यशस्वीपणे राबवणं याला आमचं प्राधान्य आहे.
    • पंधराशे की एकवीसशेपेक्षा ही योजना सुरु ठेवणं महत्त्वाचं आहे. 1500 चे 2100 चे कधी होणार, यावर त्या म्हणाल्या की, आम्ही जाहीरनाम्यात 2100 चे वचन दिलेलं आहे.
    • महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं हे आमचं ध्येय आहे.
    आदिती तटकरे
  8. आदिती तटकरे 'बीबीसी मराठी'च्या मंचावर

    आदिती तटकरे

    फोटो स्रोत, bbc

  9. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले..

    चंद्रकांत पाटील
    • बार्टी सारथीच्या मुलांना शिषियवृत्ती आधी दिली जाते पण महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना म्हणावी तशी मिळत नाही, यावर ते म्हणाले सरकारनं घोषित केलेला पैसा हा मिळतोच, कदाचित उशिरा मिळतो पण मिळतो.
    • मागच्या अधिवेशनात खाजगी विद्यापीठाच्या शुल्कांचं नियमन करण्यासाठी प्रयत्न झाला पण त्याला विरोध झाला. त्यामुळे कमीत कमी दहा टक्के विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं पाहिजे असा कायदा झाला.
  10. सभागृहातल्या कामकाजाबाबत संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात..

    चंद्रकांत पाटील
  11. एआय आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांबाबत चंद्रकांत पाटील म्हणतात

    चंद्रकांत पाटील
  12. राज्यातील तरुणांना मिळणाऱ्या शिक्षणाच्या दर्जाचं काय?

    राज्यातील तरुणांनी त्यांना मिळणाऱ्या शिक्षण आणि पदव्यांचा दर्जाबाबत केलेल्या तक्रारींचा बीबीसी मराठीने केलेला रिपोर्ट बघून चंद्रकांत पाटील म्हणाले,

    • या व्हीडिओमध्ये दिसणारे सगळे विद्यार्थ्यांचे नेते वाटत आहेत कारण त्यांच्याकडे डेटा कमी आहे.
    • मी विद्यार्थी परिषदेत असताना महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती देण्याची मागणी केली होती. आम्ही त्यादृष्टीने प्रयत्न करत आहोत.
    • या व्हीडिओमध्ये मांडलेले मुद्दे थोडे जुने वाटत आहेत. नोकरी, पगार याबाबत माझं म्हणणं असं आहे की, एका बाजूने बेरोजगारी आहे पण समाजात जी गरज आहे ते शिक्षण घेण्याची आमची तयारी नाहीये.
    चंद्रकांत पाटील
  13. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री म्हणून तुमच्या तीन प्रमुख प्राथमिकता काय आहेत?

    या प्रश्नाचं उत्तर देताना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,

    • 2022 ला सरकार आलं तेव्हा नवीन शैक्षणिक धोरणाचा 'न' देखील लिहिला नव्हता.
    • नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यवसायाभिमुख शिक्षण, मराठीतून शिक्षण आणि शिक्षणामधून समाज जागरूक करता आला पाहिजे या आमच्या प्राथमिकता असणार आहेत.
    • नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहोत.
    चंद्रकांत पाटील
  14. थोड्याच वेळात चंद्रकांत पाटील बीबीसी मराठीच्या मंचावर

    बीबीसी न्यूज मराठीच्या सर्व सोशल प्लॅटफॉर्म, तसंच वेबसाईटवर हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येईल आणि अपडेट्स वाचता येतील.

    चंद्रकांत पाटील
  15. थोड्याच वेळात आदिती तटकरे 'बीबीसी मराठी'च्या मंचावर

    बीबीसी न्यूज मराठीच्या सर्व सोशल प्लॅटफॉर्म, तसंच वेबसाईटवर हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येईल आणि अपडेट्स वाचता येतील.

    आदिती तटकरे
  16. मुख्यमंत्री पद मिळण्याबाबत पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

    पंकजा मुंडे
  17. चित्रपटाचे पडसाद जनतेत उमटले असतील तर त्याला काय करणार? - मुंडे

    औरंगजेबाच्या कबरीबाबत त्या म्हणाल्या की,

    • भूमिका मांडण्यामागचा हेतू काय आहे? हेतू जर चुकीचा असेल आणि आपण वेडंवाकडं वागलो की, बातम्यात येतो, असं वाटून कुणी अशी वक्तव्यं करत असतील. त्यांना प्रसिद्धी दिली जाते, म्हणून अशी वक्तव्ये होतात.
    • माझ्या संभाजीराजांवर ज्या पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार झाले ते पाहून वाईट वाटण्यात काय गैर आहे. आपण चांगल्याच राजांचं उदाहरण समोर ठेवलं पाहिजे ना... एका राजाने दुसऱ्या राजाला कसं ट्रीट करावं, याचे प्रोटोकॉल तेव्हा होते, ते पाळले गेले नाहीत ना...
    • या चित्रपटाचे पडसाद जनतेत उमटले असतील तर त्याला काय करणार? हे वातावरण कंट्रोलमध्ये ठेवणं सरकारचं काम आहे, आणि ते केलं जात आहे.
    पंकजा मुंडे

    महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री आजवर मिळाली नाही, याबाबत काय वाटतं?

    • काही पदे जेंडरच्या पुढे असतात. देशाला महिला पंतप्रधान मिळाला आहे. महिलेला काही मिळालं की आपल्याला आनंदच वाटतो. पदावरचा माणूस कोणत्या गुणवत्तेचा आहे, हे अधिक महत्त्वाचं आहे.
    • मुख्यमंत्रीपदाबाबत माझी इच्छा नव्हती कधी आणि तसं वाटलंही नाहीये. मात्र, ही परिस्थिती लोकांनीच निर्माण केली की, मला हे पद हवंय.
    • पक्ष माझी क्षमता पाहून जी संधी देईल, तिथे मी पूर्ण क्षमतेनिशी काम करेन. पुढे भविष्यामध्ये पक्षामध्ये जसं ठरवलं जाईल, तसं मी काम करेन.
    • मीच मुख्यमंत्री असावं, असा माझा अट्टहास नाहीये. दुसऱ्या कुणा महिलेला केलं तरी तो आनंदाचा भाग असेल.
  18. पालकमंत्रीपदाबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या की...

    • पालकमंत्री पद देताना मला वाटतं की, त्यांच्याकडे जाऊन कुठेतरी मला पद द्या, असं म्हणणं मला योग्य वाटत नाही.
    • पण धनंजयला मिळत नसेल तर मला द्यावं असं म्हणावंसं मला वाटलं नाही.
    • पण देवेंद्र फडणवीसांनी अजित दादांना पालकमंत्री पद देण्याचा निर्णय योग्य घेतला आहे. यानिमित्ताने आमच्या जिल्ह्याला अधिक निधी मिळेल, असं वाटतं.
    पंकजा मुंडे
  19. बीड जिल्ह्याच्या विकासाबाबत त्या म्हणतात...

    • बीड जिल्ह्यामध्ये जे घडलं ती दुर्दैवी घटना
    • असं कधीच घडलं नाहीये वा घडत नाही वा घडणार नाही, असं नाहीये. मात्र, हे फक्त बीडमध्येच घडतं असं नाही. त्याबाबत संवेदना दाखवली गेली, ही चांगलीच गोष्ट आहे.
    • परंतु, त्या विषयामुळे बीड जिल्हा असाच आहे, असं म्हणणं चुकीचं आहे.
    • बीडची प्रतिमा जशी दाखवली जाते, तशी ती नाहीये.
    पंकजा मुंडे
    • लोकसभेच्या वेळी जो चुकीच्या पद्धतीचा प्रचार आमच्याकडून झाला, तो आम्ही विधानसभेला दुरुस्त केला.
    • तसंच, संतोष देशमुख प्रकरणाबाबत बीड जिल्ह्याचा जो अतिरंजीत प्रचार सुरु आहे, तो किती चुकीचा आहे, हे कालांतराने लक्षात येईल.
    • धनंजय मुंडे माझा भाऊ आहे, हे वास्तव बदलता येत नाही. पण संतोष देशमुख हादेखील माझा भाऊ आहे.
    • जेव्हा मी शपथ घेतली, तेव्हा कुणाविषयीही ममत्त्वभाव बाळगणार नाही, असं म्हटलंय. धनंजय मुंडेच्या जवळचा व्यक्ती या प्रकरणामध्ये आहे, त्या आधारावर त्याचा राजीनामा घेतला गेला आहे. मुख्यमंत्रीही म्हणाले आहेत की, तो दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई होईल.
    • तो भाऊ असला तरीही दुसऱ्या पक्षाचा नेता आहे. त्याला काय वाटतं आणि त्याची भूमिका काय आहे, यावर मी बोलणं योग्य नाहीये.
    • पण यात धनंजयचा बळी गेला का, यावर मी फार भाष्य करू शकत नाही.
  20. प्रदूषणाच्या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणतात...

    • प्रदूषण करण्यात बराच वेळ गेलाय.त्यामुळे आता ते दुरुस्त करायला देखील वेळ लागेल.
    • नव्या पॉलिसीनुसार, उद्योगांचा कचरा, त्यांचं जे दुषित पाणी सोडलं जातं, त्यावर कठोर कारवाई करणार.
    • आम्ही कठोर पावलं उचलणार आहोत. जे नियमांचं पालन करत नाहीत, त्यांना कारवाईला सामोरं जावं लागणार.
    • उद्योगांना प्रक्रिया झालेलं पाणी सोडायला परवानगी नाही.
    पंकजा मुंडे
    • मिठी नदीच्या अवस्थेवर बोलताना त्या म्हणाल्या की, लोकल बॉडी यासंदर्भात काय करतात, त्याचं मी ऑडीट करणार आहे. पर्यावरण संदर्भात जो निधी प्राप्त होतो, त्याचं काय केलं जातं, याचं ऑडिट केलं जाणार आहे.
    • महानगरपालिकाच्या कचरा आणि नदीच्या व्यवस्थापनाचं ऑडीट केलं जाईल. जसं की महानगर पालिकेला किती पैसे गेलेत, त्यांनी त्याचा वापर आणि नद्यांसाठी किती खर्च केलेत, हे पाहिलं जाईल.