एकंदर पॉलिसी मेकींगमध्ये माझं लक्ष आहे - पंकजा मुंडे
पंकजा मुंडे या राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या मंत्री आहेत. तुमचे प्राधान्याचे विषय कोणते आहेत, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की,
- हे खातं फार मोठं आहे. पर्यावरणाबरोबर आता वातावरणीय बदल हा पूर्ण मोठा विषय जोडला गेला आहे.
- उद्योगांना वळण लावून पर्यावरण जपणे, गरजेचं वाटतंय.
- एकंदर पॉलिसी मेकींगमध्ये मला काम करायचं आहे.
- टेक्नॉलॉजी आणि मेडिकल वेस्ट हे मोठे विषय आहेत.
- नदी पुनरुज्जीवन करणं, हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
- आता 3 पक्ष आहेत, म्हणून काम करताना मला काही अडचण जाणवत नाही.