सरकार आल्यानंतरच्या 100 दिवसांत काय झालं?
- सरकार आल्यानंतर 100 दिवसांमध्ये 'दावोस'चा दौरा झाला.
- पंधरा लाख सत्तर हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. लाखो मुलामुलींना आम्ही रोजगाराची संधी आम्ही उपलब्ध करून दिली आहे.
- इतर राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्यातील गुंतवणुकीचा रेट हा 80-85 टक्के आहे.
- 'दावोस'ला जाऊन नुसते करारच करत नाही, तर आम्ही आऊटपुटही देतो.
या 'दावोस' दौऱ्यातून प्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतात का, या प्रश्नावर ते म्हणतात की,
- उद्योग विभागाला तुम्ही माझी मुलाखत घेऊन आजमावता. तुम्ही माझ्यासोबत अशी एक टीम पाठवा, ज्यांना मी काय काम सुरु आहे, ते सगळं दाखवू शकतो. मी टीका करत नाहीये, पण मुलाखतीतून उद्योग विभाग सिद्ध होणार नसेल, तर माझ्यासोबत चला. मी दाखवून देतो.
- माझं म्हणणं असं आहे की, तुम्ही मला आजमावून पाहा. माध्यमांनी एक टीम तयार करा आणि त्यांना माझ्या सोबत पाठवा आणि तिथं जाऊन बघा किती प्रकल्पांवर काम चालू आहे.
- नोकऱ्या मिळण्याचा रेशो हा 80-85 टक्के आहे. उद्योग कशाप्रकारे सुरु केले आहेत, ते मी तुम्हाला दाखवून देतो. कधीतरी आपण फील्डवर जाऊन या गोष्टीचं विश्लेषण करणार आहोत की नाही, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.