बिग बॉस मराठी 4: मेघा घाडगेंचं पॅकअप ; या माणसापासून सावध राहण्याचा सल्ला

फोटो स्रोत, Facebook/Megha Ghadge
बिग बॉस मराठीच्या घरातून अभिनेत्री मेघा घाडगेचं पॅकअप झालं आहे. बिग बॉस मराठीची दुसरी एलिमिनेशन प्रक्रिया रविवारी पार पडली.
मेघा एलिमिनेट झाल्याने अपूर्वा नेमाळेकर भावुक झाल्याचं दिसलं. मेघा घाडगेने जाता जाता अनेकांवर खोचक टीकाही केली. "अमृता देशमुख धन्यवाद मला चूक नसताना नॉमिनेट केलं", असं ती म्हणाली.
"किरण माने तुमच्यामुळे मी बाहेर आले आहे. मी एक एव्ही पाहिली, या माणसापासून सांभाळून राहा" असा सल्ला मेघा घाडगे यांनी घरच्यांना दिला.
या आठवड्याच्या चावडीत महेश मांजरेकरांनी योगेशला सक्त ताकीद दिली. 'जर या पुढे कोणाचा बाप काढला तर घरामधून बाहेर काढेन', असं महेश मांजरेकर यांनी सांगितलं.
चावडीतील चुगली बूथद्वारे आलेल्या चुगलीमुळे अपूर्वा नेमळेकर ही अमृता धोंगडेवर चांगलीच भडकली, "आयुष्यात पुन्हा असं बोलीस तर खूप महागात पडेल" असे अपूर्वाने तिला बजावून सांगितले.

फोटो स्रोत, Public relations
दिवाळीनिमित्त काही स्पेशल भेटवस्तू सदस्यांनी एकमेकांना दिल्या. ज्यामध्ये त्रिशूलने योगेशला नारळ देऊन बाहेरचा रस्ता दाखवला, तर अपूर्वाला काडेपेटी मिळाली. तर तेजस्विनीला रिमोट कंट्रोल मिळाले.
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनला'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनला 2 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली.
या पर्वाचे होस्टही अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरच आहेत. 'ऑल इज वेल' अशी यंदाच्या सीझनची थीम आहे.
पहिल्या एलिमिनेशनमध्ये निखिल राजेशिर्के बाहेर पडला होता.
बिग बॉसमध्ये असतील हे स्पर्धक -
1. तेजस्विनी लोणारी
'बिग बॉस'च्या घरातील पहिली सदस्य म्हणून तेजस्विनी लोणारी हिने प्रवेश केला आहे. तेजस्विनी लोणारी ही एक अभिनेत्री असून मकरंद अनासपुरेसोबत दोघांत तिसरा आता सगळं विसरा या चित्रपटात ती दिसली होती.
तेजस्विनी फारशा चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर ती लोकप्रिय आहे.
2. प्रसाद जवादे
प्रसाद जवादे हा एक अभिनेता असून त्याने मराठी-हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'असे हे कन्यादान' या मालिका, एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर ही हिंदी मालिका आणि 'मिस्टर अँन्ड मिसेस सदाचारी', 'गुरू' या चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारली होती.
3. अमृता धोंगडे
मिसेस मुख्यमंत्री आणि मिथुन या मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत झळकलेली अभिनेत्री अमृता धोंगडे हीसुद्धा यंदाच्या बिगबॉसचा भाग असणार आहे.
अमृता ही सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे फोटो , व्हिडिओ व्हायरलही होतात.

फोटो स्रोत, COLORS MARATHI PR
4. निखिल राजेशिर्के
अभिनेता निखिल राजेशिर्के याने रंग माझा वेगळा या मालिकेत भूमिका साकारली आहे.
त्याने दे धमाल, अरूंधती आणि आभाळमाया यांसारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे.
5. किरण माने
किरण माने हे स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेमध्ये विलास पाटील या भूमिकेत होते. मात्र त्यांना या मालिकेतून अचानक काढून टाकण्यात आलं होतं.
सोशल मीडियावर मांडत असलेल्या भूमिकेच्या कारणामुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकण्यात आलं, असा आरोप किरण माने यांनी त्यावेळी केला.
किरण मानेंना राजकीय भूमिकेमुळं नव्हे तर इतर कारणांमुळं काढण्यात आलं आणि त्याची त्यांना कल्पनाही होती, असा दावा निर्मात्या सुझाना घई यांनी केला होता.
6. समृद्धी जाधव
समृद्धी जाधव ही स्प्लिट्झव्हिला X3 चा भाग होती. सोशल मीडियावरही ती लोकप्रिय आहे.
समृद्धीला एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना म्हणून ओळखलं जातं. शिवाय, स्केटिंग, घोडेस्वारी, जिम्नॅस्टिक, नृत्य, गायन इत्यादींमध्ये ती पारंगत आहे.
तिने मॉडेल म्हणूनही काम केलं आहे.
7. अक्षय केळकर
भाकरवडी या मराठी मालिकेतील भूमिकेसाठी अभिनेता अक्षय केळकरला ओळखलं जातं.
8. अपूर्वा नेमाळेकर
रात्रीस खेळ चाले या मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री अपूर्वा नेमाळेकर हीसुद्धा यंदाच्या बिग बॉस शोमध्ये स्पर्धक असणार आहे. अपूर्वाला शेवंताच्या भूमिकेसाठी विशेष ओळखलं जातं.
सोशल मीडियावरही अपूर्वाला चांगला प्रतिसाद मिळतो.
9. योगेश जाधव
योगेश जाधवला आपल्या मजबूत शरीरयष्टीसाठी ओळखलं जातं.
योगेश हा मार्शल आर्ट्स मध्ये पारंगत असून त्याने रोडीज शोमध्येही सहभाग नोंदवला होता.
10. अमृता देशमुख
अभिनेत्री अमृता देशमुख ही पुढचं पाऊल आणि अस्मिता यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेली आहे. तिलाही बिग बॉस शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.
11. यशश्री मसुरकर
यशश्री मसुरकर ही एक अभिनेत्री आहे. ती स्टार वन या वाहिनीवर रंग बदलती ओढनी मालिकेतील खनक या भूमिकेसाठी ओळखली जाते. याव्यतिरिक्त तिने लाल इश्क, काबाड या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
12. विकास सावंत
विकास सावंत हा एक डान्सर आणि अभिनेता आहे. त्याने अनेक डान्स रिअॅलिटी शोजमध्ये आपली कला सादर केली आहे.
13. मेघा घाडगे
अभिनेत्री मेघा घाडगे या पछाडलेल्या चित्रपटात दिसल्या होत्या. त्यांनी या चित्रपटात सौंदर्या जवळकर ही भूमिका केली होती.
त्यानंतरही त्यांनी इतर काही मराठी चित्रपटांमध्ये कामे केली होती. पण मध्यंतरी त्या चित्रपटांपासून दूर गेल्या होत्या.
14. त्रिशूल मराठे
त्रिशूल मराठे हा सोशल मीडिया स्टार आहे. त्याला सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळालेली आहे.
15. रुचिरा जाधव
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील माया नामक भूमिकेसाठी रुचिरा जाधव प्रसिद्ध आहे. तिला सोशल मीडियावरही चांगला प्रतिसाद मिळतो.
16. डॉ. रोहित शिंदे
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात डॉ. रोहित शिंदे सहभागी होणार आहे.
रोहित हा रुचिरा जाधवचा बॉयफ्रेंड आहे. पण त्याला मॉडेलिंगची देखील विशेष आवड आहे. त्याने 'मिस्टर इंडिया मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल'साठी मॉडेलिंग केलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























