चीनवर शिनजियांग प्रांतात मानवाधिकारांची पायमल्ली केल्याचा संयुक्त राष्ट्रांचा ठपका

शिनजिआंग

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

शिनजियांग प्रांतात चीनने मानवाधिकांरांची पायमल्ली केल्याचा आरोप संयुक्त राष्ट्राने एका अहवालात केला आहे. हा अहवाल जारी न करण्याची विनंती चीनने संयुक्त राष्ट्राला केली आहे. हा पाश्चिमात्य देशाचा फार्स आहे, असा आरोप चीनने केला आहे.

वीगर मुस्लीम आणि इतर अल्पसंख्यांकावर अत्याचार केल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला आहे. चीनने या आरोपाचा इन्कार केला आहे.

मात्र चौकशी अधिकाऱ्यांना ठोस पुरावे उपलब्ध झाले आहेत आणि ज्या पद्धतीचा अत्याचार झाला आहे ते पाहता मानवाधिकारांचं उल्लंघन झालं आहे, असं चौकशी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार आयुक्त मिशेल बॅलेट यांच्या कार्यकाळ संपण्याच्या एक दिवस आधी हा अहवाल जारी करण्यात आला आहे. या दरम्यान त्यांनी वीगर मुस्लिमांवर सातत्याने अत्याचार होत असल्याचा दावा केलाय.

राष्ट्रीय सुरक्षेचं थातूरमातूर कारण देत चीनने अल्पसंख्याक समाजाचे हक्क हिरावून घेतले आहेत, असा आरोप त्यांच्या टीमने केला आहे.

कैद्यांना अत्यंत हीन वागणूक दिल्याचं या अहवालात म्हटलं आहे. त्यात लैंगिक आणि शारीरिक छळाचाही समावेश आहे.

काही कैद्यांना नको असलेले वैद्यकीय उपचार दिले. काही विशिष्ट समुदायाच्या लोकांना कुटुंब नियोजनाचे उपायही करायला लावले.

संयुक्त राष्ट्रांनी सर्व कैद्यांना तातडीने सोडायला सांगितलं आहे तसंच सर्व कैद्यांना त्यांचे अधिकार द्यावेत आणि बीजिंगच्या कृतीचे आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम होतील, असं या अहवालात म्हटलं आहे.

सरकारने किती लोकांना डांबून ठेवलं आहे याची माहिती नसल्याचं संयुक्त राष्ट्रांचं म्हणणं आहे. अनेक मानवाधिकार गटांनी सांगितलं आहे की लाखो लोकांना शिनजियांग भागात डांबून ठेवलं आहे, असा दावा संयुक्त राष्ट्रांनी केला आहे.

जागतिक वीगर मुस्लीम काँग्रेस ही संस्था 60 संस्थांचं प्रतिनिधित्व करते. त्यांनी या अहवालाचं स्वागत केलं आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तातडीने प्रतिक्रिया द्यावी असं आवाहन केलं आहे.

"वीगर मुस्लीमांची जी परिस्थिती आहे, ती अहवालामुळे बदलेल,"असं वीगूर मानवाधिकार प्रकल्पाचे कार्यकारी संचालक ओमेर कानात म्हणतात.

शिनजियांग भागात 1.2 लाख मुस्लीम राहतात. अहवालात ज्या समस्यांचा उल्लेख केला त्या समस्या इतर मुस्लिमांनाही भेडसावत असतील असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

अमेरिका आणि इतर देशांनी चीनचे हे कृत्य शिरकाण असल्याचं आधीच म्हटलं आहे. बीजिंगने सर्व आरोपांचा इन्कार केला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)