सौदीसह अनेक इस्लामिक देशांनी इस्रायलच्या हल्ल्याविरोधात घेतली कठोर भूमिका

इस्रायल, पॅलेस्टाईन

फोटो स्रोत, Reuters

Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

इस्लामिक जिहाद म्हणजेच पीआयजे या पॅलेस्टिनी गटावर इस्रायलने केलेल्या कारवाईत आतापर्यंत 24 पॅलेस्टिनी ठार झाले असून 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये पीआयजेचे नेते तासीर जबारी यांच्यासह इतर लढवय्ये आणि सहा मुलांचा समावेश आहे.

इस्रायलच्या या कारवाईवर इस्लामिक देशांनी तीव्र निषेध व्यक्त केलाय. तसेच इस्रायलला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली आहे.

सौदी अरेबिया, इराण, पाकिस्तान, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, कतार या इस्लामिक देशांनी इस्रायलच्या या कारवाई विरोधात पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवला आहे.

इस्रायलने गाझावर जी कारवाई केली आहे त्याचा सौदी अरेबियाने तीव्र शब्दात निषेध केला असून पॅलेस्टिनींना आपला पाठिंबा दर्शवला आहे.

सौदीने घेतली कठोर भूमिका

सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या आपल्या निवेदनात आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन करत म्हटलंय की, "आंतरराष्ट्रीय समुदायाने या संघर्षाचा अंत करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच गाझामधील सामान्य लोकांना सुरक्षा प्रदान करण्याची जबाबदारी पार पाडावी. दोन्ही देशांमधील अनेक दशकांपासून सुरू असलेला वाद संपवण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय."

तेच इराणने गाझावरील 'क्रूर हल्ल्याचा' निषेध करत पॅलेस्टिनींना आपला पाठिंबा दर्शविला आहे. इस्रायलविरुद्धच्या लढाईत ते एकटे नसल्याचं ही इराणने म्हटलयं.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रायसी म्हणाले की, "इस्रायलने जगाला पुन्हा एकदा जगाला आपली आक्रमक वृत्ती दाखवली आहे."

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे प्रमुख मेजर जनरल हुसेन सलामी यांनी एका वृत्त वेबसाईटला ही माहिती दिल्याचं अल-जझीराने म्हटलं आहे.

ते म्हणाले, "जेरुसलेमला मुक्त करण्यासाठी तसेच पॅलेस्टाईनचे हक्क शाबूत ठेवण्यासाठी काम करणाऱ्या सर्व ज्यूविरोधी जिहादी शक्ती आता एकवटल्या आहेत."

इराणची धमकी

इराणची राजधानी तेहरानच्या दौऱ्यावर असणारे इस्लामिक जिहादचे नेते झियाद अल नखला यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "आम्ही शेवटपर्यंत तुमच्यासोबत आहोत. तुम्ही पॅलेस्टिन आणि पॅलेस्टिनवासियांना सांगा की ते एकटे नाहीत."

सलामी म्हणाले की, "पॅलेस्टाईनने दिलेल्या सडेतोड उत्तरावरून तरी असं दिसतंय की, तिथं एक नवे पर्व सुरू झालंय. इस्रायलने केलेल्या गुन्ह्याची त्याला मोठी किंमत मोजावी लागेल. त्यांच्या मते आज पॅलेस्टाईन करत असलेला प्रतिकार पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे."

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय.

आईआरजीसीचे प्रमुख मेजर जनरल हुसैन सलामी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आईआरजीसीचे प्रमुख मेजर जनरल हुसैन सलामी

पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, "इस्रायलने केलेले हल्ले हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि मानवतावादी कायद्यांची अवहेलना करणारे आहेत. तसेच हे हल्ले निष्पाप पॅलेस्टिनींवरील इस्रायली अत्याचारांचे, त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांचे, बळाच्या अंदाधुंद वापराचे प्रतीक आहेत."

पाकिस्तानने इस्रायलवर तोफ डागली

पंतप्रधान शाहबाज शरीफ आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात की, ही इस्त्रायली अतिरेक्यांची कारवाई आहे, "जर रानटीपणाला काही चेहरा असेल तर तो इस्त्रायलचाच असावा. परिणामांची पर्वा न करता त्यांनी पॅलेस्टिनींना लक्ष्य केलंय."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

त्याचवेळी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, "पॅलेस्टिनी लोकांचे हक्क नियंत्रित करण्यासाठी इस्रायल आपली लष्करी शक्ती वापरत आहे."

ते पुढे लिहितात की, "आम्ही शूर पॅलेस्टिनी लोकांच्या पाठीशी आहोत. जागतिक महासत्ता देशांनी याबाबत आपलं मौन सोडून द्यावं आणि इस्रायलने पॅलेस्टिनी लोकांवर जे अत्याचार केले आहेत त्या विरोधात कारवाई करावी."

यूएई, कतार आणि इजिप्तनेही नोंदवलाय आक्षेप

तिकडे इजिप्तनेही परिस्थिती बिघडू नये, प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित कायम राहावं यासाठी दोन्ही देशांसोबत काम करत असल्याचं म्हटलंय.

इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी, शनिवारी कैरोत आयोजित कार्यक्रमात बोलत होते की, "परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये तसेच युद्ध थांबावं यासाठी आम्ही सर्वांच्या संपर्कात आहोत."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

त्याचवेळी, संयुक्त अरब अमिरातीने गाझा पट्टीमध्ये शांतता राहावी, तणाव निवळावा आणि सामान्य लोकांचे प्राण वाचवण्यावर भर दिलाय.

या संघर्षावर यूएईच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध केलंय. त्यांच्या या निवेदनात हिंसाचार आणि अस्थिरता टाळण्यासाठी जास्तीत जास्त संयम बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय.

संयुक्त राष्ट्रसुरक्षा परिषदेचा सदस्य या नात्याने यूएईने चीन, फ्रान्स, आयर्लंड आणि नॉर्वेसह सोमवारी या विषयावर सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्यासाठी निवेदन दिलंय.

या बैठकीत सद्यपरिस्थितीवर चर्चा व्हावी तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रयत्नांना पाठिंबा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.

कतारने गाझावरील इस्रायलच्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून ही "आक्रमक" वृत्ती असल्याचं म्हटलंय.

इस्रायल, पॅलेस्टाईन

फोटो स्रोत, Getty Images

या हल्ल्याच्या विरोधात जगाने तातडीने पुढाकार घेऊन सामान्य लोकांवर विशेषत: महिला आणि लहान मुलांवर होणारे हल्ले थांबवावेत असं आवाहन कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलंय.

या संदर्भात त्यांनी निवेदन प्रसिद्ध करीत म्हटलंय की, "पॅलेस्टिनी लोकांचे मुद्दे, तेथील लोकांचे न्याय्य हक्क आणि 1967 मध्ये ठरवून दिलेल्या त्यांच्या स्वतंत्र देशाची राजधानी जेरुसलेमला न्याय मिळावा यासाठी आम्ही पाठिंबा देत आहोत."

नेमकं प्रकरण काय आहे?

तर इस्रायलच्या म्हणण्यानुसार, "पीआयजेने शुक्रवारपासून इस्रायलच्या दिशेने 300 पॅलेस्टिनी रॉकेट आणि मोर्टार डागले आहेत. पीआयजेकडून असलेला धोका लक्षात घेऊनचं इस्रायलने नवी मोहीम सुरू केल्याचं इस्रायलचे पंतप्रधान येर लेपिड यांनी सांगितलं आहे."

'ब्रेकिंग डॉन' नावाची ही कारवाई आठवडाभर चालू शकते, असा इशारा इस्रायली लष्कराने दिलाय.

2021 च्या मे मध्येही इस्रायल आणि पॅलेस्टिन संघर्ष तीव्र झाला होता. या संघर्षात 200 हून अधिक पॅलेस्टिनी तर 12 इस्रायली ठार झाले होते. त्यानंतर आत्ताच्या या संघर्षाची सर्वात गंभीर संघर्ष अशी नोंद झाली आहे.

इस्रायल, पॅलेस्टाईन

फोटो स्रोत, Getty Images

इस्रायलने म्हटलंय की, "गाझा पट्टीवर हवाई हल्ले करून तसेच वेस्ट बँकमध्ये छापे टाकून पीआयजेच्या 19 लोकांना अटक करण्यात आली आहे."

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने 200 हून अधिक पॅलेस्टिनींच्या मृत्यूची नोंद केली असून यासाठी इस्रायलच्या आक्रमकतेला जबाबदार धरण्यात आलंय.

हमास मात्र या संघर्षापासून दूर

सर्वांत मोठा अतिरेकी गट आणि इस्लामिक जिहादसारखी विचारधारा असलेल्या 'हमास' या संघटनेने कोणतीही कारवाई सुरू केलेली नाही. परिणामी इस्रायलने हमासवर कोणत्याही प्रकारचा हल्ला केल्याचं वृत्त अजूनतरी आलेलं नाही.

पण हमासने शुक्रवारी एक निवेदन प्रसिद्ध केलंय. त्यांच्या निवेदनात म्हटलंय की, 'प्रतिरोधी गट' आता एकत्र आलेत. गाझा पट्टीवर हमासचं शासन आहे. आत्ताच्या समस्येचा अजून मोठा भडका उडू नये म्हणून त्यांनी आतापर्यंत व्यावहारिक दृष्टिकोन ठेवलाय.

पण गाझामधील नागरिकांच्या मृत्यूची संख्या झपाट्याने वाढली तर मात्र हमास शांत बसणार नाही. हमास जर युद्धात उतरला तर मात्र मोठा रक्तपात घडून येईल.

इस्रायलने नुकतेच उत्तर वेस्ट बँक मध्ये इस्लामिक जिहादच्या एका नेत्याला अटक केलीय. या अटकेनंतर इस्लामिक जिहादकडून सूड उगवला जाईल याच्या भीतीने इस्रायलने गाझाला जाणारे रस्ते बंद केलेत.

इस्रायल, पॅलेस्टाईन

फोटो स्रोत, Getty Images

या युद्धामुळे पॅलेस्टाईनला मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. वीज कंपनीच्या एका प्रवक्त्याने सांगितलं की, गाझा येथील एकमेव वीज केंद्र शनिवारी इंधन उपलब्ध नसल्यामुळे बंद ठेवण्यात आलं.

गाझा पट्टीतून जे 300 रॉकेट डागले होते त्यापैकी 70 रॉकेट तर इस्रायलपर्यंत पोहोचलेही नाहीत. उलट ते गाझामध्येच पडल्याचं एका इस्रायली अधिकाऱ्याने सांगितलं. तर जे रॉकेट इस्रायलच्या सीमेत घुसले ते रॉकेट इस्रायलच्या 'आयर्न डोम' या मिसाईल डिफेन्स टेक्नोलॉजीने तिथल्या तिथे उडवून टाकले. या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, "इस्लामिक जिहादवर जे 30 हल्ले करण्यात आले त्यातले दोन त्यांच्या शस्त्रागारांवर तर सहा रॉकेट उत्पादनांच्या युनिटवर करण्यात आले होते."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)