इथं वॉशिंग मशीनच्या आवाजातून लोक लाखो रुपये कमावतात

पॉडकास्ट, व्हाईट नॉईज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वॉशिंग मशीनचा आवाज
    • Author, एलमुदेना दा काबो
    • Role, बीबीसी न्यूज वर्ल्ड
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

सध्या जगात हे पॉडकास्ट चर्चेत आहेत. विविध प्रकारच्या प्रसारणात पॉडकास्ट हे सध्या चलनी नाणं आहे आणि हे लोकांमध्ये लोकप्रियही होत आहे. आता वॉशिंग मशीन, पंखा चालण्याचा आवाज, पावसाचा आवाज या सगळ्या आवाजांनी तयार झालेल्या पॉडकास्टच्या माध्यमातून चांगली कमाई केली जात आहे.

अशा आवाजांना व्हाईट नॉईज म्हटलं जातं. शांततामय मार्गाने जगण्याचा हा एक नवा प्रकार मानला जात आहे.

व्हाईट नॉईज पॉडकास्टर शांततामय जग निर्माण करतात. हजारो श्रोत्यांना ध्वनीप्रदूषणापासून दूर, शांत राहण्यासाठी आणि गाढ झोप लागावी यासाठी मदतगार ठरत आहेत. लोकप्रिय व्हीडिओ आणि ऑडियो प्लॅटफॉर्म पाहिले तर लक्षात येतं की हे पॉडकास्ट लोकांना किती आवडत आहेत.

युट्यूबवर सेलेस्टियल व्हाईट नॉईज या पॉडकास्टला 5 कोटी 70 लाख व्ह्यूज आहेत. व्हाईट नॉईज फॉर बेबीज टू स्लीप या पॉडकास्टला 80 लाख व्ह्यूज आहेत.

आवाजांवर बेतलेले पॉडकास्ट खपणीय ठरत आहेत. हे आवाज दुसरा कुठलातरी आवाज काढण्यासाठी आदर्श मानले जातात. गाड्या, बांधकामाच्या साईटवरचे आवाज, कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज हे आवाज टाळण्यासाठी अशा आवाजांचा वापर केला जातो.

व्हाईट नॉईजचा बाजार

टीएमसॉफ्ट्स व्हाइट नॉईज स्लीप साऊंड्स या पॉडकास्टसाठी गेली 12 वर्ष काम करणारे अमेरिकेचे उद्योगपती टोड मूर सांगतात, "मला असं वाटतं प्रत्येक माणूस शांत झोप लागावी यासाठी काही ना काही उपाय करतच असतो. काही लोक ध्यानधारणा करतात, पण मी शांत झोपेसाठी सगळ्यात उत्तम उपाय शोधला आहे. व्हाईट नॉईज आणि निसर्गात असलेले आवाज यांनी शांत झोप मिळायला मदत होते".

मूर यांनी 2009 मध्ये व्हाईट नॉईज नावाने फ्री अॅप काढलं होतं. अॅपल स्टोअरवर याचे 17000 रिव्ह्यू आहेत.

पॉडकास्ट, व्हाईट नॉईज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पॉडकास्ट

"व्हाईट नॉईज बनवण्याचा विचार आयफोन आला आणि अॅपल स्टोअर आलं तेव्हा डोक्यात आला. मी नेहमी पंख्याखाली झोपतो त्यामुळे सगळ्यात आधी हाच आवाज रेकॉर्ड करूया असं डोक्यात आलं. मी हा आवाज आयफोनमध्ये रेकॉर्ड करून घेऊन जाऊ शकत होतो. नंतर मी एअर कंडिशनरचा आवाज रेकॉर्ड करू लागलो.

"मी बागेत जात असे आणि तिथला आवाज रेकॉर्ड करून येत असे. पावसाचा आवाज, निसर्गातल्या अन्य अनेक गोष्टींचे आवाज मी रेकॉर्ड केले. हे सगळे आवाज मी अॅपमध्ये टाकू लागलो. सुरुवातीला हे सगळं सोपं होतं. माझ्याकडे दहाप्रकारचे आवाज होते आणि संपूर्ण रात्र हे आवाज ऐकता येत असत.

"कोणत्याही अडथळ्याविना 10 तास हे आवाज ऐकणं खूप कठीण होतं. यात माझा खूप वेळ गेला. पण मी हे काम पूर्ण केलं. त्यानंतर हे काम जागा भरण्यासारखं उरलं. मी सुरुवातीला यातून पैसा कमवण्याचा विचार केला नव्हता. माझ्या या उपक्रमातून कोणाला तरी उपयोग होईल एवढाच माझा उद्देश होता. त्यामुळे मी हे अॅप फ्री डाऊनलोड प्रकारात ठेवलं होतं."

पॉडकास्ट, व्हाईट नॉईज

फोटो स्रोत, DAVID ESPEJO

फोटो कॅप्शन, पॉडकास्ट

ते पुढे सांगतात, "अगदी झटपट हे अॅप नंबर एक क्रमांकावर गेलं. प्रत्येकजण डाऊनलोड करून हे ऐकू लागला होता. मला शेकडो इ-मेल येत असत. मग मी पॉडकास्ट सुरू केलं."

लोकांचा पॉडकास्टप्रति उत्साह वाढतच गेला. हे पाहून मूर यांनी व्हाईट नॉईज रेकॉर्डिंग पॉडकास्टमध्ये समाविष्ट केलं.

मूर सांगतात, "आम्ही दर आठवड्याला नवे आवाज समाविष्ट करतो. अॅपमध्ये कॉम्प्लिमेंटरी आहे. यामुळे जास्तीत जास्त लोक अपशी जोडले जातील असं आम्हाला वाटतं. यातून आम्ही पैसा कमावतो. आम्हाला लोकांकडून प्रतिक्रियाही मिळतात. पण आम्हाला कधी वाटलं नव्हतं की आम्ही दरदिवशी 50 हजार श्रोत्यांशी जोडले जाऊ".

फायदेशीर व्यवसाय

पॉडकास्टिंग वेगाने वाढणारा व्यवसाय आहे. मूर स्वत: पाच लोकांना घेऊन काम करत आहेत. तीन पूर्णवेळ कर्मचारी आहेत. पैसा मिळवून देणारा असा हा व्यवसाय झाला आहे.

मूर सांगतात, आम्ही चांगला पैसा कमावत आहोत. पण त्यांनी आपल्या कमाईचा ब्योरा दिलेला नाही.

पॉडकास्ट, व्हाईट नॉईज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, व्हाईट नॉईज पॉडकास्ट सध्या लोकप्रिय झालं आहे.

ब्लूमबर्गमध्ये प्रकाशित एका लेखानुसार अँकर पॉडकास्टसाठी व्यावसायिक बाजूही सांभाळतात. पॉडकास्ट 1000 वेळा प्ले झालं तर त्यांना 12.25 डॉलर मिळतात. दर महिन्याला 18,375 डॉलर एवढी रक्कम मिळते. अॅपमधूनही मूर यांना पैसा मिळतो. 15 लाख अक्टिव्ह युझर आहेत. मूर आपल्या अपवर 2.99 डॉलरमध्ये प्रो व्हर्जनही विकतात.

'पैसा कमावणं एवढंही सोपं नाही'

पॉडकास्ट मॉनेटाईज करणं किचकट काम आहे. स्पॅनिश पॉडकास्टर आणि यस वी कास्टचे संस्थापक फ्रान्सिस्को इजिजक्विजा सांगतात की, "प्रत्येक पॉडकास्टर पैसा कमावत नाही. काहीजणच पैसा कमावतात".

"सध्या पॉडकास्टिंगचा ट्रेंड सुरू आहे. जास्त पैसा आणि आणि संसाधनं उपलब्ध आहेत. त्यामुळे नवा फॉरमॅट आणि व्हाईट नॉईजसारखं कंटेट तयार होण्याची शक्यता आहे.

"पॉडकास्ट सुरू करणारे 99 टक्के लोक युट्यूबप्रमाणे ब्लॉगपासूनच सुरुवात करतात. सुरुवातीला पैसा मिळत नाही. त्यांना पैसा मिळणं सुरू व्हायला वेळ लागतो", असं त्यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)