किचनच्या अडगळीत ठेवलेली ही फुलदाणी निघाली सव्वाबारा कोटी रुपयांची

किचनमधल्या फुलदाणीला सव्वा बारा कोटी रुपयांची किंमत

फोटो स्रोत, DEWEATTS

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

कोणाचं नशीब कधी फळफळेल सांगता येत नाही. धुळीत पडलेल्या गोष्टीची पारख झाली तर त्या वस्तूला कधीही किंमत मिळू शकते. याचंच प्रत्यंतर चीनमध्ये आलं आहे.

एका स्वयंपाकघरात 1980 साली विकत घेण्यात आलेली एक फुलदाणी ठेवण्यात आली होती. ही फुलदाणी अत्यंत दुर्मिळ असून ती 18 व्या शतकामधली होती.

2 फूट उंचीच्या, निळ्या-चंदेरी चकाकीची ही फुलदाणी क्विनलाँगच्या सम्राटाच्या दराबारात ठेवण्यासाठी तयार करण्यात आली होती. या फुलदाणीला सव्वा बारा कोटी रुपयांची किंमत मिळाली आहे. या फुलदाणीवर क्रौंच आणि वटवाघळं चितारली आहेत.

ही फुलदाणी एका शल्यचिकित्सकाकडे होती. त्याने ही फुलदाणी आपल्या मुलाला देऊन टाकली होती.

बर्कशायरमधील ड्र्युअट्स लिलाव कंपनीच्या दृष्टीमध्ये ही फुलदाणी आली तिचा सर्व इतिहास बाहेर आला. ती एका आंतरराष्ट्रीय ग्राहकाला विकण्यात आली आणि त्यानंतर तिचा लिलाव झाला.

किचनमधल्या फुलदाणीला सव्वा बारा कोटी रुपयांची किंमत

फोटो स्रोत, DEWEATTS

या लिलाव कंपनीचे मार्क न्यूस्टेड म्हणाले, या फुलदाणीला मिळालेला प्रतिसाद पाहून आम्हाला आनंद झाला. त्यामध्ये चीन, हाँगकाँग, अमेरिका आणि इंग्लंडमधून लोकांनी रस दाखवला होता.

या फुलदाणीवर एक षडाक्षरी चिन्ह आहे. हे चिन्ह क्विनलाँग काळाचं (1736-1795) द्योतक आहे. या फुलदाणीच्या खाली ते रंगवलं आहे, असं कंपनीनं सांगितलं.

कंपनीनं सांगितलं, याचा कोबाल्ट ब्लू रंग सॅक्रिफिशियल ब्लू नावानेही ओळखला जातो. चीनमधील स्वर्गमंदिरामध्ये दिल्या जाणाऱ्या बळींचं प्रतिक म्हणून या रंगाला चकाकी देण्यात आली आहे.

चकचकीत आणि थोड्याश्या उठावदार चंदेरी रंगाची झाक असणारी ही निळी फुलदाणी अत्यंत दुर्मिळ आहे.

किचनमधल्या फुलदाणीला सव्वा बारा कोटी रुपयांची किंमत

फोटो स्रोत, DEWEATTS

याप्रकारची सोने किंवा चांदीत मढवलेली कोणतीही दुसरी वस्तू आजवर नोंदलेली नाही. यावर चितारलेले क्रौंच आणि वटवाघळं दीर्घकाल आणि संपन्नतेचं प्रतीक आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)