श्रीलंका संकट : जॅकलीन फर्नांडिस म्हणते माझ्या लोकांना सहानुभूतीची गरज...

क्रिकेटर सनथ जयसूर्या आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस

फोटो स्रोत, GARETH COPLEY/PRODIP GUHA/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, क्रिकेटर सनथ जयसूर्या आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

श्रीलंकेवर कोसळलेलं आर्थिक संकट आणि सरकारविरोधातील निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे क्रिकेटपटू आणि चित्रपट कलाकारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

महागाईने त्रस्त असलेल्या आपल्या लोकांबद्दल दुःख व्यक्त करत सनथ जयसूर्या, लसिथ मलिंगा, अर्जुन रणतुंगा, कुमार संगकारा आणि जॅकलिन फर्नांडिस यांनी भारतासह इतर देशांकडे मदत मागितली आहे.

यातील काहींनी आपल्या प्रतिक्रियेत श्रीलंकेतील सध्याच्या परिस्थितीबद्दल संताप व्यक्त केलाय. तर श्रीलंकेच्या चांगल्या भविष्याच्या अपेक्षा ही धरल्या आहेत.

यातील काहींनी सध्याच्या परिस्थितीसाठी राजपक्षे सरकारला जबाबदार धरलंय, तर काहींनी अशा वाईट प्रसंगी एकजूटता दाखवण्याचं आवाहन केलंय. त्याचबरोबर लोकांसाठी दिवसेंदिवस परिस्थिती कठीण होत असल्याबद्दलही काहींनी खंत व्यक्त केलीय.

दिवसेंदिवस वाढणारी महागाई, पेट्रोल, गॅस आणि खाद्यपदार्थांच्या तुटवड्यामुळे श्रीलंकेतील लाखो लोक अनेक दिवसांपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत. राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षे यांच्या विरोधात जनसामान्यांमध्ये रोष उसळला असून लोकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राष्ट्रपतींच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या आंदोलनालाही हिंसक वळण लागलं.

श्रीलंकेत आणीबाणी आणि कर्फ्यू लागू करण्यात आला असतानाही आंदोलनं सुरूच आहेत.

भारताने देऊ केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता

श्रीलंकेत सुरू असलेल्या परिस्थितीबाबत माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या म्हणतात की, "लोकांना अशा परिस्थितीतून जावं लागतंय हे दुर्दैव आहे. अशा पध्दतीने जगणं अवघड आहे, म्हणून त्यांनी विरोध सुरू केलाय. इथं गॅसचा तुटवडा असून तासनतास वीज नसते."

"लोकांना असलेल्या अडचणी कळाव्या म्हणून त्यांनी श्रीलंकन सरकारविरोधात निदर्शने सुरू केली आहेत. जर का संबंधित लोकांनी या अडचणी सोडवल्या नाहीत तर मोठी वाताहत होईल. यावेळी ही सर्व जबाबदारी सत्तेत असलेल्या सरकारवर आहे."

ते म्हणाले, "आपल्या देशाचा शेजारी आणि मोठा भाऊ या नात्याने भारताने आपल्याला नेहमीच मदत केलीय. आम्ही भारत सरकार आणि पंतप्रधान मोदींचे आभारी आहोत. सध्याच्या परिस्थितीत जगणं आमच्यासाठी सोपं नाही. आम्हाला आशा आहे की भारत आणि इतर देशांच्या मदतीने आम्ही यातून बाहेर पडू."

कोलंबोतील निदर्शनं
फोटो कॅप्शन, कोलंबोतील निदर्शनं

तेच दुसरीकडे बुधवारी, श्रीलंकेला आतापर्यंतच्या सर्वांत वाईट अशा आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू अर्जुन रणतुंगा यांनी भारताचं कौतुक केलंय.

अर्थव्यवस्थेची चुकीची हाताळणी केल्याबद्दल आणि "स्वतःच्या फायद्यासाठी" संविधान बदलल्याबद्दल रणतुंगा यांनी आपल्या देशातील आघाडीच्या राजकारण्यांवर टीका केलीय.

ते म्हणाले, "आपल्याला ही परिस्थिती हाताळता येणार नाही असं जर राष्ट्रपतींना वाटत असेल तर त्यांनी पायउतार व्हावं. आपण जगभरातून पैसे मागतोय. आणि विशेष म्हणजे मदत करणाऱ्या देशांमध्ये भारत आहे हे चांगल आहे. सामान्य लोक दूध पावडर, गॅस, तांदूळ, पेट्रोल अशा गोष्टींचीच मागणी करतायत. मी हिंसेचे समर्थन करत नाही. गेल्या दोन वर्षांत देश एका मोठ्या संकटात सापडलाय. आता ते सबब म्हणून कोविडचा आधार घेतील, पण संपूर्ण जगानेच त्याचा सामना केलाय."

राजकीय अजेंडापासून दूर राहा, संगकाराचं आवाहन

श्रीलंकन संघाचे माजी कर्णधार कुमार संगकारा यांनी आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत देशातील लोकांच्या अडचणींबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

ते म्हणाले, "श्रीलंकेचे लोक अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहेत. लोकांना त्यांच्या दैनंदिन गरजाही पूर्ण करता येत नाहीत हे पाहून वाईट वाटतंय. परिस्थिती दिवसेंदिवस अवघड होत आहे. लोक तोडगा निघावा यासाठी आपला आवाज उठवत आहेत.

Instagram पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

Instagram पोस्ट समाप्त, 1

"काही लोक यावर नाराजी व्यक्त करत आहेत तर काहीजण त्याचा गैरवापर करण्याच्या प्रयत्नात आहेत. लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. वैयक्तिक हितसंबंध आणि राजकीय अजेंडापासून दूर राहून श्रीलंकेच्या हितासाठी काम केल पाहिजे. हे लोक श्रीलंकेचे शत्रू नाहीत, ते आपलेच लोक आहेत. लोकांच भविष्य अबाधित ठेवलं पाहिजे.

श्रीलंका संघाचा माजी कर्णधार कुमार संगकारा

फोटो स्रोत, VISIONHAUS/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, श्रीलंका संघाचा माजी कर्णधार कुमार संगकारा

श्रीलंका संघाचे माजी कर्णधार महेला जयवर्धने यांनी ही एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे आपलं मत मांडल आहे.

त्यांनी लिहिलंय की, "श्रीलंकेत सुरू असलेली आणीबाणी आणि कर्फ्यू पाहून दुःख होतंय. सरकार जनतेच्या गरजांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. त्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आंदोलनकर्त्यां लोकांना ताब्यात घेणं योग्य नाही आणि अशा लोकांच्या बचावासाठी काम करणाऱ्या श्रीलंकन वकिलांचा मला अभिमान आहे."

"खरे नेते त्यांच्या चुका मान्य करतात. आपल्या देशातील लोकांच रक्षण करणं आणि त्यांच्या दु:खात सामील होणं अत्यंत आवश्यक आहे. या समस्या आपण तयार केल्यात आणि योग्य व्यक्तीद्वारे त्यांच निराकरण करता येऊ शकतं. या देशाच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवणाऱ्यांनी जनतेचा विश्वास गमावलाय. त्यांनी पायउतार व्हावं. देशाला आत्मविश्वास आणि विश्वास देण्यासाठी एका चांगल्या टीमची गरज आहे.

भानुका राजपक्षे आणि लसिथ मलिंगा म्हणतात...

तिकडे पंजाब किंग्जकडून खेळत असलेले विकेटकीपर फलंदाज भानुका राजपक्षेने लिहितात, "मी माझ्या लोकांपासून मैलो दूर आहे तरीही, मी माझ्या श्रीलंकेच्या लोकांचं दुःख समजू शकतो. त्यांना रोजचा खर्च भागवणं ही कठीण झालं आहे.

"त्यांचा आवाज बंद करण्यासाठी त्यांचे मुलभूत अधिकारही हिरावून घेतले गेलेत. पण, दोन कोटी वीस लाख लोकांचा आवाज जेव्हा एकत्र येतो तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणं अवघड असतं."

ते पुढे म्हणतात, "श्रीलंकेतील लोकांच म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. त्यांच्यासाठी चांगली परिस्थिती निर्माण केली पाहिजे. माझी विनंती आहे की श्रीलंकेचे लोक तुमचे शत्रू नाहीत. त्यांच कोणत्याही परिस्थितीत रक्षण केल पाहिजे."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने ही इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत, "मी माझ्या लोकांसोबत, श्रीलंकेच्या लोकांसोबत उभा आहे." असं म्हटलयं.

Instagram पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

Instagram पोस्ट समाप्त, 2

मूळची श्रीलंकन असलेली बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस, हिनेही श्रीलंकेतील सध्याच्या परिस्थितीबद्दल दु:ख व्यक्त करत लवकरच परिस्थिती सुधारावी अशी आशा व्यक्त केली आहे.

@Asli_Jacqueline

फोटो स्रोत, @Asli_Jacqueline

ती इंस्टाग्रामवर पोस्टवर लिहिते की, "एक श्रीलंकन व्यक्ती ​​म्हणून माझा देश आणि देशवासियांना अशा परिस्थितीत पाहून वाईट वाटतं. ही परिस्थिती निर्माण झाल्यापासून मला अनेक प्रकारच्या विचारांनी घेरलयं. मी म्हणेन की, काही गृहीत धरण्याची घाई करू नका किंवा कोणत्याही गटाला विरोध करू नका.

Instagram पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

Instagram पोस्ट समाप्त, 3

"माझ्या लोकांना सहानुभूती आणि समर्थनाची गरज आहे. त्यांच्यावर कोणतीही टिप्पणी करण्याऐवजी त्यांच्या सामर्थ्यासाठी आणि आरोग्यासाठी केलेली दोन मिनिटांची प्रार्थना तुम्हाला त्यांच्या अजून जवळ आणेल."

"माझ्या देशवासीयांच्या फायद्यासाठी शांततापूर्ण आणि लोकहिताच्या मार्गाने ही परिस्थिती लवकरच निवळेल अशी मला आशा आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)