लक्ष्य सेन ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत

लक्ष्य सेन

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, लक्ष्य सेन
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

भारताचा 20वर्षीय युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

अतिशय चुरशीच्या सेमी फायनलच्या 76 मिनिटं चाललेल्या लढतीत लक्ष्यने स्पर्धेच्या गतविजेत्या ली जी झिआवर 21-13, 12-21, 21-19 असा झुंजार विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.

ऑल इंग्लंड स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा लक्ष्य केवळ पाचवा भारतीय बॅडमिंटनपटू आहे.

प्रकाश पदुकोण आणि पुलेला गोपीचंद या भारतीय बॅडमिंटनमधील दोन दिग्गजांनी या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे.

पी.व्ही.सिंधू आणि सायना नेहवाल यांनाही या स्पर्धेच्या जेतेपदाने हुलकावणी दिली आहे.

21 वर्षांपूर्वी पुलेला गोपीचंद यांनी ऑल इंग्लंड स्पर्धेचं जेतेपद पटकावण्याची किमया केली होती. लक्ष्यला रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीत विजय मिळवत ऐतिहासिक जेतेपद नावावर करण्याची सुवर्णसंधी आहे.

लक्ष्य सेन

फोटो स्रोत, Twitter

गेल्या वर्षी लक्ष्यने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती. युथ ऑलिम्पिक गेम्समध्ये लक्ष्यने रौप्यपदक पटकावलं होतं.

2018 मध्ये वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेत लक्ष्यने कांस्यपदक कमावलं होतं.

2018 मध्ये आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेत लक्ष्यने सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं.

2019 मध्ये लक्ष्यने डच ओपन स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्याच वर्षी सारलोरलूक्स ओपन स्पर्धेच्या जेतेपदावरही त्याने कब्जा केला होता.

काही दिवसांपूर्वी झालेल्या इंडिया ओपन स्पर्धेत लक्ष्य जेतेपदाचा मानकरी ठरला होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या जर्मन ओपन स्पर्धेत लक्ष्यला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

या पराभवातून बोध घेत लक्ष्यने खेळात आणखी सुधारणा करत ऑल इंग्लंड स्पर्धेच्या अंतिम फेरीत वाटचाल केली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)